የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

external-link copy
17 : 11

اَفَمَنْ كَانَ عَلٰی بَیِّنَةٍ مِّنْ رَّبِّهٖ وَیَتْلُوْهُ شَاهِدٌ مِّنْهُ وَمِنْ قَبْلِهٖ كِتٰبُ مُوْسٰۤی اِمَامًا وَّرَحْمَةً ؕ— اُولٰٓىِٕكَ یُؤْمِنُوْنَ بِهٖ ؕ— وَمَنْ یَّكْفُرْ بِهٖ مِنَ الْاَحْزَابِ فَالنَّارُ مَوْعِدُهٗ ۚ— فَلَا تَكُ فِیْ مِرْیَةٍ مِّنْهُ ۗ— اِنَّهُ الْحَقُّ مِنْ رَّبِّكَ وَلٰكِنَّ اَكْثَرَ النَّاسِ لَا یُؤْمِنُوْنَ ۟

१७. तो, जो आपल्या पालनकर्त्यातर्फे एका प्रमाणावर कायम असेल, आणि त्याच्यासोबत अल्लाहतर्फे साक्षी असेल, आणि त्याच्यापूर्वी मूसाचा ग्रंथ (साक्षी) असेल जो मार्गदर्शक आणि दया- कृपा आहे. (दुसऱ्यांप्रमाणे असू शकतो?) हेच लोक आहेत, जे त्यावर ईमान राखतात आणि सर्व समूहांपैकी, जोदेखील याचा इन्कारी असेल त्याच्या अंतिम वायद्याचे ठिकाण जहन्नम आहे.१ तेव्हा तुम्ही त्याबाबत कसल्याही संशयात पडू नका. निःसंशय हे तुमच्या पालनकर्त्यातर्फे पूर्णतः सत्य आहे. परंतु अधिकांश लोक ईमान बाळगणारे नसतात. info

(१) सर्व समूहांशी अभिप्रेत साऱ्या जगात आढळणारे धर्म होत. यहूदी, ख्रिश्चन, अग्निपूजक, बौद्ध, अनेकेश्वरोपासक व इतर जोदेखील पैगंबर मुहम्मद (स.) आणि कुरआनावर ईमान राखणार नाही, त्याचे ठिकाण जहन्नम आहे. हीच गोष्ट हदीसमध्ये उल्लेखित आहे. शपथ आहे त्या शक्तीची जिच्या ताब्यात माझा प्राण आहे. या उम्मतीच्या ज्या यहूदी किंवा ख्रिश्चनाने माझ्या प्रेषित्वाबाबत ऐकले आणि मग माझ्यावर ईमान राखले नाही तो नरकात जाईल. (सहीह मुस्लिम, किताबुल ईमान प्रकरण वजूबुल ईमान)

التفاسير: