የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

external-link copy
117 : 3

مَثَلُ مَا یُنْفِقُوْنَ فِیْ هٰذِهِ الْحَیٰوةِ الدُّنْیَا كَمَثَلِ رِیْحٍ فِیْهَا صِرٌّ اَصَابَتْ حَرْثَ قَوْمٍ ظَلَمُوْۤا اَنْفُسَهُمْ فَاَهْلَكَتْهُ ؕ— وَمَا ظَلَمَهُمُ اللّٰهُ وَلٰكِنْ اَنْفُسَهُمْ یَظْلِمُوْنَ ۟

११७. ते जे काही या ऐहिक जीवनात खर्च करतात, ते त्या वादळासारखे आहे, ज्यात कडाक्याची थंडी असावी, जे एखाद्या जुलमी जनसमूहाच्या शेतावरून जावे आणि त्याचा सर्वनाश करून टाकावा१ अल्लाहने त्यांच्यावर अत्याचार नाही केला, उलट ते स्वतः आपल्या प्राणांवर अत्याचार करीत होते. info

(१) कयामतच्या दिवशी काफिरांना अर्थात इन्कारी लोकांना, ना त्यांची धन-संपत्ती कामी येईल, ना त्यांची मुले.येथेपर्यंत की भल्या कामात खर्च केलेले धनदेखील व्यर्थ ठरेल आणि त्यांची तुलना त्या कडाक्याच्या थंडीसारखी आहे, जी हिरव्या टवटवीत शेतीला जाळून तिचा सर्वनाश करते. त्यापूर्वी अत्याचारी लोक आपली डोलणारी शेते पाहून खूप आनंदित होत असत आणि मोठ्या फायद्याची आशा धरत की अचानक त्यांच्या आशा अपेक्षा धुळीस मिळतात. थात्पर्य, जोपर्यंत ईमान नसेल, तोपर्यंत भल्या कामांसाठी खर्च करणाऱ्यांची या जगात कितीही प्रसिद्धी व प्रशंसा का होईना, आखिरतमध्ये त्यांना याचा काडीमात्र मोबदला मिळणार नाही. तिथे तर त्यांच्यासाठी दररोज जहन्नमच्या आगीत निरंतर जळत राहण्याची महाभयंकर शिक्षा (अज़ाब) आहे.

التفاسير: