የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

external-link copy
6 : 29

وَمَنْ جٰهَدَ فَاِنَّمَا یُجَاهِدُ لِنَفْسِهٖ ؕ— اِنَّ اللّٰهَ لَغَنِیٌّ عَنِ الْعٰلَمِیْنَ ۟

६. आणि प्रत्येक प्रयत्न करणारा आपल्या स्वतःच्याच भल्याकरिता प्रयत्न करतो. निःसंशय अल्लाह समस्त जगवाल्यांपासून निःस्पृह आहे. १ info

(१) याचा अर्थ तोच आहे जो ‘मन्‌ अमि-ल सालिहन्‌ फ़लिनफ़सिही’ (सूरह जासिया - १५) चा आहे. म्हणजे जो सत्कर्म करील, त्याचा फायदा त्यालाच मिळेल अन्यथा अल्लाहला माणसांच्या कर्माची काहीच आवश्यकता नाही. साऱ्या जगाचे लोक जरी अल्लाहचे भय बाळगणारे होतील, तरी त्याच्या राज्यात कसलीही वाढहोणार नाही आणि सर्वच्या सर्व त्याची अवज्ञा करणारे झाले तरीही त्याच्या राज्यात कणभर कमी होणार नाही. शब्दांच्या आधारे यात काफिरांशी जिहाद (धर्मयुद्ध) करण्याचाही आदेश आहे की ते सुद्धा एक प्रकारचे सत्कर्म होय.

التفاسير: