ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
45 : 34

وَكَذَّبَ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ ۙ— وَمَا بَلَغُوْا مِعْشَارَ مَاۤ اٰتَیْنٰهُمْ فَكَذَّبُوْا رُسُلِیْ ۫— فَكَیْفَ كَانَ نَكِیْرِ ۟۠

४५. आणि यांच्यापूर्वीच्या लोकांनीही आमच्या गोष्टींना खोटे ठरविले होते. आणि त्यांना आम्ही जे देऊन ठेवले होते, त्याच्या दहाव्या हिश्श्यापर्यंतही हे पोहचले नाहीत. तेव्हा, त्यांनी माझ्या पैगंबरांना खोटे ठरविले, (मग पाहा) माझ्या शिक्षा यातनेची किती (कठोर) अवस्था झाली.१ info

(१) याद्वारे मक्केच्या अनेकेश्वरवाद्यांना खबरदार केले जात आहे की तुम्ही खोटे ठरविण्याचा व इन्कार करण्याचा जो मार्ग अंगीकारला आहे तो मोठा हानिकारक आहे. तुमच्या पूर्वीचे जनसमूह देखील याच मार्गावर चालून नाश पावले, वास्तविक ते जनसमूह धन-संपत्ती, शक्ती-सामर्थ्य आणि आयुष्य वगैरेत तुमच्यापेक्षा खूप जास्त होते. तुम्ही तर त्यांच्या दहाव्या हिश्शालाही पोहोचू शकत नाही तरीही ते अल्लाहच्या अज़ाबपासून वाचू शकले नाहीत. या संदर्भात ‘सूरह अहकाफ’च्या आयत क्र. २६ मध्ये वर्णन केले गेले आहे.

التفاسير: