Превод на значењата на Благородниот Куран - Превод на маратски - Мухамед Шафи Енсари

external-link copy
179 : 2

وَلَكُمْ فِی الْقِصَاصِ حَیٰوةٌ یّٰۤاُولِی الْاَلْبَابِ لَعَلَّكُمْ تَتَّقُوْنَ ۟

१७९. बुद्धिमानांनो! किसास (हत्यादंडा) मध्ये तुमच्याकरिता जीवन आहे. या कारणाने तुम्ही (हत्या करण्यापासून) स्वतःला रोखाल.१ info

(१) जेव्हा हत्या करणाऱ्याला ही भीती असेल की हत्येच्या बदली त्यालाही ठार केले जाईल, तर तो कोणाचीही हत्या करण्याचे धाडस करणार नाही आणि ज्या समाजात हत्येच्या बदल्यात हा नियम लागू होतो, तिथे ही भीती समाजाला हत्या आणि रक्तपातापासून सुरक्षित राखते. ज्यामुळे समाजात खूप शांती सुबत्ता राहते. याचे अवलोकन सऊदी अरबच्या समाजात केले जाऊ शकते. जिथे इस्लामी कायद्याचे पालन केल्यामुळचे अल्लाहच्या कृपा देणग्यांनी युक्त असे सुख-शांतीचे वातावरण आहे.

التفاسير: |