ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
26 : 13

اَللّٰهُ یَبْسُطُ الرِّزْقَ لِمَنْ یَّشَآءُ وَیَقْدِرُ ؕ— وَفَرِحُوْا بِالْحَیٰوةِ الدُّنْیَا ؕ— وَمَا الْحَیٰوةُ الدُّنْیَا فِی الْاٰخِرَةِ اِلَّا مَتَاعٌ ۟۠

२६. सर्वश्रेष्ठ अल्लाह ज्याची रोजी (आजिविका) इच्छितो वाढवितो आणि ज्याची इच्छितो घटवितो. हे लोक तर ऐहिक जीवनातच मग्न झालेत.१ वास्तविक हे जग, आखिरतच्या तुलनेत अगदी तुच्छ सामुग्री आहे.२ info

(१) एखाद्याला जर ऐहिक धन संपत्ती खूप जास्त लाभत आहे, वास्तविक तो अल्लाहचा अवज्ञाकारी आहे, तर ही खूप आनंदित आणि बेपर्वा होण्याची बाब नव्हे, कारण ही संधी आहे. न जाणो केव्हा ही मुदत संपेल आणि माणूस अल्लाहच्या पकडीत सापडेल. (२) हदीस वचनात उल्लेखित आहे की या जगाचे मूल्य आखिरत अर्थात मरणोत्तर जीवनाच्या तुलनेत असे आहे की जणू एखाद्याने आपले बोट समुद्रात बुडवून बाहेर काढावे तेव्हा पाहावे की समुद्राच्या अफाट जलाशयाच्या तुलनेत त्याच्या त्या बोटात केवढे पाणी आले?

التفاسير: