የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ቋንቋ ትርጉም * - የትርጉሞች ማዉጫ


የይዘት ትርጉም ምዕራፍ: ሱረቱ አል መዓሪጅ   አንቀጽ:

ሱረቱ አል መዓሪጅ

سَاَلَ سَآىِٕلٌۢ بِعَذَابٍ وَّاقِعٍ ۟ۙ
१. एका मागणी करणाऱ्याने त्या अज़ाब (शिक्षा - यातने) ची मागणी केली जो घडून येणार आहे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
لِّلْكٰفِرِیْنَ لَیْسَ لَهٗ دَافِعٌ ۟ۙ
२. काफिरांवर, ज्याला कोणी हटविणारा नाही.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
مِّنَ اللّٰهِ ذِی الْمَعَارِجِ ۟ؕ
३. या अल्लाहतर्फे, जो शिड्या बाळगणारा आहे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
تَعْرُجُ الْمَلٰٓىِٕكَةُ وَالرُّوْحُ اِلَیْهِ فِیْ یَوْمٍ كَانَ مِقْدَارُهٗ خَمْسِیْنَ اَلْفَ سَنَةٍ ۟ۚ
४. ज्याच्याकडे फरिश्ते आणि आत्मा चढून जातात एका दिवसात, ज्याची मुदत पन्नास हजार वर्षांची आहे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
فَاصْبِرْ صَبْرًا جَمِیْلًا ۟
५. तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे धीर संयम राखा.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
اِنَّهُمْ یَرَوْنَهٗ بَعِیْدًا ۟ۙ
६. निःसंशय, हे त्या (अज़ाब) ला दूर समजतात.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَّنَرٰىهُ قَرِیْبًا ۟ؕ
७. आणि आम्ही त्याला जवळ असल्याचे पाहतो.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
یَوْمَ تَكُوْنُ السَّمَآءُ كَالْمُهْلِ ۟ۙ
८. ज्या दिवशी आकाश वितळलेल्या धातूसारखे होईल.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَتَكُوْنُ الْجِبَالُ كَالْعِهْنِ ۟ۙ
९. आणि पर्वत रंगीत लोकरीसारखे होतील.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَلَا یَسْـَٔلُ حَمِیْمٌ حَمِیْمًا ۟ۚۖ
१०. आणि कोणी मित्र कोणा मित्राला विचारणार नाही.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
یُّبَصَّرُوْنَهُمْ ؕ— یَوَدُّ الْمُجْرِمُ لَوْ یَفْتَدِیْ مِنْ عَذَابِ یَوْمِىِٕذٍ بِبَنِیْهِ ۟ۙ
११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा - यातनेच्या मोबदल्यात (दंड म्हणून) आपल्या पुत्रांना देऊ इच्छिल.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَصَاحِبَتِهٖ وَاَخِیْهِ ۟ۙ
१२. आपल्या पत्नीला आणि आपल्या भावाला.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَفَصِیْلَتِهِ الَّتِیْ تُـْٔوِیْهِ ۟ۙ
१३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते.
(१) अर्थात पूर्णतः ईमान राखणारे एकेश्वरवादी त्यांच्यात वर सांगितलेले वैगुण्य नसते. किंबहुना याच्या उलट ते सद्‌गुणांनी युक्त असतात. रोज नित्यनेमाने नमाज पढण्याचा अर्थ असा की ते नमाजबाबतच सुस्ती दिरंगाई करीत नाही. ते प्रत्येक नमाज तिच्या ठरलेल्या वेळेवर अगदी वक्तशीरपणे अदा करतात. कोणतेही काम त्यांना नमाजपासून रोखत नाही आणि जगाचा कोणताही लाभ त्यांना नमाज पढण्यापासून विमुख (गाफील) करीत नाही.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَمَنْ فِی الْاَرْضِ جَمِیْعًا ۙ— ثُمَّ یُنْجِیْهِ ۟ۙ
१४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
كَلَّا ؕ— اِنَّهَا لَظٰی ۟ۙ
१५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
نَزَّاعَةً لِّلشَّوٰی ۟ۚۖ
१६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
تَدْعُوْا مَنْ اَدْبَرَ وَتَوَلّٰی ۟ۙ
१७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَجَمَعَ فَاَوْعٰی ۟
१८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
اِنَّ الْاِنْسَانَ خُلِقَ هَلُوْعًا ۟ۙ
१९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
اِذَا مَسَّهُ الشَّرُّ جَزُوْعًا ۟ۙ
२०. जेव्हा त्याला कष्ट - यातना पोहचते, तेव्हा भयचिंतीत होतो.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَّاِذَا مَسَّهُ الْخَیْرُ مَنُوْعًا ۟ۙ
२१. आणि जेव्हा त्याला सुख प्राप्त होते, कंजूसपणा करू लागतो.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
اِلَّا الْمُصَلِّیْنَ ۟ۙ
२२. परंतु ते नमाज पढणारे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
الَّذِیْنَ هُمْ عَلٰی صَلَاتِهِمْ دَآىِٕمُوْنَ ۟
२३. जे आपल्या नमाजचे वक्तशीर पालन करणारे आहेत.१
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَالَّذِیْنَ فِیْۤ اَمْوَالِهِمْ حَقٌّ مَّعْلُوْمٌ ۟
२४. आणि ज्यांच्या धन-संपत्तीत निर्धारित हिस्सा आहे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
لِّلسَّآىِٕلِ وَالْمَحْرُوْمِ ۟
२५. याचकांचाही आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचाही.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَالَّذِیْنَ یُصَدِّقُوْنَ بِیَوْمِ الدِّیْنِ ۟
२६. आणि जे न्यायाच्या दिवसावर विश्वास राखतात.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَالَّذِیْنَ هُمْ مِّنْ عَذَابِ رَبِّهِمْ مُّشْفِقُوْنَ ۟ۚ
२७. आणि जे आपल्या पालनकर्त्याच्या शिक्षेचे भय बाळगत राहतात.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
اِنَّ عَذَابَ رَبِّهِمْ غَیْرُ مَاْمُوْنٍ ۪۟
२८. निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्याची शिक्षा यातना, निर्धास्त होण्याची बाब नाही.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَالَّذِیْنَ هُمْ لِفُرُوْجِهِمْ حٰفِظُوْنَ ۟ۙ
२९. आणि जे लोक आपल्या लज्जास्थानां (गुप्तांगां) चे (हराम कृत्यापासून) रक्षण करतात.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
اِلَّا عَلٰۤی اَزْوَاجِهِمْ اَوْ مَا مَلَكَتْ اَیْمَانُهُمْ فَاِنَّهُمْ غَیْرُ مَلُوْمِیْنَ ۟ۚ
३०. पंरतु आपल्या पत्नींच्या आणि आपल्या दासींच्याखेरीज ज्यांचे ते मालक (स्वामी) आहेत, या बाबतीत ते निंदनीय नाहीत.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
فَمَنِ ابْتَغٰی وَرَآءَ ذٰلِكَ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْعٰدُوْنَ ۟ۚ
३१. आता जो कोणी याच्याखेरीज (मार्ग) शोधेल, तर असे लोक मर्यादेचे उल्लंघन करणारे ठरतील.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَالَّذِیْنَ هُمْ لِاَمٰنٰتِهِمْ وَعَهْدِهِمْ رٰعُوْنَ ۟
३२. आणि जे आपल्या अनामती (ठेवी) ची, आणि आपल्या वायद्या-वचनांची व प्रतिज्ञेची कास बाळगतात.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَالَّذِیْنَ هُمْ بِشَهٰدٰتِهِمْ قَآىِٕمُوْنَ ۟
३३. आणि जे आपल्या साक्षींवर सरळ (आणि अटळ) राहतात.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
وَالَّذِیْنَ هُمْ عَلٰی صَلَاتِهِمْ یُحَافِظُوْنَ ۟ؕ
३४. आणि जे आपल्या नमाजांचे संरक्षण करतात.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
اُولٰٓىِٕكَ فِیْ جَنّٰتٍ مُّكْرَمُوْنَ ۟ؕ۠
३५. हेच लोक जन्नतमध्ये मान - प्रतिष्ठा राखणारे असतील.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
فَمَالِ الَّذِیْنَ كَفَرُوْا قِبَلَكَ مُهْطِعِیْنَ ۟ۙ
३६. तेव्हा, या काफिरांना झाले तरी काय की ते तुमच्याकडे धावत येतात.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
عَنِ الْیَمِیْنِ وَعَنِ الشِّمَالِ عِزِیْنَ ۟
३७. उजव्या आणि डाव्या बाजूने, समूहासमूहाने.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
اَیَطْمَعُ كُلُّ امْرِئٍ مِّنْهُمْ اَنْ یُّدْخَلَ جَنَّةَ نَعِیْمٍ ۟ۙ
३८. काय त्यांच्यापैकी प्रत्येकजण असे इच्छितो की त्यांना देणग्यांनी युक्त (ऐश-आरामाच्या) जन्नतमध्ये प्रवेश लाभेल?
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
كَلَّا ؕ— اِنَّا خَلَقْنٰهُمْ مِّمَّا یَعْلَمُوْنَ ۟
३९. (असे) कदापि होणार नाही. आम्ही त्यांना त्या (वस्तू) पासून निर्माण केले आहे, जिला ते जाणतात.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
فَلَاۤ اُقْسِمُ بِرَبِّ الْمَشٰرِقِ وَالْمَغٰرِبِ اِنَّا لَقٰدِرُوْنَ ۟ۙ
४०. तेव्हा मला शपथ आहे दोन्ही पूर्व आणि पश्चिम (दिशां) च्या पालनकर्त्याची की आम्ही निश्चतपणे समर्थ आहोत.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
عَلٰۤی اَنْ نُّبَدِّلَ خَیْرًا مِّنْهُمْ ۙ— وَمَا نَحْنُ بِمَسْبُوْقِیْنَ ۟
४१. या गोष्टीवर की त्यांच्याऐवजी त्यांच्यापेक्षा चांगले लोक आणावेत, आणि आम्ही लाचार विवश नाहीत.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
فَذَرْهُمْ یَخُوْضُوْا وَیَلْعَبُوْا حَتّٰی یُلٰقُوْا یَوْمَهُمُ الَّذِیْ یُوْعَدُوْنَ ۟ۙ
४२. तेव्हा तुम्ही त्यांना भांडत-खेळत (असलेले) सोडा, येथे पर्यर्ंत की हे आपल्या त्या दिवसाला जाऊन मिळावेत, ज्याचा वायदा त्यांच्याशी केला जात आहे.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
یَوْمَ یَخْرُجُوْنَ مِنَ الْاَجْدَاثِ سِرَاعًا كَاَنَّهُمْ اِلٰی نُصُبٍ یُّوْفِضُوْنَ ۟ۙ
४३. ज्या दिवशी कबरीमधून हे धावत पळत बाहेर पडतील, जणू काही ते साध्य-चिन्हाकडे वेगाने जात आहेत.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
خَاشِعَةً اَبْصَارُهُمْ تَرْهَقُهُمْ ذِلَّةٌ ؕ— ذٰلِكَ الْیَوْمُ الَّذِیْ كَانُوْا یُوْعَدُوْنَ ۟۠
४४. त्यांचे डोळे (नजरा) झुकलेले असतील, त्यांच्यावर अपमानाचे सावट (पसरलेले) असेल. हाच तो दिवस, ज्याचा त्यांच्याशी वायदा केला जात होता.
የአረብኛ ቁርኣን ማብራሪያ:
 
የይዘት ትርጉም ምዕራፍ: ሱረቱ አል መዓሪጅ
የምዕራፎች ማውጫ የገፅ ቁጥር
 
የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ቋንቋ ትርጉም - የትርጉሞች ማዉጫ

በሙሓመድ ሸፊዕ አንሷሪይ ተተርጉሞ በአል‐ቢር ኢስላማዊ ተቋም የታተመ የቁርአን ትርጉም

መዝጋት