የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

external-link copy
19 : 40

یَعْلَمُ خَآىِٕنَةَ الْاَعْیُنِ وَمَا تُخْفِی الصُّدُوْرُ ۟

१९. तो डोळ्यांच्या बेईमानीला आणि छाती (हृदया) च्या लपलेल्या गोष्टींना (चांगल्या प्रकारे) जाणतो.१ info

(१) यात अल्लाहच्या संपूर्ण ज्ञानाचे वर्णन आहे की त्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आहे, मग ती लहान असो की मोठी, बारीक असो की जाड, उच्च दर्जाची असो की खालच्या दर्जाची. अल्लाहची ही असीम ज्ञानकक्षा लक्षात घेता माणसाने त्याची अवज्ञा करण्यापासून दूर राहिले पाहिजे व खऱ्या अर्थाने त्याचे भय राखावे. डोळ्यांची बेईमानी म्हणजे चोरून पाहणे. उदा. रस्त्याने जाताना एखाद्या सुंदर स्त्रीला तिरप्या नजरेने पाहात राहणे छातीच्या गोष्टी म्हणजे त्या शंकाही येतात, ज्या माणसाच्या मनात उद्‌भवत राहतात. मात्र जोपर्यंत या शंका विचार रूपाने मनात येत जात राहतील तोपर्यंत पकडीत येण्यायोग्य ठरणार नाही, परंतु जेव्हा त्या इराद्याचे रूप धारण करतील तेव्हा मात्र त्याची पकड होऊ शकते. मग तसे करण्याची संधी त्याला मिळो किंवा न मिळो.

التفاسير: