Check out the new design

የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ * - የትርጉሞች ማዉጫ


የይዘት ትርጉም ምዕራፍ: አል ሐሽር   አንቀጽ:
فَكَانَ عَاقِبَتَهُمَاۤ اَنَّهُمَا فِی النَّارِ خَالِدَیْنِ فِیْهَا ؕ— وَذٰلِكَ جَزٰٓؤُا الظّٰلِمِیْنَ ۟۠
१७. तेव्हा दोघांचा परिणाम हा झाला की (जहन्नमच्या) आगीत नेहमी नेहमीकरिता गेले आणि अत्याचारी लोकांची हीच शिक्षा आहे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوا اتَّقُوا اللّٰهَ وَلْتَنْظُرْ نَفْسٌ مَّا قَدَّمَتْ لِغَدٍ ۚ— وَاتَّقُوا اللّٰهَ ؕ— اِنَّ اللّٰهَ خَبِیْرٌ بِمَا تَعْمَلُوْنَ ۟
१८. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे भय बाळगत राहा१ आणि प्रत्येक माणसाने हे बघावे की उद्या (कयामतकरिता) त्याने कर्मांचे कोणते (भांडार) पाठविले आहे,२ आणि (प्रत्येक क्षणी) अल्लाहचे भय राखा, अल्लाह तुमच्या समस्त कर्मांशी परिचित आहे.
(१) ईमान राखणाऱ्यांना संबोधित करून त्यांना उपदेश केला जात आहे. अल्लाहशी भय राखण्याचा अर्थ, त्याने ज्या ज्या गोष्टींचा आदेश दिला आहे त्या अमलात आणाव्या आणि ज्या गोष्टींची मनाई केली आहे, त्यापासून अलिप्त राहावे. या आयतीत ही गोष्ट जोर देण्यासाठी दोन वेळा फर्माविली गेली आहे. कारण हा तकवा (अल्लाहचे भय) च माणसाला सत्कर्म करण्यास व दुष्कर्माचा अव्हेर करण्यास प्रवृत्त करतो. (२) ‘उद्या’शी अभिप्रेत कयामत आहे. अर्थात विश्वाचा अंत. त्याला उद्या या अर्थाने सांगून या गोष्टीकडेही इशारा केला आहे की कयामतचे घडून येणे खूप लांब नाही, किंबहुना निकटचे आहे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَلَا تَكُوْنُوْا كَالَّذِیْنَ نَسُوا اللّٰهَ فَاَنْسٰىهُمْ اَنْفُسَهُمْ ؕ— اُولٰٓىِٕكَ هُمُ الْفٰسِقُوْنَ ۟
१९. आणि तुम्ही त्या लोकांसारखे होऊ नका, ज्यांनी अल्लाह (च्या आदेशा) चा विसर पाडला, तेव्हा अल्लाहने त्यांना स्वतःचेच विस्मरण घडविले. असेच लोक दुराचारी असतात.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
لَا یَسْتَوِیْۤ اَصْحٰبُ النَّارِ وَاَصْحٰبُ الْجَنَّةِ ؕ— اَصْحٰبُ الْجَنَّةِ هُمُ الْفَآىِٕزُوْنَ ۟
२०. जहन्नमवाले आणि जन्नतवाले (आपसात) समान नाहीत.३ जे जन्नतवाले आहेत तेच सफल आहेत.
(१) ज्यांनी अल्लाहचा विसर पाडून ही गोष्टही ध्यानी राखली नाही की अशा प्रकारे ते स्वतःच आपल्या प्राणांवर अत्याचार करीत आहेत, आणि एक दिवस असा येईल की याच्या परिणामस्वरूपी त्यांचे हे शरीर, ज्याच्यासाठी ते जगात मोठ्या कष्ट यातना झेलत होते, जहन्नमच्या आगीचे इंधन बनेल. आणि त्यांच्या तुलनेत दुसरे लोक होते ज्यांनी अल्लाहचे स्मरण राखले, त्याच्या आदेशानुसार जीवन व्यतीत केले. एक वेळ येईल की अल्लाह त्यांना त्याचा उत्तम मोबदला प्रदान करील आइ आपल्या जन्नतमध्ये दाखल करील जिथे त्यांच्या आरामासाठी सर्व प्रकारची सुख-सुविधा असेल. हे दोन्ही समूह अर्थात जहन्नमवाले आणि जन्नतवाले समान असूच शकत नाही. हे दोन्ही समान कसे बरे असू शकतात? एकाने आपला शेवट ध्यानी राखला आणि त्यासाठी तयारी करीत राहिला, तर दुसरा आपल्या शेवटाविषयी निश्चिंत राहिला. म्हणून त्यासाठी त्याने कसलीही पूर्वतयारी केली नाही, किंबहुना गफलतीतच पडून राहिला.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
لَوْ اَنْزَلْنَا هٰذَا الْقُرْاٰنَ عَلٰی جَبَلٍ لَّرَاَیْتَهٗ خَاشِعًا مُّتَصَدِّعًا مِّنْ خَشْیَةِ اللّٰهِ ؕ— وَتِلْكَ الْاَمْثَالُ نَضْرِبُهَا لِلنَّاسِ لَعَلَّهُمْ یَتَفَكَّرُوْنَ ۟
२१. जर आम्ही कुरआनाला एखाद्या पर्वतावर अवतरित केले असते तेव्हा तुम्ही पाहिले असते की अल्लाहच्या भयाने तो झुकून चूर चूर (कण कण) झाला असता. आम्ही ही उदाहरणे लोकांसाठी निवेदित आहोत यासाठी की त्यांनी विचार चिंतन करावे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
هُوَ اللّٰهُ الَّذِیْ لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ۚ— عٰلِمُ الْغَیْبِ وَالشَّهَادَةِ ۚ— هُوَ الرَّحْمٰنُ الرَّحِیْمُ ۟
२२. तोच अल्लाह आहे, ज्याच्याखेरीज कोणीही उपासनीय (पूज्य) नाही. लपलेल्या व उघड गोष्टी जाणणारा, तोच माफ व दया करणारा.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
هُوَ اللّٰهُ الَّذِیْ لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ۚ— اَلْمَلِكُ الْقُدُّوْسُ السَّلٰمُ الْمُؤْمِنُ الْمُهَیْمِنُ الْعَزِیْزُ الْجَبَّارُ الْمُتَكَبِّرُ ؕ— سُبْحٰنَ اللّٰهِ عَمَّا یُشْرِكُوْنَ ۟
२३. तोच अल्लाह आहे, ज्याच्याखेरीज कोणी सच्चा माबूद (उपास्य) नाही. मालक (स्वामी) अतिशय पवित्र, सर्व व्यंग दोषांपासून मुक्त शांती (सलामती) प्रदान करणारा, संरक्षक, वर्चस्वशाली, शक्तिशाली, महानतम पवित्र आहे अल्लाह त्या गोष्टींपासून ज्यांना हे त्याचा सहभागी ठरवितात.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
هُوَ اللّٰهُ الْخَالِقُ الْبَارِئُ الْمُصَوِّرُ لَهُ الْاَسْمَآءُ الْحُسْنٰی ؕ— یُسَبِّحُ لَهٗ مَا فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ۚ— وَهُوَ الْعَزِیْزُ الْحَكِیْمُ ۟۠
२४. तोच अल्लाह आहे निर्माणकर्ता, रचयिता, स्वरूप देणारा, त्याच्याचसाठी (अतिशय) उत्तम नावे आहेत. प्रत्येक वस्तू मग ती आकाशात असो किंवा धरतीत असो, त्याचेच पवित्र वर्णन करते आणि तोच मोठा जबरदस्त आणि बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
 
የይዘት ትርጉም ምዕራፍ: አል ሐሽር
የምዕራፎች ማውጫ የገፅ ቁጥር
 
የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ - የትርጉሞች ማዉጫ

በሙሐመድ ሸፊዕ አንሷሪ ተተረጎመ

መዝጋት