የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

external-link copy
235 : 2

وَلَا جُنَاحَ عَلَیْكُمْ فِیْمَا عَرَّضْتُمْ بِهٖ مِنْ خِطْبَةِ النِّسَآءِ اَوْ اَكْنَنْتُمْ فِیْۤ اَنْفُسِكُمْ ؕ— عَلِمَ اللّٰهُ اَنَّكُمْ سَتَذْكُرُوْنَهُنَّ وَلٰكِنْ لَّا تُوَاعِدُوْهُنَّ سِرًّا اِلَّاۤ اَنْ تَقُوْلُوْا قَوْلًا مَّعْرُوْفًا ؕ۬— وَلَا تَعْزِمُوْا عُقْدَةَ النِّكَاحِ حَتّٰی یَبْلُغَ الْكِتٰبُ اَجَلَهٗ ؕ— وَاعْلَمُوْۤا اَنَّ اللّٰهَ یَعْلَمُ مَا فِیْۤ اَنْفُسِكُمْ فَاحْذَرُوْهُ ۚ— وَاعْلَمُوْۤا اَنَّ اللّٰهَ غَفُوْرٌ حَلِیْمٌ ۟۠

२३५. आणि तुमच्यावर या बाबतीतही काही गुन्हा नाही की तुम्ही इशाऱ्याने किंवा नकळतरित्या त्या स्त्रियांशी विवाहाबाबत बोलावे किंवा आपल्या मनात इरादा लपवावा. अल्लाहला चांगले मााहिती आहे की तुम्ही अवश्य त्यांची आठवण कराल. परंतु तुम्ही लपून छपून त्यांच्याशी वायदा करू नका, मात्र ही गोष्ट वेगळी की तुम्ही भलेपणाची एखादी गोष्ट बोलावी आणि जोपर्यंत इद्दतची मुदत पूर्ण होत नाही, विवाहाचे बंधन मजबूत करू नका. लक्षात ठेवा, अल्लाहला तुमच्या मनातल्या गोष्टींचेही ज्ञान आहे. तुम्ही त्याचे भय बाळगत राहा आणि हेही लक्षात ठेवा की अल्लाह मोठा माफ करणारा आणि सहन करणारा आहे. info
التفاسير: