কুরআনুল কারীমের অর্থসমূহের অনুবাদ - মারাঠি ভাষায় অনুবাদ * - অনুবাদসমূহের সূচী


অর্থসমূহের অনুবাদ সূরা: সূরা আল-জীন   আয়াত:

সূরা আল-জীন

قُلْ اُوْحِیَ اِلَیَّ اَنَّهُ اسْتَمَعَ نَفَرٌ مِّنَ الْجِنِّ فَقَالُوْۤا اِنَّا سَمِعْنَا قُرْاٰنًا عَجَبًا ۟ۙ
१. (हे मुहम्मद स.) तुम्ही सांगा की मला वहयी (प्रकाशना) केली गेली आहे की जिन्नांच्या एका समूहाने (कुरआन) ऐकले आणि म्हटले की आम्ही मोठे आश्चर्यकारक कुरआन ऐकले आहे.
আরবি তাফসীরসমূহ:
یَّهْدِیْۤ اِلَی الرُّشْدِ فَاٰمَنَّا بِهٖ ؕ— وَلَنْ نُّشْرِكَ بِرَبِّنَاۤ اَحَدًا ۟ۙ
२. जो सत्य मार्ग दाखवितो आम्ही तर त्यावर ईमान राखले, (आता) आम्ही कधीही आपल्या पालनकर्त्याचा दुसऱ्या एखाद्याला सहभागी बनविणार नाही.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّهٗ تَعٰلٰی جَدُّ رَبِّنَا مَا اتَّخَذَ صَاحِبَةً وَّلَا وَلَدًا ۟ۙ
३. आणि निःसंशय, आमच्या पालनकर्त्याची शान (महानता) अति उच्च आहे, त्याने ना कोणाला (आपली) पत्नी बनविले आहे आणि ना संतती.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّهٗ كَانَ یَقُوْلُ سَفِیْهُنَا عَلَی اللّٰهِ شَطَطًا ۟ۙ
४. आणि निःसंशय, आमच्यातला मूर्ख, अल्लाहविषयी खोट्या गोष्टी बोलत होता.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّا ظَنَنَّاۤ اَنْ لَّنْ تَقُوْلَ الْاِنْسُ وَالْجِنُّ عَلَی اللّٰهِ كَذِبًا ۟ۙ
५. आणि आम्ही तर हेच समजत राहिलो की मनुष्य आणि जिन्न अल्लाहविषयी कधीही खोटे बोलणार नाहीत.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّهٗ كَانَ رِجَالٌ مِّنَ الْاِنْسِ یَعُوْذُوْنَ بِرِجَالٍ مِّنَ الْجِنِّ فَزَادُوْهُمْ رَهَقًا ۟ۙ
६. वस्तुतः काही माणसे, काही जिन्नांकडे शरण मागत होते, ज्यामुळे जिन्नांच्या उदंडतेत अधिकच भर पडली.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّهُمْ ظَنُّوْا كَمَا ظَنَنْتُمْ اَنْ لَّنْ یَّبْعَثَ اللّٰهُ اَحَدًا ۟ۙ
७. आणि (मानवां) नी देखील जिन्नांप्रमाणे हे गृहीत धरले होते की अल्लाह कधीही कोणाला पाठविणार नाही (किंवा कोणाला दुसऱ्यांदा जिवंत करणार नाही).
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّا لَمَسْنَا السَّمَآءَ فَوَجَدْنٰهَا مُلِئَتْ حَرَسًا شَدِیْدًا وَّشُهُبًا ۟ۙ
८. आणि आम्ही आकाशाचे निरीक्षण करून पाहिले तेव्हा ते सक्त पहारेकऱ्यांनी आणि प्रखर अग्नि-शिखांनी (ज्वालांनी) भरलेले आढळले.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّا كُنَّا نَقْعُدُ مِنْهَا مَقَاعِدَ لِلسَّمْعِ ؕ— فَمَنْ یَّسْتَمِعِ الْاٰنَ یَجِدْ لَهٗ شِهَابًا رَّصَدًا ۟ۙ
९. आणि याच्यापूर्वी आम्ही गोष्टी (बोलणे) ऐकण्याकरिता आकाशात ठिकठिकाणी बसत असू, आता जो देखील कान लावतो, त्याला एक ज्वाला आपल्यावर टपून असल्याचे आढळते.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّا لَا نَدْرِیْۤ اَشَرٌّ اُرِیْدَ بِمَنْ فِی الْاَرْضِ اَمْ اَرَادَ بِهِمْ رَبُّهُمْ رَشَدًا ۟ۙ
१०. आणि आम्ही नाही जाणत की धरतीवर राहणाऱ्यांशी एखाद्या वाईट गोष्टीचा इरादा केला गेला आहे की त्यांच्या पालनकर्त्याचा इरादा त्यांच्याशी भलाईचा आहे.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّا مِنَّا الصّٰلِحُوْنَ وَمِنَّا دُوْنَ ذٰلِكَ ؕ— كُنَّا طَرَآىِٕقَ قِدَدًا ۟ۙ
११. आणि हे की (निःसंशय) आमच्यापैकी काही तर नेक सदाचारी आहेत आणि काही त्याच्या विपरीत आहेत. आम्ही अनेक प्रकारे विभागलेलो आहोत.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّا ظَنَنَّاۤ اَنْ لَّنْ نُّعْجِزَ اللّٰهَ فِی الْاَرْضِ وَلَنْ نُّعْجِزَهٗ هَرَبًا ۟ۙ
१२. आणि आम्हाला (आता) पूर्ण खात्री झाली की आम्ही अल्लाहला धरतीत कधीही विवश करू शकत नाही आणि ना आम्ही पळून जाऊन त्याला परास्त करू शकतो.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّا لَمَّا سَمِعْنَا الْهُدٰۤی اٰمَنَّا بِهٖ ؕ— فَمَنْ یُّؤْمِنْ بِرَبِّهٖ فَلَا یَخَافُ بَخْسًا وَّلَا رَهَقًا ۟ۙ
१३. आणि आम्ही मार्गदर्शनाची गोष्ट ऐकताच तिच्यावर ईमान राखले आणि जो देखील आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखेल, त्याला ना एखाद्या हानीचे भय आहे ना अत्याचारा (व दुःखा) चे.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّا مِنَّا الْمُسْلِمُوْنَ وَمِنَّا الْقٰسِطُوْنَ ؕ— فَمَنْ اَسْلَمَ فَاُولٰٓىِٕكَ تَحَرَّوْا رَشَدًا ۟
१४. आणि आमच्यापैकी काही मुस्लिम आहेत तर काही अन्यायी आहे, तेव्हा जे मुस्लिम झाले, त्यांनी सन्मार्ग शोधून घेतला.
আরবি তাফসীরসমূহ:
وَاَمَّا الْقٰسِطُوْنَ فَكَانُوْا لِجَهَنَّمَ حَطَبًا ۟ۙ
१५. आणि जे अत्याचारी आहेत, ते जहन्नमचे इंधन बनले.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنْ لَّوِ اسْتَقَامُوْا عَلَی الطَّرِیْقَةِ لَاَسْقَیْنٰهُمْ مَّآءً غَدَقًا ۟ۙ
१६. आणि हे की जर हे लोक सरळ मार्गावर दृढपणे राहिले असते, तर अवश्य आम्ही त्यांना भरपूर पाणी पाजले असते.
আরবি তাফসীরসমূহ:
لِّنَفْتِنَهُمْ فِیْهِ ؕ— وَمَنْ یُّعْرِضْ عَنْ ذِكْرِ رَبِّهٖ یَسْلُكْهُ عَذَابًا صَعَدًا ۟ۙ
१७. यासाठी की आम्ही यात त्यांची परीक्षा घ्यावी आणि जो मनुष्य आपल्या पालनकर्त्याच्या स्मरणापासून तोंड फिरविल, तर अल्लाह त्याला कठोर शिक्षा - यातनेत टाकील.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّ الْمَسٰجِدَ لِلّٰهِ فَلَا تَدْعُوْا مَعَ اللّٰهِ اَحَدًا ۟ۙ
१८. आणि हे की मस्जिद केवळ अल्लाहच्याचकरिता (खास) आहेत. तेव्हा अल्लाहसोबत दुसऱ्या कोणाला पुकारु नका.१
(१) ‘मसजिद’चा अर्थ सजदा करण्याचे स्थान. सजदा नमाजचा एक स्तंभ (अनिवार्य कृती) आहे. यास्तव नमाज पढण्याच्या ठिकाणास मस्जिद म्हणतात. आयतीचा अर्थ स्पष्ट आहे की मस्जिदीचा उद्देश केवळ एक अल्लाहची उपासना होय. यास्तव मस्जिदींमध्ये दुसऱ्या कोणाची उपासना, दुसऱ्या कोणाला दुआ (प्रार्थना), आर्जव, गाऱ्हाणे किंवा त्यास मदतीसाठी पुकारणे वैध नाही. जर इथेही अल्लाहखेरीज दुसऱ्या कोणाला पुकारले जाऊ लागले तर हे फार वाईट आणि मोठे अत्याचाराचे कृत्य ठरेल. परंतु दुर्दैवाने नामधारी मुसलमान आता मस्जिदींमध्येही अल्लाहसोबत इतरांना मदतीसाठी पुकारतात किंबहुना मस्जिदीत असे शिलालेख (तक्ते) लावून ठेवले आहेत की ज्यात अल्लाहला सोडून दुसऱ्यांना मदतीसाठी पुकारले गेले आहे.
আরবি তাফসীরসমূহ:
وَّاَنَّهٗ لَمَّا قَامَ عَبْدُ اللّٰهِ یَدْعُوْهُ كَادُوْا یَكُوْنُوْنَ عَلَیْهِ لِبَدًا ۟ؕ۠
१९. आणि जेव्हा अल्लाहचा दास (उपासक) त्याच्या उपासनेसाठी उभा राहिला तेव्हा निकट होते की ते जमावाजमावाने त्याच्यावर तुटून पडावेत. १
(१) ‘अब्दुल्लाह’ (अल्लाहचा दास) शी अभिप्रेत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होत. अर्थात जिन्न आणि मानव दोघे मिळून इच्छितात की अल्लाहचे हे दिव्य तेज (नूर) आपल्या फुंकींनी विझवावे. याचे दुसरेही अर्थ सांगितले गेले आहेत, परंतु इमाम इब्ने कसीर यांनी उपरोक्त अर्थास प्राधान्य दिले आहे.
আরবি তাফসীরসমূহ:
قُلْ اِنَّمَاۤ اَدْعُوْا رَبِّیْ وَلَاۤ اُشْرِكُ بِهٖۤ اَحَدًا ۟
२०. (तुम्ही) सांगा की, मी तर केवळ आपल्या पालनकर्त्यास पुकारतो आणि त्याच्यासोबत दुसऱ्या कोणाला सहभागी बनवित नाही.
আরবি তাফসীরসমূহ:
قُلْ اِنِّیْ لَاۤ اَمْلِكُ لَكُمْ ضَرًّا وَّلَا رَشَدًا ۟
२१. सांगा, मला तुमच्या बाबतीत कसल्याही लाभ-हानीचा अधिकार नाही.
আরবি তাফসীরসমূহ:
قُلْ اِنِّیْ لَنْ یُّجِیْرَنِیْ مِنَ اللّٰهِ اَحَدٌ ۙ۬— وَّلَنْ اَجِدَ مِنْ دُوْنِهٖ مُلْتَحَدًا ۟ۙ
२२. सांगा की मला अल्लाहपासून कधीही कोणी वाचवू शकत नाही, आणि मी कधीही त्याच्याखेरीज एखादे आश्रयस्थान प्राप्त करू शकत नाही.
আরবি তাফসীরসমূহ:
اِلَّا بَلٰغًا مِّنَ اللّٰهِ وَرِسٰلٰتِهٖ ؕ— وَمَنْ یَّعْصِ اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ فَاِنَّ لَهٗ نَارَ جَهَنَّمَ خٰلِدِیْنَ فِیْهَاۤ اَبَدًا ۟ؕ
२३. तथापि (माझे काम) तर केवळ अल्लाहची वाणी आणि त्याचा संदेश (लोकांना) पोहचविणे आहे (आता) जो देखील अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची अवज्ञा करील तर त्याच्यासाठी जहन्नमची आग आहे, जिच्यात असे लोक सदैव राहतील.
আরবি তাফসীরসমূহ:
حَتّٰۤی اِذَا رَاَوْا مَا یُوْعَدُوْنَ فَسَیَعْلَمُوْنَ مَنْ اَضْعَفُ نَاصِرًا وَّاَقَلُّ عَدَدًا ۟
२४. येथेपर्यंत की, जेव्हा ते तिला पाहून घेतील, जिचा त्यांना वायदा दिला जात आहे, तेव्हा निकट भविष्यात जाणून घेतील की कोणाचा सहाय्यक कमजोर आणि कोणाचा समूह (संख्येने) कमी आहे.
আরবি তাফসীরসমূহ:
قُلْ اِنْ اَدْرِیْۤ اَقَرِیْبٌ مَّا تُوْعَدُوْنَ اَمْ یَجْعَلُ لَهٗ رَبِّیْۤ اَمَدًا ۟
२५. (तुम्ही) सांगा की मला नाही माहीत की ज्या गोष्टीचा वायदा तुमच्याशी केला जात आहे, ती जवळ आहे की माझा पालनकर्ता त्याकरिता लांबची मुदत निर्धारित करील.
আরবি তাফসীরসমূহ:
عٰلِمُ الْغَیْبِ فَلَا یُظْهِرُ عَلٰی غَیْبِهٖۤ اَحَدًا ۟ۙ
२६. तोच परोक्ष ज्ञाता आहे आणि आपल्या परोक्ष (ज्ञाना) ने तो कोणालाही अवगत करवित नाही.
আরবি তাফসীরসমূহ:
اِلَّا مَنِ ارْتَضٰی مِنْ رَّسُوْلٍ فَاِنَّهٗ یَسْلُكُ مِنْ بَیْنِ یَدَیْهِ وَمِنْ خَلْفِهٖ رَصَدًا ۟ۙ
२७. मात्र त्या रसूल (पैगंबरा) खेरीज, ज्याला तो पसंत करील,१ यासाठी की त्याच्याही पुढे - मागे पहारेकरी (संरक्षक) तैनात करतो.
(१) अर्थात आपल्या पैगंबराला काही परोक्ष गोष्टींची खबर करवितो, ज्याचा संबंध एकतर संदेश पोहचविण्याशी असतो किंवा त्याच्या रसूल होणअयाचे पुरावे असतात. उघड आहे की अल्लाहद्वारे सूचित केल्याने रसूल गैब (परोक्ष) चा जाणणारा ठरू शकत नाही, कारण जर स्वतः पैगंबरालाही गैबचे ज्ञान असते, तर अल्लाहतर्फे त्याला गैबच्या गोष्टींची खबर देण्याची गरजच काय? अल्लाह आपले परोक्ष ज्ञान त्याच वेळी आपल्या रसूलवर प्रकट करतो, जेव्हा तो ते पहिल्यापासून जाणत नसतो, अर्थात हे निर्विवाद सत्य आहे की गैब (परोक्ष) ज्ञान केवळ अल्लाहलाच आहे. जसे की या ठिकाणी स्पष्टतः सांगितले गेले आहे.
আরবি তাফসীরসমূহ:
لِّیَعْلَمَ اَنْ قَدْ اَبْلَغُوْا رِسٰلٰتِ رَبِّهِمْ وَاَحَاطَ بِمَا لَدَیْهِمْ وَاَحْصٰی كُلَّ شَیْءٍ عَدَدًا ۟۠
२८. यासाठी की हे कळून घ्यावे की त्यांनी आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहचविलेत. अल्लाहने त्यांच्या निकटच्या गोष्टींना घेरून ठेवले आहे आणि प्रत्येक गोष्टीची गणना करून ठेवली आहे.
আরবি তাফসীরসমূহ:
 
অর্থসমূহের অনুবাদ সূরা: সূরা আল-জীন
সূরাসমূহের সূচী পৃষ্ঠার নাম্বার
 
কুরআনুল কারীমের অর্থসমূহের অনুবাদ - মারাঠি ভাষায় অনুবাদ - অনুবাদসমূহের সূচী

মারাঠি ভাষায় কুরআনুল কারীমের অর্থসমূহের অনুবাদ। অনুবাদ করেছেন মুহাম্মদ শফী আনসারী। আল-বিরর ফাউণ্ডেশন, মুম্বাই প্রকাশ করেছে।

বন্ধ