የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

external-link copy
7 : 4

لِلرِّجَالِ نَصِیْبٌ مِّمَّا تَرَكَ الْوَالِدٰنِ وَالْاَقْرَبُوْنَ ۪— وَلِلنِّسَآءِ نَصِیْبٌ مِّمَّا تَرَكَ الْوَالِدٰنِ وَالْاَقْرَبُوْنَ مِمَّا قَلَّ مِنْهُ اَوْ كَثُرَ ؕ— نَصِیْبًا مَّفْرُوْضًا ۟

७. आई-बाप आणि जवळच्या नातेवाईकांच्या संपत्तीत पुरुषांचा हिस्सा आहे, आणि स्त्रियांचाही (अर्थात जी धन-संपत्ती आई-वडील आणि जवळचे नातेवाईक मागे सोडून जातील), मग ती संपत्ती कमी असो किंवा जास्त (त्यात) हिस्सा ठरलेला आहे.१ info

(१) इस्लामच्या आगमनापूर्वी हादेखील अत्याचार होता की स्त्रियांना आणि लहान मुलांना वारस या नात्याने काहीच दिले जात नव्हते. केवळ मोठी मुले, जी लढण्यायोग्य असत तेच साऱ्या संपत्तीचे उत्तराधिकारी मानले जात. या आयतीत सर्वश्रेष्ठ अल्लाहने फर्माविले की पुरुषांप्रमाणे स्त्रिया आणि लहान मुले-मुलीदेखील आपल्या माता-पित्याचे आणि नातेवाईकांचे वारसदार ठरतील. त्यांना वारसाहक्कापासून वंचित ठेवले जाणार नाही.

التفاسير: