Превод на значењата на Благородниот Куран - Превод на маратски - Мухамед Шафи Енсари

external-link copy
29 : 55

یَسْـَٔلُهٗ مَنْ فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— كُلَّ یَوْمٍ هُوَ فِیْ شَاْنٍ ۟ۚ

२९. आकाशांमध्ये व जमिनीवर जे जे आहेत सर्व त्याच्याचकडे याचना करतात, प्रत्येक दिवस तो एका कार्यात आहे.१ info

(१) प्रत्येक दिवसाशी अभिप्रेत क्षण. मूळ शब्द ‘शान’ याचा अर्थ काम आणि विषय अर्थात प्रत्येक क्षणी तो काही ना काही करत असतो. कोणाला रोगी बनवितो तर कोणाला स्वस्थ, कोणाला श्रीमंत बनवितो तर कोणा श्रीमंताला गरीब, कोणाला रंक (भिकारी) चा राजा तर कोणा राजाला रंक, कोणाला उच्च पदावर बसवितो तर कोणाला खालच्या पदावर आणतो, कोणाला शून्यातून निर्माण करतो तरक कोणाला अस्तित्वहीन करतो वगैरे. थोडक्यात सांगायचे तर विश्वात नित्य घडून येणारे सर्व स्थित्यंतर आणि परिवर्तन त्याच्या मर्जीने व आदेशाने होत आहे आणि रात्र व दिवसाचा असा एकही क्षण नाही जो त्याच्या या शान (वैभवा) विरहित असावा.

التفاسير: