क़ुरआन के अर्थों का अनुवाद - मराठी अनुवाद * - अनुवादों की सूची


अर्थों का अनुवाद सूरा: सूरा फ़ातिर   आयत:

सूरा फ़ातिर

اَلْحَمْدُ لِلّٰهِ فَاطِرِ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ جَاعِلِ الْمَلٰٓىِٕكَةِ رُسُلًا اُولِیْۤ اَجْنِحَةٍ مَّثْنٰی وَثُلٰثَ وَرُبٰعَ ؕ— یَزِیْدُ فِی الْخَلْقِ مَا یَشَآءُ ؕ— اِنَّ اللّٰهَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟
१. त्या अल्लाकरिता समस्त स्तुती - प्रशंसा आहे, जो आकाशांना आणि धरतीला निर्माण करणारा आणि दोन दोन, तीन तीन आणि चार चार पंख बाळगणाऱ्या फरिश्त्यांना आपला संदेशवाहक बनविणारा आहे१ सृष्टीनिर्मितीत जे इच्छितो वाढवितो. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे.
(१) अभिप्रेत जिब्रील, मीकाईल, इस्राफील आणि इज्राईल हे फरिश्ते होत, ज्यांना अल्लाह पैगंबरांकडे किंवा अनेक महत्त्वपूर्ण कार्यासाठी संदेशवाहक बनवून पाठवितो. यांच्यापैकी कोणाचे दोन, कोणाचे तीन तर कोणाचे चार पंख आहेत, ज्याद्वारे ते धरतीवर येतात आणि धरतीवरून आकाशाकडे जातात.
अरबी तफ़सीरें:
مَا یَفْتَحِ اللّٰهُ لِلنَّاسِ مِنْ رَّحْمَةٍ فَلَا مُمْسِكَ لَهَا ۚ— وَمَا یُمْسِكْ ۙ— فَلَا مُرْسِلَ لَهٗ مِنْ بَعْدِهٖ ؕ— وَهُوَ الْعَزِیْزُ الْحَكِیْمُ ۟
२. अल्लाह जो दया - कृपा (द्वार) लोकांकरिता उघड करील तर त्यास कोणी बंद करणारा नाही आणि ज्याच्यासाठी बंद करील तर त्यानंतर त्यास कोणी सुरू करणारा (उघडणारा) नाही आणि तोच जबरदस्त हिकमतशाली आहे.
अरबी तफ़सीरें:
یٰۤاَیُّهَا النَّاسُ اذْكُرُوْا نِعْمَتَ اللّٰهِ عَلَیْكُمْ ؕ— هَلْ مِنْ خَالِقٍ غَیْرُ اللّٰهِ یَرْزُقُكُمْ مِّنَ السَّمَآءِ وَالْاَرْضِ ؕ— لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ؗ— فَاَنّٰی تُؤْفَكُوْنَ ۟
३. लोकांनो! तुमच्यावर अल्लाहने जे उपकार केले आहेत, त्यांचे स्मरण करा. काय अल्लाहखेरीज दुसराही कोणी निर्माता आहे, जो तुम्हाला आकाशातून आणि जमिनीपासून रोजी (आजिविका) देत असावा? त्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही, तेव्हा तुम्ही कोठे उलट जात आहात?
अरबी तफ़सीरें:
وَاِنْ یُّكَذِّبُوْكَ فَقَدْ كُذِّبَتْ رُسُلٌ مِّنْ قَبْلِكَ ؕ— وَاِلَی اللّٰهِ تُرْجَعُ الْاُمُوْرُ ۟
४. आणि जर ते तुम्हाला खोटे ठरवितात तर तुमच्या पूर्वीचे (सर्व) पैगंबरही खोटे ठरविले गेले आहेत आणि समस्त कार्ये अल्लाहच्याचकडे परतविले जातात.
अरबी तफ़सीरें:
یٰۤاَیُّهَا النَّاسُ اِنَّ وَعْدَ اللّٰهِ حَقٌّ فَلَا تَغُرَّنَّكُمُ الْحَیٰوةُ الدُّنْیَا ۥ— وَلَا یَغُرَّنَّكُمْ بِاللّٰهِ الْغَرُوْرُ ۟
५. हे लोकांनो! अल्लाहचा वायदा सच्चा आहे. ऐहिक जीवनाने तुम्हाला धोक्यात न टाकावे आणि ना दगाबाज (सैताना) ने तुम्हाला गफलतीत मग्न ठेवावे.
अरबी तफ़सीरें:
اِنَّ الشَّیْطٰنَ لَكُمْ عَدُوٌّ فَاتَّخِذُوْهُ عَدُوًّا ؕ— اِنَّمَا یَدْعُوْا حِزْبَهٗ لِیَكُوْنُوْا مِنْ اَصْحٰبِ السَّعِیْرِ ۟ؕ
६. (लक्षात ठेवा) सैतान तुमचा शत्रू आहे, तुम्ही त्याला शत्रूच जाणा, तो तर आपल्या टोळीला केवळ अशासाठी बोलवितो की ते सर्व जहन्नममध्ये जाणारे व्हावेत.
अरबी तफ़सीरें:
اَلَّذِیْنَ كَفَرُوْا لَهُمْ عَذَابٌ شَدِیْدٌ ؕ۬— وَالَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ لَهُمْ مَّغْفِرَةٌ وَّاَجْرٌ كَبِیْرٌ ۟۠
७. जे लोक काफिर (इन्कारी) झाले, त्यांच्याकरिता सक्त अज़ाब आहे आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले त्यांच्यासाठी क्षमा आणि मोठा चांगला मोबदला आहे.
अरबी तफ़सीरें:
اَفَمَنْ زُیِّنَ لَهٗ سُوْٓءُ عَمَلِهٖ فَرَاٰهُ حَسَنًا ؕ— فَاِنَّ اللّٰهَ یُضِلُّ مَنْ یَّشَآءُ وَیَهْدِیْ مَنْ یَّشَآءُ ۖؗ— فَلَا تَذْهَبْ نَفْسُكَ عَلَیْهِمْ حَسَرٰتٍ ؕ— اِنَّ اللّٰهَ عَلِیْمٌۢ بِمَا یَصْنَعُوْنَ ۟
८. काय तो मनुष्य, ज्याच्याकरिता त्याची दुष्कर्मे सुशोभित केली गेली आहेत तर तो त्यां (कर्मां) ना चांगले समजतो (काय तो मार्गदर्शन प्राप्त करणाऱ्या माणसा समान आहे?) (निश्चितच) अल्लाह ज्याला इच्छितो, मार्गभ्रष्ट करतो, आणि ज्याला इच्छितो मार्ग दाखवितो. तेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल दुःखी कष्टी होऊन आपला जीव कष्ट यातनेत टाकू नये. हे लोक जे काही करीत आहेत निःसंशय, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
अरबी तफ़सीरें:
وَاللّٰهُ الَّذِیْۤ اَرْسَلَ الرِّیٰحَ فَتُثِیْرُ سَحَابًا فَسُقْنٰهُ اِلٰی بَلَدٍ مَّیِّتٍ فَاَحْیَیْنَا بِهِ الْاَرْضَ بَعْدَ مَوْتِهَا ؕ— كَذٰلِكَ النُّشُوْرُ ۟
९. आणि अल्लाहच वाऱ्यांना वाढवितो, जे ढगांना उंच नेतात, मग आम्ही त्या ढगांना कोरड्या जमिनीकडे नेतो आणि त्याद्वारे त्या जमिनीला तिच्या मृत्युनंतर (पुन्हा) जिवंत करतो. अशाच प्रकारे दुसऱ्यांदा जिवंत होऊन उठणेही आहे.
अरबी तफ़सीरें:
مَنْ كَانَ یُرِیْدُ الْعِزَّةَ فَلِلّٰهِ الْعِزَّةُ جَمِیْعًا ؕ— اِلَیْهِ یَصْعَدُ الْكَلِمُ الطَّیِّبُ وَالْعَمَلُ الصَّالِحُ یَرْفَعُهٗ ؕ— وَالَّذِیْنَ یَمْكُرُوْنَ السَّیِّاٰتِ لَهُمْ عَذَابٌ شَدِیْدٌ ؕ— وَمَكْرُ اُولٰٓىِٕكَ هُوَ یَبُوْرُ ۟
१०. जो मनुष्य मान-सन्मान प्राप्त करू इच्छित असेल, तर (त्याने जाणून घ्यावे की) समस्त मान-प्रतिष्ठा अल्लाहकरिताच आहे. समस्त पवित्र वचने त्याच्याचकडे चढतात आणि सत्कर्म त्यांना उंचविते, आणि जे लोक दुष्कर्मांच्या कट कारस्थानात व्यस्त राहतात, त्यांच्यासाठी मोठा सक्त अज़ाब आहे आणि त्यांचे हे पाखंड नाश पावेल.
अरबी तफ़सीरें:
وَاللّٰهُ خَلَقَكُمْ مِّنْ تُرَابٍ ثُمَّ مِنْ نُّطْفَةٍ ثُمَّ جَعَلَكُمْ اَزْوَاجًا ؕ— وَمَا تَحْمِلُ مِنْ اُ وَلَا تَضَعُ اِلَّا بِعِلْمِهٖ ؕ— وَمَا یُعَمَّرُ مِنْ مُّعَمَّرٍ وَّلَا یُنْقَصُ مِنْ عُمُرِهٖۤ اِلَّا فِیْ كِتٰبٍ ؕ— اِنَّ ذٰلِكَ عَلَی اللّٰهِ یَسِیْرٌ ۟
११. लोक हो! अल्लाहने तुम्हाल मातीपासून निर्माण केले, मग वीर्यापासून, मग तुम्हाला जोडी (जोडपे नर-नारी) बनविले. स्त्रियांचे गर्भ धारण करणे आणि बाळाचे जन्म घेणे, या सर्वांचे त्याला ज्ञान आहे, आणि कोणताही आयुष्यमान दीर्घायुष्य प्राप्त करीत नाही आणि ना कोणाचे आयुष्य घडते, परंतु हे सर्व एका ग्रंथात अस्तित्वात आहे. अल्लाकरिता ही गोष्ट फार सोपी आहे.
अरबी तफ़सीरें:
وَمَا یَسْتَوِی الْبَحْرٰنِ ۖۗ— هٰذَا عَذْبٌ فُرَاتٌ سَآىِٕغٌ شَرَابُهٗ وَهٰذَا مِلْحٌ اُجَاجٌ ؕ— وَمِنْ كُلٍّ تَاْكُلُوْنَ لَحْمًا طَرِیًّا وَّتَسْتَخْرِجُوْنَ حِلْیَةً تَلْبَسُوْنَهَا ۚ— وَتَرَی الْفُلْكَ فِیْهِ مَوَاخِرَ لِتَبْتَغُوْا مِنْ فَضْلِهٖ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُوْنَ ۟
१२. आणि दोन समुद्र समान नाहीत. हा गोड आहे, तहान भागवितो, प्यायला चांगला आणि तो दुसरा खारट आहे, कडू. तुम्ही या दोघांपासून ताजे मांस खाता आणि ते दागिने काढता, ज्यांना तुम्ही अंगावर घालता आणि तुम्ही पाहता की मोठमोठ्या नावा, पाण्याला छेदणाऱ्या, त्या समुद्रात आहे, यासाठी की तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा आणि यासाठी की तुम्ही त्याचे आभार मानावेत.
अरबी तफ़सीरें:
یُوْلِجُ الَّیْلَ فِی النَّهَارِ وَیُوْلِجُ النَّهَارَ فِی الَّیْلِ ۙ— وَسَخَّرَ الشَّمْسَ وَالْقَمَرَ ۖؗ— كُلٌّ یَّجْرِیْ لِاَجَلٍ مُّسَمًّی ؕ— ذٰلِكُمُ اللّٰهُ رَبُّكُمْ لَهُ الْمُلْكُ ؕ— وَالَّذِیْنَ تَدْعُوْنَ مِنْ دُوْنِهٖ مَا یَمْلِكُوْنَ مِنْ قِطْمِیْرٍ ۟ؕ
१३. तो रात्रीला दिवसात आणि दिवसाला रात्रीत दाखल करतो आणि सूर्य व चंद्राला त्यानेच कामास लावले आहे. प्रत्येक एका निर्धारित अवधीपावेतो चालत आहे. हाच अल्लाह होय, तुम्हा सर्वांचा पालनकर्ता. त्याचीच राज्य सत्ता आहे, आणि ज्यांना तुम्ही त्याच्याखेरीज पुकारत आहात, ते तर खजुरीच्या बी सालपटाचेही मालक नाहीत.
अरबी तफ़सीरें:
اِنْ تَدْعُوْهُمْ لَا یَسْمَعُوْا دُعَآءَكُمْ ۚ— وَلَوْ سَمِعُوْا مَا اسْتَجَابُوْا لَكُمْ ؕ— وَیَوْمَ الْقِیٰمَةِ یَكْفُرُوْنَ بِشِرْكِكُمْ ؕ— وَلَا یُنَبِّئُكَ مِثْلُ خَبِیْرٍ ۟۠
१४. जर तुम्ही त्यांना पुकाराल तर ते तुमची पुकार ऐकणारच नाहीत. आणि जर (समजा) ऐकूनही घेतील तर कबूल करणार नाहीत. किंबहुना कयामतच्या दिवशी तुमच्या शिर्क (अनेकईश्वरउपासना ) चा साफ इन्कार करतील१ आणि तुम्हाला कोणीही अल्लाहसारखा जाणकार (वास्तवपूर्ण) खबरी देणार नाही.
(१) या आयतीद्वारे हेही कळून येते की अल्लाहखेरीज ज्यांची भक्ती उपासना केली जाते, त्या सर्व पाषाणाच्या मूर्त्याच नसतील, किंबहुना समज राखणारे (फरिश्ते, जिन्न, सैतान आणि नेक लोक) देखील असतील तेव्हा तेही इन्कार करतील आणि हेही कळाले की त्यांना गरजपूर्तीकरिता पुकारणे शिर्क आहे.
अरबी तफ़सीरें:
یٰۤاَیُّهَا النَّاسُ اَنْتُمُ الْفُقَرَآءُ اِلَی اللّٰهِ ۚ— وَاللّٰهُ هُوَ الْغَنِیُّ الْحَمِیْدُ ۟
१५. लोक हो! तुम्ही अल्लाहचे भिकारी आहात आणि अल्लाहच निःस्पृह (गरज नसलेला) प्रशंसनीय आहे.
अरबी तफ़सीरें:
اِنْ یَّشَاْ یُذْهِبْكُمْ وَیَاْتِ بِخَلْقٍ جَدِیْدٍ ۟ۚ
१६. जर त्याने इच्छिले तर तुमचा सर्वनाश करून टाकील आणि एक नवी निर्मिती (सृष्टी) निर्माण करील.
अरबी तफ़सीरें:
وَمَا ذٰلِكَ عَلَی اللّٰهِ بِعَزِیْزٍ ۟
१७. आणि ही गोष्ट अल्लाहकरिता काहीच कठीण नाही.
अरबी तफ़सीरें:
وَلَا تَزِرُ وَازِرَةٌ وِّزْرَ اُخْرٰی ؕ— وَاِنْ تَدْعُ مُثْقَلَةٌ اِلٰی حِمْلِهَا لَا یُحْمَلْ مِنْهُ شَیْءٌ وَّلَوْ كَانَ ذَا قُرْبٰی ؕ— اِنَّمَا تُنْذِرُ الَّذِیْنَ یَخْشَوْنَ رَبَّهُمْ بِالْغَیْبِ وَاَقَامُوا الصَّلٰوةَ ؕ— وَمَنْ تَزَكّٰی فَاِنَّمَا یَتَزَكّٰی لِنَفْسِهٖ ؕ— وَاِلَی اللّٰهِ الْمَصِیْرُ ۟
१८. आणि कोणीही ओझे उचलणारा, दुसऱ्याचे ओझे उचलणार नाही आणि जर कोणी जास्त वजनाचे ओझे बाळगणारा आपला भार उचलण्याकरिता दुसऱ्या कोणाला बोलविल तर तो त्यातून काहीच उचलू शकणार नाही, मग तो जवळचा नातेवाईक का असेना. तुम्ही केवळ अशांनाच सावध करू शकता, जे पाहिल्याविनाच आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात आणि नमाज नियमितपणे पढतात आणि जो पाक (स्वच्छ - शुद्ध) होईल, तो आपल्याच फायद्यासाठी पाक होईल आणि (शेवटी) अल्लाहकडेच परतून जायचे आहे.
अरबी तफ़सीरें:
وَمَا یَسْتَوِی الْاَعْمٰی وَالْبَصِیْرُ ۟ۙ
१९. आणि आंधळा व डोळस दोन्ही समान नाहीत.
अरबी तफ़सीरें:
وَلَا الظُّلُمٰتُ وَلَا النُّوْرُ ۟ۙ
२०. आणि ना अंधार आणि ना प्रकाश.
अरबी तफ़सीरें:
وَلَا الظِّلُّ وَلَا الْحَرُوْرُ ۟ۚ
२१. आणि ना सावली आणि ना ऊन.
अरबी तफ़सीरें:
وَمَا یَسْتَوِی الْاَحْیَآءُ وَلَا الْاَمْوَاتُ ؕ— اِنَّ اللّٰهَ یُسْمِعُ مَنْ یَّشَآءُ ۚ— وَمَاۤ اَنْتَ بِمُسْمِعٍ مَّنْ فِی الْقُبُوْرِ ۟
२२. आणि जीवित व मृत दोघे समान असू शकत नाही, आणि अल्लाह ज्याला इच्छितो ऐकवितो, आणि तुम्ही त्या लोकांना ऐकवू शकत नाही, जे कबरींमध्ये आहेत.
अरबी तफ़सीरें:
اِنْ اَنْتَ اِلَّا نَذِیْرٌ ۟
२३. तुम्ही तर फक्त खबरदार करणारे आहात.
अरबी तफ़सीरें:
اِنَّاۤ اَرْسَلْنٰكَ بِالْحَقِّ بَشِیْرًا وَّنَذِیْرًا ؕ— وَاِنْ مِّنْ اُمَّةٍ اِلَّا خَلَا فِیْهَا نَذِیْرٌ ۟
२४. आम्हीच तुम्हाला सत्यासह खूशखबर ऐकविणारा आणि भय दाखविणारा बनवून पाठविले आहे आणि कोणताही जनसमुदाय असा होऊन गेला नाही की ज्यात एखादा खबरदार करणारा आला नसावा.
अरबी तफ़सीरें:
وَاِنْ یُّكَذِّبُوْكَ فَقَدْ كَذَّبَ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ ۚ— جَآءَتْهُمْ رُسُلُهُمْ بِالْبَیِّنٰتِ وَبِالزُّبُرِ وَبِالْكِتٰبِ الْمُنِیْرِ ۟
२५. आणि जर हे लोक तुम्हाला खोटे ठरवतील तर त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले होते, त्यांच्याजवळदेखील त्यांचे पैगंबर मोजिजे (ईशचमत्कार), सहीफे (पोथी) आणि स्पष्ट ग्रंथ घेऊन आले होते.
अरबी तफ़सीरें:
ثُمَّ اَخَذْتُ الَّذِیْنَ كَفَرُوْا فَكَیْفَ كَانَ نَكِیْرِ ۟۠
२६. मग मी त्या काफिरांना (सत्य-विरोधकांना) धरले, तर कशी होती माझी शिक्षा!
अरबी तफ़सीरें:
اَلَمْ تَرَ اَنَّ اللّٰهَ اَنْزَلَ مِنَ السَّمَآءِ مَآءً ۚ— فَاَخْرَجْنَا بِهٖ ثَمَرٰتٍ مُّخْتَلِفًا اَلْوَانُهَا ؕ— وَمِنَ الْجِبَالِ جُدَدٌ بِیْضٌ وَّحُمْرٌ مُّخْتَلِفٌ اَلْوَانُهَا وَغَرَابِیْبُ سُوْدٌ ۟
२७. काय तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही की अल्लाहने आकाशातून पाणी अवतरित केले, मग आम्ही त्याच्याद्वारे अनेक रंगाची फळे निर्माण केली आणि पर्वतांचेही अनेक हिस्से आहेत सफेद आणि लाल की त्यांचे देखील अनेक रंग आहेत आणि गडद काळेही.
अरबी तफ़सीरें:
وَمِنَ النَّاسِ وَالدَّوَآبِّ وَالْاَنْعَامِ مُخْتَلِفٌ اَلْوَانُهٗ كَذٰلِكَ ؕ— اِنَّمَا یَخْشَی اللّٰهَ مِنْ عِبَادِهِ الْعُلَمٰٓؤُا ؕ— اِنَّ اللّٰهَ عَزِیْزٌ غَفُوْرٌ ۟
२८. आणि अशाच प्रकारे माणसांमध्ये, जनावरांमध्ये आणि चतुष्पाद प्राण्यांमध्येही काही असे आहेत ज्यांचे रंग वेगवेगळे आहेत. अल्लाहशी त्याचे तेच दास भय राखतात, जे ज्ञान बाळगतात. वास्तविक अल्लाह मोठा वर्चस्वशाली, माफ करणारा आहे.
अरबी तफ़सीरें:
اِنَّ الَّذِیْنَ یَتْلُوْنَ كِتٰبَ اللّٰهِ وَاَقَامُوا الصَّلٰوةَ وَاَنْفَقُوْا مِمَّا رَزَقْنٰهُمْ سِرًّا وَّعَلَانِیَةً یَّرْجُوْنَ تِجَارَةً لَّنْ تَبُوْرَ ۟ۙ
२९. जे लोक अल्लाहच्या ग्रंथाचे पठण (तिलावत) करतात आणि नमाज नित्य नेमाने पढतात आणि जे काही आम्ही त्यांना प्रदान केले आहे त्यातून गुप्तपणे आणि उघडपणे खर्च करतात, ते अशा व्यापाराची आशा बाळगतात, जो कधीही तोट्यात राहणार नाही.
अरबी तफ़सीरें:
لِیُوَفِّیَهُمْ اُجُوْرَهُمْ وَیَزِیْدَهُمْ مِّنْ فَضْلِهٖ ؕ— اِنَّهٗ غَفُوْرٌ شَكُوْرٌ ۟
३०. यासाठी की त्यांना त्यांचा मोबदला पुरेपूर दिला जावा आणि त्यांना आपल्या कृपेने आणखी जास्त प्रदान करावे. निःसंशय, तो मोठा माफ करणारा, गुणग्राहक आहे.
अरबी तफ़सीरें:
وَالَّذِیْۤ اَوْحَیْنَاۤ اِلَیْكَ مِنَ الْكِتٰبِ هُوَ الْحَقُّ مُصَدِّقًا لِّمَا بَیْنَ یَدَیْهِ ؕ— اِنَّ اللّٰهَ بِعِبَادِهٖ لَخَبِیْرٌ بَصِیْرٌ ۟
३१. आणि हा ग्रंथ जो आम्ही तुमच्याकडे वहयी (प्रकाशना) द्वारे पाठविला आहे तो पूर्णतः सत्य आहे, जो आपल्या पूर्वीच्या ग्रंथांचीही पुष्टी करतो. निःसंशय, अल्लाह आपल्या दासांची पूर्ण माहिती ठेवणारा, चांगल्या प्रकारे पाहणारा आहे.
अरबी तफ़सीरें:
ثُمَّ اَوْرَثْنَا الْكِتٰبَ الَّذِیْنَ اصْطَفَیْنَا مِنْ عِبَادِنَا ۚ— فَمِنْهُمْ ظَالِمٌ لِّنَفْسِهٖ ۚ— وَمِنْهُمْ مُّقْتَصِدٌ ۚ— وَمِنْهُمْ سَابِقٌ بِالْخَیْرٰتِ بِاِذْنِ اللّٰهِ ؕ— ذٰلِكَ هُوَ الْفَضْلُ الْكَبِیْرُ ۟ؕ
३२. मग (या) ग्रंथाचा उत्तराधिकारी आम्ही त्या लोकांना बनविले, ज्यांना आम्ही आपल्या दासांमधून निवडून घेतले. मग काही तर आपल्या प्राणांवर अत्याचार करणारे आहेत, आणि काही मध्यम दर्जाचे आहेत आणि त्यांच्यापैकी काही अल्लाहने दिलेल्या तौफिक (सुबुद्धी) ने सत्कर्मात पुढेच जात राहतात. हा फार मोठा अनुग्रह आहे.
अरबी तफ़सीरें:
جَنّٰتُ عَدْنٍ یَّدْخُلُوْنَهَا یُحَلَّوْنَ فِیْهَا مِنْ اَسَاوِرَ مِنْ ذَهَبٍ وَّلُؤْلُؤًا ۚ— وَلِبَاسُهُمْ فِیْهَا حَرِیْرٌ ۟
३३. सदैव काळ राहण्याच्या त्या बागा आहेत, ज्यात हे लोक प्रवेश करतील, तिथे त्यांना सोन्याची कांकणे आणि मोती (अंगावर) घातली जातील आणि तिथे त्यांची वस्त्रे रेशमाची असतील.
अरबी तफ़सीरें:
وَقَالُوا الْحَمْدُ لِلّٰهِ الَّذِیْۤ اَذْهَبَ عَنَّا الْحَزَنَ ؕ— اِنَّ رَبَّنَا لَغَفُوْرٌ شَكُوْرُ ۟ۙ
३४. आणि म्हणतील की अल्लाहचे अनंत उपकार आहेत, ज्याने आमच्यापासून दुःख दूर केले. निःसंशय, आमचा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि कदर जाणणारा आहे.
अरबी तफ़सीरें:
١لَّذِیْۤ اَحَلَّنَا دَارَ الْمُقَامَةِ مِنْ فَضْلِهٖ ۚ— لَا یَمَسُّنَا فِیْهَا نَصَبٌ وَّلَا یَمَسُّنَا فِیْهَا لُغُوْبٌ ۟
३५. ज्याने आम्हाला आपल्या कृपेने सदैव काळ राहण्याच्या ठिकाणी उतरविले, जिथे ना आम्हाला काही कष्ट पोहोचेल आणि ना कसला थकवा जाणवेल.
अरबी तफ़सीरें:
وَالَّذِیْنَ كَفَرُوْا لَهُمْ نَارُ جَهَنَّمَ ۚ— لَا یُقْضٰی عَلَیْهِمْ فَیَمُوْتُوْا وَلَا یُخَفَّفُ عَنْهُمْ مِّنْ عَذَابِهَا ؕ— كَذٰلِكَ نَجْزِیْ كُلَّ كَفُوْرٍ ۟ۚ
३६. आणि जे लोक काफिर (इन्कारी) आहेत, त्यांच्यासाठी जहन्नमची आग आहे, ना तर त्यांना मृत्यु येईल की ते मरुन जावेत आणि ना जहन्नमची शिक्षाच कमी केली जाईल. आम्ही प्रत्येक काफिराला अशीच शिक्षा - यातना देतो.
अरबी तफ़सीरें:
وَهُمْ یَصْطَرِخُوْنَ فِیْهَا ۚ— رَبَّنَاۤ اَخْرِجْنَا نَعْمَلْ صَالِحًا غَیْرَ الَّذِیْ كُنَّا نَعْمَلُ ؕ— اَوَلَمْ نُعَمِّرْكُمْ مَّا یَتَذَكَّرُ فِیْهِ مَنْ تَذَكَّرَ وَجَآءَكُمُ النَّذِیْرُ ؕ— فَذُوْقُوْا فَمَا لِلظّٰلِمِیْنَ مِنْ نَّصِیْرٍ ۟۠
३७. आणि ते लोक त्यात (जहन्नममध्ये) मोठमोठ्याने ओरडतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला (यातून) बाहेर काढ आम्ही चांगले कर्म करू, त्या कर्मांखेरीज, जे आम्ही करीत होतो (अल्लाह फर्माविल) की काय आम्ही तुम्हाला एवढे आयुष्य दिले नव्हते की ज्याला समजून घ्यायचे असते, तो समजू शकत होता१ आणि तुमच्याजवळ खबरदार करणाराही पोहचला होता,२ तेव्हा आता गोडी चाखा (अशा) जुलमी अत्याचारी लोकांचा कोणीही सहाय्य करणारा नाही.
(१) यास अभिप्रेत केवढे आयुष्य आहे? भाष्यकारांनी वेगवेगळी आयुष्ये सांगितली आहेत. काहींनी काही हदीस वाचकांचा पुरावा देत म्हटले आहे की ६० वर्षांचे आयुष्य अभिप्रेत आहे. (इब्ने कसीर) परंतु आमच्या मते आयुष्य निश्चित करणे उचित नाही, कारण आयुष्य निश्चित करणे उचित नाही, कारण आयुष्य अनेक प्रकारचे असते. कोणी तरुण वयात कोणी प्रैाझ वयात तर कोणी वृद्धावस्थेत मरण पावतो. मग हा काळही गेलेल्या क्षणासारखा कमी होत नाही, किंबहुना प्रत्येक अवधी विशेषतः दीर्घ असतो. उदा. तारुण्याचा काळ वयस्क होण्यापासून पौढहोईपर्यंत आणि पौढहोण्याचा काळ वृद्ध होईपर्यंत आणि वृद्धावस्थेचा काळ मृत्युपावेत असतो. कोणालाही विचार चिंतनासाठी, बोध प्राप्तीसाठी आणि प्रभावित होण्यासाठी काही वर्षे, एखाद्याला त्याहून जास्त तर कोणाला त्याहूनही अधिक समय लाभतो आणि सर्वांना हा प्रश्न विचारणे योग्य ठरेल की आम्ही तुला एवढे आयुष्य दिले मग तू सत्य समजून घेण्याचा आणि ते प्राप्त करण्याचा प्रयत्न का केला नाहीस? (२) यास अभिप्रेत अंतिम पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होत.
अरबी तफ़सीरें:
اِنَّ اللّٰهَ عٰلِمُ غَیْبِ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— اِنَّهٗ عَلِیْمٌۢ بِذَاتِ الصُّدُوْرِ ۟
३८. निःसंशय, अल्लाह आकाशांच्या आणि जमिनीच्या लपलेल्या वस्तूंना जाणणारा आहे. निःसंशय, तो छातीतल्या (मनातल्या) गोष्टींनाही जाणणारा आहे.
अरबी तफ़सीरें:
هُوَ الَّذِیْ جَعَلَكُمْ خَلٰٓىِٕفَ فِی الْاَرْضِ ؕ— فَمَنْ كَفَرَ فَعَلَیْهِ كُفْرُهٗ ؕ— وَلَا یَزِیْدُ الْكٰفِرِیْنَ كُفْرُهُمْ عِنْدَ رَبِّهِمْ اِلَّا مَقْتًا ۚ— وَلَا یَزِیْدُ الْكٰفِرِیْنَ كُفْرُهُمْ اِلَّا خَسَارًا ۟
३९. तोच असा आहे, ज्याने तुम्हाला धरतीवर बसविले, तेव्हा जो मनुष्य कुप्र (इन्कार) करील तर त्याच्या कुप्रचे ओझे त्याच्यावरच येईल आणि काफिर लोकांकरिता, त्यांचा इन्कार त्यांच्या पालनकर्त्याजवळ क्रोध वाढविण्याचेच कारण ठरतो आणि काफिरांसाठी त्यांचा इन्कार नुकसान वाढविण्याचीच सबब ठरतो.
अरबी तफ़सीरें:
قُلْ اَرَءَیْتُمْ شُرَكَآءَكُمُ الَّذِیْنَ تَدْعُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ ؕ— اَرُوْنِیْ مَاذَا خَلَقُوْا مِنَ الْاَرْضِ اَمْ لَهُمْ شِرْكٌ فِی السَّمٰوٰتِ ۚ— اَمْ اٰتَیْنٰهُمْ كِتٰبًا فَهُمْ عَلٰی بَیِّنَتٍ مِّنْهُ ۚ— بَلْ اِنْ یَّعِدُ الظّٰلِمُوْنَ بَعْضُهُمْ بَعْضًا اِلَّا غُرُوْرًا ۟
४०. (तुम्ही) सांगा की तुम्ही आपल्या (ठरविलेल्या) सहभागी ईश्वरांची अवस्था तर सांगा, त्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारीत असता, अर्थात मला हे सांगा की त्यांनी धरतीचा कोणता (हिस्सा) बनविला आहे किंवा त्यांचा आकाशात काही सहभाग आहे अथवा आम्ही त्यांंना एखादा ग्रंथ दिला आहे की हे त्याच्या पुराव्यावर अटळ असावेत? नव्हे, किंबहुना हे अत्याचारी एकमेकांशी केवळ फसवणुकीच्या गोष्टींचे वायदे करीत असतात.
अरबी तफ़सीरें:
اِنَّ اللّٰهَ یُمْسِكُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ اَنْ تَزُوْلَا ۚ۬— وَلَىِٕنْ زَالَتَاۤ اِنْ اَمْسَكَهُمَا مِنْ اَحَدٍ مِّنْ بَعْدِهٖ ؕ— اِنَّهٗ كَانَ حَلِیْمًا غَفُوْرًا ۟
४१. निःसंशय, अल्लाहने आकाशांना आणि जमिनीला धरून ठेवले आहे की ते डगमगू नयेत आणि जर ते डगमगले तर मग अल्लाहखेरीज कोणी त्यांना धरूही शकत नाही. निःसंशय तो मोठा सहनशील, माफ करणारा आहे.
अरबी तफ़सीरें:
وَاَقْسَمُوْا بِاللّٰهِ جَهْدَ اَیْمَانِهِمْ لَىِٕنْ جَآءَهُمْ نَذِیْرٌ لَّیَكُوْنُنَّ اَهْدٰی مِنْ اِحْدَی الْاُمَمِ ۚ— فَلَمَّا جَآءَهُمْ نَذِیْرٌ مَّا زَادَهُمْ اِلَّا نُفُوْرَا ۟ۙ
४२. आणि या काफिर लोकांनी मोठी दृढशपथ घेतली होती की जर त्यांच्याजवळ कोणी खबरदार करणारा आला तर ते प्रत्येक समुदाया (उम्मत) पेक्षा जास्त मार्गदर्शन प्राप्त करणारे बनतील, मग जेव्हा त्यांच्याजवळ एक पैगंबर येऊन पोहोचला तेव्हा त्यांच्या तिरस्कारातच प्रगति झाली.
अरबी तफ़सीरें:
١سْتِكْبَارًا فِی الْاَرْضِ وَمَكْرَ السَّیِّئ ؕ— وَلَا یَحِیْقُ الْمَكْرُ السَّیِّئُ اِلَّا بِاَهْلِهٖ ؕ— فَهَلْ یَنْظُرُوْنَ اِلَّا سُنَّتَ الْاَوَّلِیْنَ ۚ— فَلَنْ تَجِدَ لِسُنَّتِ اللّٰهِ تَبْدِیْلًا ۚ۬— وَلَنْ تَجِدَ لِسُنَّتِ اللّٰهِ تَحْوِیْلًا ۟
४३. जगात स्वतःला मोठा समजल्यामुळे आणि त्यांच्या वाईट प्रयत्नांमुळे आणि वाईट प्रयत्न करणाऱ्यांची शिक्षा ते प्रयत्न करणाऱ्यांनाच भोगावी लागते तर काय हे त्याच व्यवहाराच्या प्रतीक्षेत आहेत, जो पूर्वीच्या लोकांशी केला जात राहिला? तेव्हा तुम्हाला अल्लाहच्या पद्धतीत कधीही बदल आढळणार नाही आणि तुम्हाला अल्लाहच्या नियमात कधी बदल होत असलेला आढळणार नाही.
अरबी तफ़सीरें:
اَوَلَمْ یَسِیْرُوْا فِی الْاَرْضِ فَیَنْظُرُوْا كَیْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ وَكَانُوْۤا اَشَدَّ مِنْهُمْ قُوَّةً ؕ— وَمَا كَانَ اللّٰهُ لِیُعْجِزَهٗ مِنْ شَیْءٍ فِی السَّمٰوٰتِ وَلَا فِی الْاَرْضِ ؕ— اِنَّهٗ كَانَ عَلِیْمًا قَدِیْرًا ۟
४४. काय हे लोक धरतीवर हिंडले फिरले नाहीत की त्यांनी पाहिले असते की जे लोक यांच्यापूर्वी होऊन गेलेत, त्यांचा अंत कसा झाला. वास्तविक ते लोक यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली होते. आणि आकाशांमध्ये व धरतीवर अशी कोणतीही वस्तू नाही जी अल्लाहला लाचार करील. तो सर्व काही जाणणारा, मोठा सामर्थ्यशाली आहे.
अरबी तफ़सीरें:
وَلَوْ یُؤَاخِذُ اللّٰهُ النَّاسَ بِمَا كَسَبُوْا مَا تَرَكَ عَلٰی ظَهْرِهَا مِنْ دَآبَّةٍ وَّلٰكِنْ یُّؤَخِّرُهُمْ اِلٰۤی اَجَلٍ مُّسَمًّی ۚ— فَاِذَا جَآءَ اَجَلُهُمْ فَاِنَّ اللّٰهَ كَانَ بِعِبَادِهٖ بَصِیْرًا ۟۠
४५. आणि जर अल्लाह, लोकांना त्यांच्या कर्मांमुळे त्वरित पकडीत घेऊ लागला असता तर संपूर्ण धरतीवर एक जीवदेखील सोडला नसता तथापि अल्लाह त्यांना एका निर्धारित समयापर्यंत सवड देत आहे, तर जेव्हा त्यांची ती वेळ येऊन पोहोचेल तेव्हा अल्लाह आपल्या दासांना स्वतः पाहून घेईल.
अरबी तफ़सीरें:
 
अर्थों का अनुवाद सूरा: सूरा फ़ातिर
सूरों की सूची पृष्ठ संख्या
 
क़ुरआन के अर्थों का अनुवाद - मराठी अनुवाद - अनुवादों की सूची

पवित्र क़ुरआन के अर्थों का मराठी अनुवाद। अनुवाद मुहम्मद शफ़ी अंसारी ने किया है और अल-बिर्र संस्था मुंबई ने प्रकाशित किया है।

बंद करें