Fassarar Ma'anonin Alqura'ni - Fassara AlMaratiyah - Muhammad Shafi' al’Ansari

external-link copy
33 : 13

اَفَمَنْ هُوَ قَآىِٕمٌ عَلٰی كُلِّ نَفْسٍ بِمَا كَسَبَتْ ۚ— وَجَعَلُوْا لِلّٰهِ شُرَكَآءَ ؕ— قُلْ سَمُّوْهُمْ ؕ— اَمْ تُنَبِّـُٔوْنَهٗ بِمَا لَا یَعْلَمُ فِی الْاَرْضِ اَمْ بِظَاهِرٍ مِّنَ الْقَوْلِ ؕ— بَلْ زُیِّنَ لِلَّذِیْنَ كَفَرُوْا مَكْرُهُمْ وَصُدُّوْا عَنِ السَّبِیْلِ ؕ— وَمَنْ یُّضْلِلِ اللّٰهُ فَمَا لَهٗ مِنْ هَادٍ ۟

३३. तर काय तो अल्लाह जो समाचार घेणारा आहे प्रत्येक माणसाचा त्याने केलेल्या कर्माबद्दल, आणि त्या लोकांनी अल्लाहचे भागीदार ठरविले आहेत. सांगा, जरा त्यांची नावे तर सांगा, किंवा अल्लाहला तुम्ही त्या गोष्टी सांगत आहात, ज्या तो धरतीवर जाणतच नाही, किंवा केवळ वरवरच्या गोष्टी बनवित आहात.१ खरी गोष्ट अशी की कुप्र (इन्कार) करणाऱ्यांकरिता, त्यांची कपट-कारस्थाने भलेही चांगली दाखविली गेली असोत आणि त्यांना सत्य मार्गापासून रोखले गेले आहे आणि ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करील, त्याला मार्ग दाखविणारा कोणीही नाही. info

(१) या ठिकाणी मूळ शब्द (जाहिर), कल्पना या अर्थाने आहे. अर्थात या त्यांच्या केवळ काल्पनिक गोष्टी आहेत. अर्थात हे की तुम्ही या आराध्य दैवतांची पूजा या विचाराने करता की हे तुम्हाला लाभ हानी पोहचवू शकतात आणि तुम्ही त्यांची नावेदेखील देवता ठेवलेली आहेत. जरी ही नावे तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी ठेवली आहेत, ज्यांचे कोणतेही प्रमाण अल्लाहने अवतरित केले नाही. हे केवळ कल्पना आणि मनाला आवडेल तसे करतात. (सूरह अल्‌ नज्म-२३)

التفاسير: