१. ही आहे ती सूरह (अध्याय) जी आम्ही अवतरित केली आहे आणि निर्धारित केली आहे आणि ज्यात आम्ही स्पष्ट आदेश अवतरित केले आहेत, यासाठी की तुम्ही स्मरणात राखावे.
२. व्यभिचार करणाऱ्या स्त्री-पुरुषांपैकी प्रत्येकाला शंभर कोडे मारा. त्यांना अल्लाहच्या (दंड) नियमानुसार शिक्षा देताना तुम्हाला कदापी कीव वाटू नये, जर तुम्ही अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखत असाल. त्यांना शिक्षा देतेवेळी ईमान राखणाऱ्यांचा एक समूह हजर असला पाहिजे.
३. व्यभिचारी पुरुष, व्यभिचारी स्त्री किंवा अनेकेश्वरवादी स्त्रीशिवाय दुसऱ्या स्त्रीशी विवाह करीत नाही आणि व्यभिचार करणारी स्त्री देखील, व्यभिचारी पुरुष किंवा अनेकेश्वरवादी पुरुषाखेरीज दुसऱ्याशी विवाह करीत नाही आणि ईमान राखणाऱ्यांवर हे हराम (अवैध) केले गेले आहे.
४. आणि जे लोक पावित्र्यशील स्त्रीवर व्यभिचाराचा आरोप ठेवतील, मग चार साक्षी सादर करू शकत नसतील तर त्यांना ऐंशी कोडे मारा आणि त्यांची साक्ष कधीही मान्य करू नका, हे दुराचारी लोक आहेत.
६. आणि जे लोक आपल्या पत्नीवर व्यभिचाराचा आरोप ठेवतील आणि त्यांचा साक्षी त्यांच्याखेरीज दुसरा कोणी नसेल तर अशा लोकांपैकी प्रत्येकाचा पुरावा हा आहे की त्यांनी चार वेळा अल्लाहची शपथ घेऊन सांगावे की ते सच्चा लोकांपैकी आहेत.