Превод на значењата на Благородниот Куран - Превод на маратски - Мухамед Шафи Енсари

external-link copy
106 : 3

یَّوْمَ تَبْیَضُّ وُجُوْهٌ وَّتَسْوَدُّ وُجُوْهٌ ۚ— فَاَمَّا الَّذِیْنَ اسْوَدَّتْ وُجُوْهُهُمْ ۫— اَكَفَرْتُمْ بَعْدَ اِیْمَانِكُمْ فَذُوْقُوا الْعَذَابَ بِمَا كُنْتُمْ تَكْفُرُوْنَ ۟

१०६. त्या दिवशी काही चेहरे सफेद (तेजस्वी) असतील आणि काही चेहरे काळे१ असतील. काळ्या चेहऱ्यांच्या लोकांना सांगितले जाईल की तुम्ही ईमान राखल्यानंतर कुप्र (इन्कार, अविश्वास) का केला? आता आपल्या इन्कार करण्याची सजा चाखा. info

(१) हज़रत इब्ने अब्बास (रजि.) यांनी यास अहले सुन्नत वल जमात आणि अहले बिदअत (धर्मात नव्या गोष्टी, रुढी, प्रथांचा समावेश करणारे) अभिप्रेत घेतले आहेत (इब्ने कसीर आणि फतहुल कदीर) यावरून हे कळते की इस्लाम तोच आहे, ज्यावर अहले सुन्नत वल जमात काम करीत आहे आणि अहले बिदअत व विरोधक लोक इस्लामच्या त्या देणगीपासून वंचित आहे, जी मोक्षप्राप्तीची सबब आहे.

التفاسير: |