قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

external-link copy
17 : 25

وَیَوْمَ یَحْشُرُهُمْ وَمَا یَعْبُدُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ فَیَقُوْلُ ءَاَنْتُمْ اَضْلَلْتُمْ عِبَادِیْ هٰۤؤُلَآءِ اَمْ هُمْ ضَلُّوا السَّبِیْلَ ۟ؕ

१७. आणि ज्या दिवशी अल्लाह त्यांना आणि अल्लाहखेरीज ज्याची हे उपासना करीत राहिले त्या सर्वांना एकत्र करून विचारेल, काय माझ्‌या या दासांना तुम्ही मार्गभ्रष्ट केले की हे स्वतः मार्गापासून विचलित झाले?१ info

(१) या जगात अल्लाहखेरीज ज्यांची उपासना केली जात राहिली आणि पुढेही केली जात राहील त्यात निर्जीव पदार्थ (दगड, लाकूड आणि इतर धातूंच्या मूर्त्या) देखील आहेत. तसेच अल्लाहचे सदाचारी दासही आहेत जे सजीव आहेत. उदा. हजरत उजैर आणि हजरत मसीह (येशू) व इतर नेक लोक. त्याचप्रमाणे फरिश्त्यांचे व जिन्नांचेही पुजारी असतील. अल्लाह निर्जीव वस्तुंनाही अक्कल, सामंजस्य आणि वाचा प्रदान करील. मग त्या समस्त आराध्य दैवतांना विचारील की सांगा माझ्या या दासांना तुम्ही आपल्या उपासनेचा आदेश दिला होता की ते आपल्या मर्जीने तुमचे उपासक बनून पथभ्रष्ट झाले होते?

التفاسير: