قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

external-link copy
16 : 48

قُلْ لِّلْمُخَلَّفِیْنَ مِنَ الْاَعْرَابِ سَتُدْعَوْنَ اِلٰی قَوْمٍ اُولِیْ بَاْسٍ شَدِیْدٍ تُقَاتِلُوْنَهُمْ اَوْ یُسْلِمُوْنَ ۚ— فَاِنْ تُطِیْعُوْا یُؤْتِكُمُ اللّٰهُ اَجْرًا حَسَنًا ۚ— وَاِنْ تَتَوَلَّوْا كَمَا تَوَلَّیْتُمْ مِّنْ قَبْلُ یُعَذِّبْكُمْ عَذَابًا اَلِیْمًا ۟

१६. (तुम्ही) मागे सोडलेल्या ग्रामीण लोकांना सांगा की लवकरच तुम्ही एका मोठ्या शूरवीर जनसमूहाकडे बोलाविले जाल, की तुम्ही त्याच्याशी युद्ध कराल किंवा ते ईमानधारक होतील. तेव्हा जर तुम्ही आज्ञापालन कराल, तर अल्लाह तुम्हाला फार चांगला मोबदला प्रदान करील आणि जर तुम्ही तोंड फिरविले, जसे की तुम्ही यापूर्वी तोंड फिरवून घेतले आहे, तर तो तुम्हाला दुःखदायक शिक्षा यातना देईल. info

(१) यास अभिप्रेत तौहीद (एकेश्वरवाद) आणि रिसालत (प्रेषितत्वा) चा कलिमा (सूत्र) ‘‘ला इल्हा इल्लल्लाह मुहम्मदुर्रसूलुल्लाह’’ आहे, ज्याचा हुदैबियाच्या दिवशी अनेकेश्वरवाद्यांनी इन्कार केला. (इब्ने कसीर) अथवा तो धीर-संयम आणि शांती (सन्मान) आहे, जी त्यांनी हुदैबियात दाखविली होती किंवा ते प्रतिज्ञापालन आणि त्यावर दृढतापूर्वक अटळ राहणे आहे, जे अल्लाहचे भय अंगीकारून आचरण करण्याचा परिणाम आहे. (फतहुल कदीर)

التفاسير: