আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ * - অনুবাদসমূহৰ সূচীপত্ৰ


অৰ্থানুবাদ ছুৰা: ছুৰা আঝ-ঝুখৰূফ   আয়াত:

ছুৰা আঝ-ঝুখৰূফ

حٰمٓ ۟ۚۛ
१. हा - मीम
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَالْكِتٰبِ الْمُبِیْنِ ۟ۙۛ
२. शपथ आहे या स्पष्ट ग्रंथाची.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اِنَّا جَعَلْنٰهُ قُرْءٰنًا عَرَبِیًّا لَّعَلَّكُمْ تَعْقِلُوْنَ ۟ۚ
३. आम्ही यास अरबी भाषेचा कुरआन बनविला आहे, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَاِنَّهٗ فِیْۤ اُمِّ الْكِتٰبِ لَدَیْنَا لَعَلِیٌّ حَكِیْمٌ ۟ؕ
४. आणि निःसंशय, हा सुरक्षित ग्रंथात आहे आणि आमच्या निकट उच्च दर्जाचा आहे. बुद्धी-कौशल्यपूर्ण आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اَفَنَضْرِبُ عَنْكُمُ الذِّكْرَ صَفْحًا اَنْ كُنْتُمْ قَوْمًا مُّسْرِفِیْنَ ۟
५. काय आम्ही या सदुपदेशाला तुमच्यापासून या कारणास्तव हटवावे की तुम्ही मर्यादा ओलांडणारे लोक आहात.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَكَمْ اَرْسَلْنَا مِنْ نَّبِیٍّ فِی الْاَوَّلِیْنَ ۟
६. आणि आम्ही पूर्वीच्या जनसमूहांमध्येही अनेक पैगंबर पाठविले.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَمَا یَاْتِیْهِمْ مِّنْ نَّبِیٍّ اِلَّا كَانُوْا بِهٖ یَسْتَهْزِءُوْنَ ۟
७. आणि जो देखील पैगंबर त्यांच्याजवळ आला, त्यांनी त्याची थट्टाच उडविली.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَاَهْلَكْنَاۤ اَشَدَّ مِنْهُمْ بَطْشًا وَّمَضٰی مَثَلُ الْاَوَّلِیْنَ ۟
८. तेव्हा आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली लोकांना नष्ट करून टाकले आणि पूर्वीच्या लोकांची उदाहरणे दिली गेली आहेत.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَلَىِٕنْ سَاَلْتَهُمْ مَّنْ خَلَقَ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ لَیَقُوْلُنَّ خَلَقَهُنَّ الْعَزِیْزُ الْعَلِیْمُ ۟ۙ
९. आणि जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाशांना व धरतीला कोणी निर्माण केले, तर निःसंशय त्यांचे उत्तर हेच असेल की, त्यांना सर्वांत जबरदस्त आणि सर्वाधिक ज्ञान बाळगणाऱ्या (अल्लाह) नेच निर्माण केले आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
الَّذِیْ جَعَلَ لَكُمُ الْاَرْضَ مَهْدًا وَّجَعَلَ لَكُمْ فِیْهَا سُبُلًا لَّعَلَّكُمْ تَهْتَدُوْنَ ۟ۚ
१०. (तोच आहे) ज्याने तुमच्यासाठी जमिनीला बिछाईत (आणि अंथरुण) बनविले आणि तिच्यात तुमच्यासाठी रस्ते बनविले, यासाठी की तुम्ही मार्ग प्राप्त करून घ्यावा.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَالَّذِیْ نَزَّلَ مِنَ السَّمَآءِ مَآءً بِقَدَرٍ ۚ— فَاَنْشَرْنَا بِهٖ بَلْدَةً مَّیْتًا ۚ— كَذٰلِكَ تُخْرَجُوْنَ ۟
११. आणि त्यानेच आकाशातून एका अनुमानानुसार पर्जन्यवृष्टी केली तेव्हा आम्ही त्याद्वारे मृत शहराला जिवंत केले. याच प्रकारे तुम्ही बाहेर काढले जाल.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَالَّذِیْ خَلَقَ الْاَزْوَاجَ كُلَّهَا وَجَعَلَ لَكُمْ مِّنَ الْفُلْكِ وَالْاَنْعَامِ مَا تَرْكَبُوْنَ ۟ۙ
१२. आणि ज्याने सर्व वस्तूंच्या जोड्या१ बनविल्या आणि तुमच्या (वाहना) करिता नौका बनविल्या आणि चतुष्पाद पशु निर्माण केले, ज्यांच्यावर तुम्ही स्वार होता.
(१) प्रत्येक वस्तू जोडी-जोडीने बनविली. नर-मादी, वनस्पती, शेती, फळ-फूल आणि प्राणी सर्वांत नर मादी आहेत. काहींच्या मते यास अभिप्रेत एकमेकांची प्रतिकूल वस्तू होत. उदा. उजेड आणि अंधार, रोग आणि स्वास्थ्य, न्याय व अन्याय, सत्य - असत्य, भलेपणा आणि बुरेपणा, ईमान आणि कुप्र (विश्वास व नकार) नरमी आणि सक्ती वगैरे. काहीच्या मते जोडी, प्रकाराच्या अर्थाने आहे. अर्थात सर्वच प्रकारांचा निर्माणकर्ता अल्लाह आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
لِتَسْتَوٗا عَلٰی ظُهُوْرِهٖ ثُمَّ تَذْكُرُوْا نِعْمَةَ رَبِّكُمْ اِذَا اسْتَوَیْتُمْ عَلَیْهِ وَتَقُوْلُوْا سُبْحٰنَ الَّذِیْ سَخَّرَ لَنَا هٰذَا وَمَا كُنَّا لَهٗ مُقْرِنِیْنَ ۟ۙ
१३. यासाठी की तुम्ही त्यांच्या पाठीवर स्वार व्हावे आणि जेव्हा तुम्ही यांच्यावर व्यवस्थित बसाल, तेव्हा आपल्या पालनकर्त्याने (प्रदान केलेल्या) देणग्यांचे स्मरण करा आणि म्हणा, मोठा पवित्र आहे तो, ज्याने यास आमच्या अधीन केले, अन्यथा यास काबूत आणण्याची आमची ताकद नव्हती.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَاِنَّاۤ اِلٰی رَبِّنَا لَمُنْقَلِبُوْنَ ۟
१४. आणि निश्चितपणे आम्ही आपल्या पालनकर्त्याकडे परतणार आहोत.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَجَعَلُوْا لَهٗ مِنْ عِبَادِهٖ جُزْءًا ؕ— اِنَّ الْاِنْسَانَ لَكَفُوْرٌ مُّبِیْنٌ ۟ؕ۠
१५. आणि त्यांनी अल्लाहच्या काही दासांना त्याचा अंश बनवून घेतले. निःसंशय, मनुष्य, स्पष्टपणे कृतघ्न आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اَمِ اتَّخَذَ مِمَّا یَخْلُقُ بَنٰتٍ وَّاَصْفٰىكُمْ بِالْبَنِیْنَ ۟
१६. काय अल्लाहने आपल्या निर्मितीमधून कन्या, स्वतःसाठी राखल्यात आणि तुम्हाला पुत्रांनी सुशोभित केले?
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَاِذَا بُشِّرَ اَحَدُهُمْ بِمَا ضَرَبَ لِلرَّحْمٰنِ مَثَلًا ظَلَّ وَجْهُهٗ مُسْوَدًّا وَّهُوَ كَظِیْمٌ ۟
१७. जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याला त्या गोष्टींची खबर दिली जाते जिचे उदाहरण त्याने दयावान अल्लाहकरिता सांगितले आहे, तेव्हा त्याचा चेहरा काळवंडतो आणि तो दुःखी होतो.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اَوَمَنْ یُّنَشَّؤُا فِی الْحِلْیَةِ وَهُوَ فِی الْخِصَامِ غَیْرُ مُبِیْنٍ ۟
१८. किंवा, काय (अल्लाहची संतती मुली आहेत) ज्या दाग-दागिन्यांत वाढतात आणि भांडण-तंट्यात (आपले म्हणणे) स्पष्ट बोलू शकत नाहीत.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَجَعَلُوا الْمَلٰٓىِٕكَةَ الَّذِیْنَ هُمْ عِبٰدُ الرَّحْمٰنِ اِنَاثًا ؕ— اَشَهِدُوْا خَلْقَهُمْ ؕ— سَتُكْتَبُ شَهَادَتُهُمْ وَیُسْـَٔلُوْنَ ۟
१९. आणि त्यांनी दयावान (अल्लाह) ची उपासना करणाऱ्या फरिश्त्यांना स्त्री बनवून टाकले. काय त्यांच्या निर्मितीच्या वेळी ते हजर होते? थ्यांची ही साक्ष लिहून घेतली जाईल आणि त्यांना त्यासंबंधी विचारणा केली जाईल.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَقَالُوْا لَوْ شَآءَ الرَّحْمٰنُ مَا عَبَدْنٰهُمْ ؕ— مَا لَهُمْ بِذٰلِكَ مِنْ عِلْمٍ ۗ— اِنْ هُمْ اِلَّا یَخْرُصُوْنَ ۟ؕ
२०. आणि म्हणतात की अल्लाहने इच्छिले असते तर आम्ही त्यांची उपासना केली नसती. त्यांना त्याचे काहीच ज्ञान नाही. हे तर केवळ अटकळीच्या (खोट्या गोष्टी) बोलतात.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اَمْ اٰتَیْنٰهُمْ كِتٰبًا مِّنْ قَبْلِهٖ فَهُمْ بِهٖ مُسْتَمْسِكُوْنَ ۟
२१. काय आम्ही यापूर्वी त्यांना (दुसरा) एखादा ग्रंथ प्रदान केला आहे ज्याला यांनी मजबूतपणे धरून ठेवले आहे?
আৰবী তাফছীৰসমূহ:
بَلْ قَالُوْۤا اِنَّا وَجَدْنَاۤ اٰبَآءَنَا عَلٰۤی اُمَّةٍ وَّاِنَّا عَلٰۤی اٰثٰرِهِمْ مُّهْتَدُوْنَ ۟
२२. (नव्हे) किंबहुना हे तर म्हणतात की आम्हाला आमचे वाडवडील एका धर्मावर आढळले, आणि आम्ही त्यांच्याच पदचिन्हांवर चालून सन्मार्ग प्राप्त केला आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَكَذٰلِكَ مَاۤ اَرْسَلْنَا مِنْ قَبْلِكَ فِیْ قَرْیَةٍ مِّنْ نَّذِیْرٍ اِلَّا قَالَ مُتْرَفُوْهَاۤ ۙ— اِنَّا وَجَدْنَاۤ اٰبَآءَنَا عَلٰۤی اُمَّةٍ وَّاِنَّا عَلٰۤی اٰثٰرِهِمْ مُّقْتَدُوْنَ ۟
२३. आणि अशाच प्रकारे तुमच्या पूर्वीही आम्ही, ज्या ज्या वस्तीत एखादा खबरदार करणारा पाठविला, तिथल्या सुखवस्तू लोकांनी हेच उत्तर दिले की आम्हाला आपले पूर्वज (वाडवडील) (एकाच पाऊलवाटेवर आणि) एका धर्मावर आढळले आणि आम्ही तर त्यांच्याच पदचिन्हांचे अनुसरण करणारे आहोत.
আৰবী তাফছীৰসমূহ:
قٰلَ اَوَلَوْ جِئْتُكُمْ بِاَهْدٰی مِمَّا وَجَدْتُّمْ عَلَیْهِ اٰبَآءَكُمْ ؕ— قَالُوْۤا اِنَّا بِمَاۤ اُرْسِلْتُمْ بِهٖ كٰفِرُوْنَ ۟
२४. (पैगंबराने) सांगितलेही की जरी मी त्याहून अधिक चांगल्या (ध्येयापर्यंत पोहचविणारा) मार्ग घेऊन आलो आहे, ज्यावर तुम्हाला आपले वाडवडील आढळले (तरीही तुम्ही त्यांचेच अनुसरण कराल?) तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, आम्ही ते मान्य करणार नाहीत, जे देऊन तुम्हाला पाठविले गेले आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَانْتَقَمْنَا مِنْهُمْ فَانْظُرْ كَیْفَ كَانَ عَاقِبَةُ الْمُكَذِّبِیْنَ ۟۠
२५. तेव्हा आम्ही त्यांचा सूड घेतला आणि पाहा, खोटे ठरविणाऱ्यांचा काय परिणाम (अंत) झाला!
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَاِذْ قَالَ اِبْرٰهِیْمُ لِاَبِیْهِ وَقَوْمِهٖۤ اِنَّنِیْ بَرَآءٌ مِّمَّا تَعْبُدُوْنَ ۟ۙ
२६. आणि जेव्हा इब्राहीम (अलै.) आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, मी त्या गोष्टींपासून अलग आहे, ज्यांची तुम्ही उपासना करता.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اِلَّا الَّذِیْ فَطَرَنِیْ فَاِنَّهٗ سَیَهْدِیْنِ ۟
२७. त्या शक्ती-सामर्थ्याखेरीज, ज्याने मला निर्माण केले आहे आणि तोच मला मार्गदर्शनही करेल.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَجَعَلَهَا كَلِمَةً بَاقِیَةً فِیْ عَقِبِهٖ لَعَلَّهُمْ یَرْجِعُوْنَ ۟
२८. आणि इब्राहीम (अलै.) तिलाच आपल्या संततीलाही बाकी राहणारी गोष्ट कायम करून गेले, यासाठी की लोकांनी (अनेकेश्वरउपासनेपासून) आपला बचाव करीत राहावे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
بَلْ مَتَّعْتُ هٰۤؤُلَآءِ وَاٰبَآءَهُمْ حَتّٰی جَآءَهُمُ الْحَقُّ وَرَسُوْلٌ مُّبِیْنٌ ۟
२९. किंबहुना मी त्या लोकांना आणि त्यांच्या पूर्वजांना सामुग्री (आणि साधन) प्रदान केली, येथपावेतो की त्यांच्याजवळ सत्य आणि स्पष्टरित्या ऐकविणारा रसूल (पैगंबर) आला.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَلَمَّا جَآءَهُمُ الْحَقُّ قَالُوْا هٰذَا سِحْرٌ وَّاِنَّا بِهٖ كٰفِرُوْنَ ۟
३०. आणि सत्य येऊन पोहोचताच हे उद्‌गारले की ही तर जादू आहे, आणि आम्ही याचा इन्कार करणारे आहोत.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَقَالُوْا لَوْلَا نُزِّلَ هٰذَا الْقُرْاٰنُ عَلٰی رَجُلٍ مِّنَ الْقَرْیَتَیْنِ عَظِیْمٍ ۟
३१. आणि म्हणू लागले की हा कुरआन या दोन्ही वस्त्यांपैकी एखाद्या सुखसंपन्न माणसावर का अवतरित केला गेला नाही?
আৰবী তাফছীৰসমূহ:
اَهُمْ یَقْسِمُوْنَ رَحْمَتَ رَبِّكَ ؕ— نَحْنُ قَسَمْنَا بَیْنَهُمْ مَّعِیْشَتَهُمْ فِی الْحَیٰوةِ الدُّنْیَا وَرَفَعْنَا بَعْضَهُمْ فَوْقَ بَعْضٍ دَرَجٰتٍ لِّیَتَّخِذَ بَعْضُهُمْ بَعْضًا سُخْرِیًّا ؕ— وَرَحْمَتُ رَبِّكَ خَیْرٌ مِّمَّا یَجْمَعُوْنَ ۟
३२. काय तुमच्या पालनकर्त्याच्या दया-कृपेची हे विभागणी करतात? आम्हीच त्यांच्या ऐहिक जीवनाची (आजिविका) त्यांच्यात वाटून दिली आहे आणि एकाला दुसऱ्याहून अधिक चांगले केले आहे यासाठी की एकमेकांना अधीन करून घ्यावे आणि ज्याला हे लोक जमा करीत फिरत आहेत, त्याहून तुमच्या पालनकर्त्याची दया - कृपा अतिशय उत्तम आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَلَوْلَاۤ اَنْ یَّكُوْنَ النَّاسُ اُمَّةً وَّاحِدَةً لَّجَعَلْنَا لِمَنْ یَّكْفُرُ بِالرَّحْمٰنِ لِبُیُوْتِهِمْ سُقُفًا مِّنْ فِضَّةٍ وَّمَعَارِجَ عَلَیْهَا یَظْهَرُوْنَ ۟ۙ
३३. आणि जर अशी गोष्ट नसती की सर्व लोक एकाच पद्धतीचे अनुसरण करतील तर दयावान (रहमान) शी कुप्र (इन्कार) करणाऱ्यांच्या घरांची छते आम्ही चांदीची बनविली असती आणि जिने (पायऱ्या) देखील, ज्यावर ते चढतात.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَلِبُیُوْتِهِمْ اَبْوَابًا وَّسُرُرًا عَلَیْهَا یَتَّكِـُٔوْنَ ۟ۙ
३४. आणि त्यांच्या घरांचे दरवाजे व आसने देखील, ज्यावर ते तक्के (लोड) लावून बसतात.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَزُخْرُفًا ؕ— وَاِنْ كُلُّ ذٰلِكَ لَمَّا مَتَاعُ الْحَیٰوةِ الدُّنْیَا ؕ— وَالْاٰخِرَةُ عِنْدَ رَبِّكَ لِلْمُتَّقِیْنَ ۟۠
३५. आणि सोन्याचेही, आणि हा सर्व काही या जगाचाच लाभ आहे, आणि आखिरत तर तुमच्या पालनकर्त्याच्या निकट केवळ नेक सदाचारी लोकांकरिताच आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَمَنْ یَّعْشُ عَنْ ذِكْرِ الرَّحْمٰنِ نُقَیِّضْ لَهٗ شَیْطٰنًا فَهُوَ لَهٗ قَرِیْنٌ ۟
३६. आणि जो मनुष्य अल्लाहच्या स्मरणापासून सुस्ती करील, आम्ही त्याच्यावर एक सैतान निर्धारित करतो. तोच त्याचा साथीदार बनतो.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَاِنَّهُمْ لَیَصُدُّوْنَهُمْ عَنِ السَّبِیْلِ وَیَحْسَبُوْنَ اَنَّهُمْ مُّهْتَدُوْنَ ۟
३७. आणि ते त्यांना (अल्लाहच्या) मार्गापासून रोखतात आणि हे याच विचारात राहतात की आम्ही मार्गदर्शन प्राप्त केलेले आहोत.
আৰবী তাফছীৰসমূহ:
حَتّٰۤی اِذَا جَآءَنَا قَالَ یٰلَیْتَ بَیْنِیْ وَبَیْنَكَ بُعْدَ الْمَشْرِقَیْنِ فَبِئْسَ الْقَرِیْنُ ۟
३८. येथेपर्यंत की जेव्हा तो आमच्याजवळ येईल, तेव्हा म्हणेल की माझ्या आणि तुझ्या दरम्यान पूर्व आणि पश्चिमेचे अंतर असते तर फार बरे झाले असते. तू मोठा वाईट सोबती आहेस.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَلَنْ یَّنْفَعَكُمُ الْیَوْمَ اِذْ ظَّلَمْتُمْ اَنَّكُمْ فِی الْعَذَابِ مُشْتَرِكُوْنَ ۟
३९. आणि जेव्हा तुम्ही अत्याचार करूनच बसाल तर तुम्हाला आज कधीही तुम्हा सर्वांच्या शिक्षा - यातनेत सहभागी होणे काहीच लाभदायक ठरणार नाही.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اَفَاَنْتَ تُسْمِعُ الصُّمَّ اَوْ تَهْدِی الْعُمْیَ وَمَنْ كَانَ فِیْ ضَلٰلٍ مُّبِیْنٍ ۟
४०. तेव्हा काय तुम्ही बहिऱ्याला ऐकवू शकता किंवा आंधळ्याला मार्ग दाखवू शकता आणि त्याला जो उघड मार्गभ्रष्टतेत असावा.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَاِمَّا نَذْهَبَنَّ بِكَ فَاِنَّا مِنْهُمْ مُّنْتَقِمُوْنَ ۟ۙ
४१. मग जर आम्ही तुम्हाला येथून जरी नेले तरीही आम्ही त्यांच्याशी सूड घेणारच आहोत.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اَوْ نُرِیَنَّكَ الَّذِیْ وَعَدْنٰهُمْ فَاِنَّا عَلَیْهِمْ مُّقْتَدِرُوْنَ ۟
४२. किंवा जो काही वायदा त्यांच्याशी केला आहे, तो तुम्हाला दाखवू आम्ही त्यांच्यावरही सामर्थ्य बाळगतो.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَاسْتَمْسِكْ بِالَّذِیْۤ اُوْحِیَ اِلَیْكَ ۚ— اِنَّكَ عَلٰی صِرَاطٍ مُّسْتَقِیْمٍ ۟
४३. तेव्हा जी वहयी (प्रकाशना) तुमच्याकडे केली गेली आहे तिला दृढपणे बाळगून राहा. निःसंशय, तुम्ही सरळ मार्गावर आहात.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَاِنَّهٗ لَذِكْرٌ لَّكَ وَلِقَوْمِكَ ۚ— وَسَوْفَ تُسْـَٔلُوْنَ ۟
४४. आणि निःसंशय, हा (स्वतः) तुमच्याकरिता आणि तुमच्या जनसमूहाकरिता उपदेश आहे आणि निकट भविष्यात तुमची विचारणा होईल.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَسْـَٔلْ مَنْ اَرْسَلْنَا مِنْ قَبْلِكَ مِنْ رُّسُلِنَاۤ اَجَعَلْنَا مِنْ دُوْنِ الرَّحْمٰنِ اٰلِهَةً یُّعْبَدُوْنَ ۟۠
४५. आणि आमच्या त्या पैगंबरांकडून माहीत करून घ्या, ज्यांना आम्ही तुमच्या पूर्वी पाठविले होते की काय आम्ही रहमान (दयावान अल्लाह) च्या खेरीज दुसरी उपास्ये (आराध्य दैवते) निर्धारित केली होती, ज्यांची उपासना केली जावी.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَلَقَدْ اَرْسَلْنَا مُوْسٰی بِاٰیٰتِنَاۤ اِلٰی فِرْعَوْنَ وَمَلَاۡىِٕهٖ فَقَالَ اِنِّیْ رَسُوْلُ رَبِّ الْعٰلَمِیْنَ ۟
४६. आणि आम्ही मूसा (अलै.) ला आपल्या निशाण्यास देऊन, फिरऔन आणि त्याच्या दरबारी लोकांजवळ पाठविले, तेव्हा (मूसा, त्यांना) म्हणाले की मी समस्त विश्वांच्या पालनकर्त्याचा रसूल (संदेशवाहक) आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَلَمَّا جَآءَهُمْ بِاٰیٰتِنَاۤ اِذَا هُمْ مِّنْهَا یَضْحَكُوْنَ ۟
४७. तर जेव्हा ते आमच्या निशाण्या घेऊन त्या लोकांजवळ आले, तेव्हा ते अचानक त्यांची थट्टा उडवू लागले.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَمَا نُرِیْهِمْ مِّنْ اٰیَةٍ اِلَّا هِیَ اَكْبَرُ مِنْ اُخْتِهَا ؗ— وَاَخَذْنٰهُمْ بِالْعَذَابِ لَعَلَّهُمْ یَرْجِعُوْنَ ۟
४८. आणि आम्ही जी निशाणी त्यांना दाखवित होतो, ती दुसऱ्या निशाणीपेक्षा सरस असे, आणि आम्ही त्यांना शिक्षा - यातनेत धरले, यासाठी की त्यांनी रुजू करावे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَقَالُوْا یٰۤاَیُّهَ السّٰحِرُ ادْعُ لَنَا رَبَّكَ بِمَا عَهِدَ عِنْدَكَ ۚ— اِنَّنَا لَمُهْتَدُوْنَ ۟
४९. आणि ते म्हणाले, हे जादूगार! आमच्यासाठी आपल्या पालनकर्त्याला त्या गोष्टीची दुआ-प्रार्थना कर जिचा त्याने तुला वायदा दिलेला आहे विश्वास कर की आम्ही सर्न्माला लागू.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَلَمَّا كَشَفْنَا عَنْهُمُ الْعَذَابَ اِذَا هُمْ یَنْكُثُوْنَ ۟
५०. मग जेव्हा आम्ही त्यांच्यावरून तो अज़ाब हटविला तेव्हा त्यांनी त्याच वेळी आपला वायदा व आपल्या वचनाचा भंग केला.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَنَادٰی فِرْعَوْنُ فِیْ قَوْمِهٖ قَالَ یٰقَوْمِ اَلَیْسَ لِیْ مُلْكُ مِصْرَ وَهٰذِهِ الْاَنْهٰرُ تَجْرِیْ مِنْ تَحْتِیْ ۚ— اَفَلَا تُبْصِرُوْنَ ۟ؕ
५१. आणि फिरऔनने आपल्या जनसमूहात ऐलान करविले व म्हणाला, हे माझ्या जमातीच्या लोकानो! काय मिस्रचा देश माझा नाही, आणि माझ्या राजमहालांच्या खाली जे हे जलप्रवाह वाहत आहेत, काय तुम्ही पाहात नाही?
আৰবী তাফছীৰসমূহ:
اَمْ اَنَا خَیْرٌ مِّنْ هٰذَا الَّذِیْ هُوَ مَهِیْنٌ ۙ۬— وَّلَا یَكَادُ یُبِیْنُ ۟
५२. किंबहुना मी श्रेष्ठतम आहे याच्या तुलनेत जो तुच्छ आहे आणि साफ (स्पष्टपणे) बोलूही शकत नाही.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَلَوْلَاۤ اُلْقِیَ عَلَیْهِ اَسْوِرَةٌ مِّنْ ذَهَبٍ اَوْ جَآءَ مَعَهُ الْمَلٰٓىِٕكَةُ مُقْتَرِنِیْنَ ۟
५३. बरे, याच्यावर सोन्याची कांकणे का नाही अवतरित झालीत, किंवा याच्यासोबत फरिश्तेच झुंडीने (गोळा होऊन) आले असते.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَاسْتَخَفَّ قَوْمَهٗ فَاَطَاعُوْهُ ؕ— اِنَّهُمْ كَانُوْا قَوْمًا فٰسِقِیْنَ ۟
५४. तेव्हा त्याने आपल्या जनसमूहाच्या लोकांना मूर्ख बनविले आणि त्यांनी त्याचे म्हणणे मानले. निःसंशय, ते सर्व दुराचारी लोक होते.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَلَمَّاۤ اٰسَفُوْنَا انْتَقَمْنَا مِنْهُمْ فَاَغْرَقْنٰهُمْ اَجْمَعِیْنَ ۟ۙ
५५. मग जेव्हा त्यांनी आम्हाला क्रोधित केले, तेव्हा आम्ही त्यांचा सूड घेतला आणि सर्वांना (समुद्रात) बुडवून टाकले.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَجَعَلْنٰهُمْ سَلَفًا وَّمَثَلًا لِّلْاٰخِرِیْنَ ۟۠
५६. तेव्हा आम्ही त्यांना भूतकालीन करून टाकले आणि नंतरच्या लोकांकरिता नमूना बनविले.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَلَمَّا ضُرِبَ ابْنُ مَرْیَمَ مَثَلًا اِذَا قَوْمُكَ مِنْهُ یَصِدُّوْنَ ۟
५७. आणि जेव्हा मरियमच्या पुत्राचे उदाहरण सांगितले गेले, तेव्हा त्या वृत्तांताने तुमचा जनसमूह (आनंदाने) ओरडला.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَقَالُوْۤا ءَاٰلِهَتُنَا خَیْرٌ اَمْ هُوَ ؕ— مَا ضَرَبُوْهُ لَكَ اِلَّا جَدَلًا ؕ— بَلْ هُمْ قَوْمٌ خَصِمُوْنَ ۟
५८. आणि ते म्हणाले की आमची उपास्ये चांगली आहेत की तो? तुम्हाला त्यांचे हे सांगणे केवळ वाद घालण्याच्या हेतूने आहे, किंबहुना हे लोक आहेतच भांडखोर.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اِنْ هُوَ اِلَّا عَبْدٌ اَنْعَمْنَا عَلَیْهِ وَجَعَلْنٰهُ مَثَلًا لِّبَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ ۟ؕ
५९. तो (ईसा अलै.) देखील केवळ एक दास मात्र आहे, ज्याच्यावर आम्ही उपकार केला आणि त्याला इस्राईलच्या संततीकरिता (आपल्या सामर्थ्याची) निशाणी बनविले.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَلَوْ نَشَآءُ لَجَعَلْنَا مِنْكُمْ مَّلٰٓىِٕكَةً فِی الْاَرْضِ یَخْلُفُوْنَ ۟
६०. जर आम्ही इच्छिले असते तर तुमच्याऐवजी फरिश्ते बनविले असते ज्यांनी धरतीवर एकमेकांचे वारस म्हणून काम केले असते.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَاِنَّهٗ لَعِلْمٌ لِّلسَّاعَةِ فَلَا تَمْتَرُنَّ بِهَا وَاتَّبِعُوْنِ ؕ— هٰذَا صِرَاطٌ مُّسْتَقِیْمٌ ۟
६१. आणि निःसंशय, तो (ईसा अलै.) कयामतची निशाणी आहे, तेव्हा तुम्ही कयामतविषयी शंका करू नका आणि माझे म्हणणे मान्य करा. हाच सरळ मार्ग आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَلَا یَصُدَّنَّكُمُ الشَّیْطٰنُ ۚ— اِنَّهٗ لَكُمْ عَدُوٌّ مُّبِیْنٌ ۟
६२. आणि सैतानाने तुम्हाला प्रतिबंध घालू नये. निःसंशय, तो तुमचा उघड शत्रू आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَلَمَّا جَآءَ عِیْسٰی بِالْبَیِّنٰتِ قَالَ قَدْ جِئْتُكُمْ بِالْحِكْمَةِ وَلِاُبَیِّنَ لَكُمْ بَعْضَ الَّذِیْ تَخْتَلِفُوْنَ فِیْهِ ۚ— فَاتَّقُوا اللّٰهَ وَاَطِیْعُوْنِ ۟
६३. आणि जेव्हा ईसा (अलै.) ईशचमत्कार (मोजिजे) घेऊन आले, तेव्हा म्हणाले, मी तुमच्याजवळ ज्ञान घेऊन आलो आहे आणि अशासाठी आलो आहे की ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्ही मतभेद करता, त्या स्पष्ट कराव्यात. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय बाळगा आणि माझे आज्ञापालन करा.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اِنَّ اللّٰهَ هُوَ رَبِّیْ وَرَبُّكُمْ فَاعْبُدُوْهُ ؕ— هٰذَا صِرَاطٌ مُّسْتَقِیْمٌ ۟
६४. माझा आणि तुमचा स्वामी व पालनकर्ता अल्लाहच आहे. तेव्हा तुम्ही सर्व त्याचीच उपासना करा. हाच सरळ मार्ग आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَاخْتَلَفَ الْاَحْزَابُ مِنْ بَیْنِهِمْ ۚ— فَوَیْلٌ لِّلَّذِیْنَ ظَلَمُوْا مِنْ عَذَابِ یَوْمٍ اَلِیْمٍ ۟
६५. मग (इस्राईलच्या संततीच्या) समूहांनी आपसात मतभेद केला तेव्हा अत्याचारी लोकांकरिता सर्वनाश आहे. दुःखदायक दिवसाच्या अज़ाब (शिक्षा - यातने) ने.
আৰবী তাফছীৰসমূহ:
هَلْ یَنْظُرُوْنَ اِلَّا السَّاعَةَ اَنْ تَاْتِیَهُمْ بَغْتَةً وَّهُمْ لَا یَشْعُرُوْنَ ۟
६६. हे लोक फक्त कयामतच्या प्रतीक्षेत आहेत की ती अचानक त्यांच्यावर येऊन कोसळावी आणि त्यांना खबरही न व्हावी.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اَلْاَخِلَّآءُ یَوْمَىِٕذٍ بَعْضُهُمْ لِبَعْضٍ عَدُوٌّ اِلَّا الْمُتَّقِیْنَ ۟ؕ۠
६७. त्या दिवशी (जीवलग) मित्र देखील एकमेकांचे शत्रू बनतील, मात्र अल्लाहचे भय राखणाऱ्यांखेरीज.
আৰবী তাফছীৰসমূহ:
یٰعِبَادِ لَا خَوْفٌ عَلَیْكُمُ الْیَوْمَ وَلَاۤ اَنْتُمْ تَحْزَنُوْنَ ۟ۚ
६८. हे माझ्या दासांनो! आज ना तुमच्यावर एखादे भय आहे आणि ना तुम्ही दुःखी व्हाल.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اَلَّذِیْنَ اٰمَنُوْا بِاٰیٰتِنَا وَكَانُوْا مُسْلِمِیْنَ ۟ۚ
६९. ज्यांनी आमच्या आयतींवर ईमान राखले आणि जे मुस्लिम (आज्ञाधारक) बनून राहिले.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اُدْخُلُوا الْجَنَّةَ اَنْتُمْ وَاَزْوَاجُكُمْ تُحْبَرُوْنَ ۟
७०. तुम्ही आणि तुमच्या पत्न्या आनंदित व खूश होऊन जन्नतमध्ये दाखल व्हा.
আৰবী তাফছীৰসমূহ:
یُطَافُ عَلَیْهِمْ بِصِحَافٍ مِّنْ ذَهَبٍ وَّاَكْوَابٍ ۚ— وَفِیْهَا مَا تَشْتَهِیْهِ الْاَنْفُسُ وَتَلَذُّ الْاَعْیُنُ ۚ— وَاَنْتُمْ فِیْهَا خٰلِدُوْنَ ۟ۚ
७१. त्यांच्या चोहीबाजूंना सोन्याची ताटे आणि सोन्याचे प्याले फिरविले जातील. यात ते सर्व काही असेल, जे मनाला आवडणारे आणि नेत्यांना सुखदायक ठरणारे असेल, आणि तुम्ही त्यात नेहमी-नेहमीकरिता राहाल.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَتِلْكَ الْجَنَّةُ الَّتِیْۤ اُوْرِثْتُمُوْهَا بِمَا كُنْتُمْ تَعْمَلُوْنَ ۟
७२. आणि हीच ती जन्नत होय की तुम्ही आपल्या आचरणाच्या मोबदल्यात तिचे उत्तराधिकारी (वारस) बनविले गेले आहात.
আৰবী তাফছীৰসমূহ:
لَكُمْ فِیْهَا فَاكِهَةٌ كَثِیْرَةٌ مِّنْهَا تَاْكُلُوْنَ ۟
७३. इथे तुमच्यासाठी विपुल प्रमाणात मेवे आहेत, ज्यांना तुम्ही खात राहाल.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اِنَّ الْمُجْرِمِیْنَ فِیْ عَذَابِ جَهَنَّمَ خٰلِدُوْنَ ۟ۚ
७४. निःसंशय, अपराधी लोक जहन्नमच्या शिक्षा-यातनेत सदैव राहतील.
আৰবী তাফছীৰসমূহ:
لَا یُفَتَّرُ عَنْهُمْ وَهُمْ فِیْهِ مُبْلِسُوْنَ ۟ۚ
७५. ही (शिक्षा-यातना) कधीही त्यांच्यावरून सौम्य केली जाणार नाही आणि ते तिच्यातच नैराश्यग्रस्त पडून राहतील.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَمَا ظَلَمْنٰهُمْ وَلٰكِنْ كَانُوْا هُمُ الظّٰلِمِیْنَ ۟
७६. आणि आम्ही त्यांच्यावर अत्याचार नाही केला, उलट ते स्वतःच अत्याचारी होते.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَنَادَوْا یٰمٰلِكُ لِیَقْضِ عَلَیْنَا رَبُّكَ ؕ— قَالَ اِنَّكُمْ مّٰكِثُوْنَ ۟
७७. ते हाक मारून म्हणतील की हे मालक! तुमचा पालनकर्ता तर आमचा पुरता नायनाट करून टाकील! तो म्हणेल, तुम्हाला तर (याच अवस्थेत नेहमी) राहावयाचे आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
لَقَدْ جِئْنٰكُمْ بِالْحَقِّ وَلٰكِنَّ اَكْثَرَكُمْ لِلْحَقِّ كٰرِهُوْنَ ۟
७८. आम्ही तर तुमच्याजवळ सत्य घेऊन आलो, परंतु तुमच्यापैकी बहुतेक लोक सत्याशी तिरस्कार करणारे होते.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اَمْ اَبْرَمُوْۤا اَمْرًا فَاِنَّا مُبْرِمُوْنَ ۟ۚ
७९. काय त्यांनी एखाद्या कामाचा मजबूत इरादा करून घेतला आहे? तर मग खात्री बाळगा की आम्हीही मजबूत काम करणारे आहोत.
আৰবী তাফছীৰসমূহ:
اَمْ یَحْسَبُوْنَ اَنَّا لَا نَسْمَعُ سِرَّهُمْ وَنَجْوٰىهُمْ ؕ— بَلٰی وَرُسُلُنَا لَدَیْهِمْ یَكْتُبُوْنَ ۟
८०. काय त्यांनी असे गृहित धरले आहे की आम्ही त्यांच्या गुप्त गोष्टींना आणि त्यांच्या कानगोष्टींना ऐकत नाहीत? (निःसंशय आम्ही सर्व काही ऐकतो) किंबहुना आम्ही पाठविलेले (फरिश्ते) त्यांच्याजवळच लिहित आहेत.
আৰবী তাফছীৰসমূহ:
قُلْ اِنْ كَانَ لِلرَّحْمٰنِ وَلَدٌ ۖۗ— فَاَنَا اَوَّلُ الْعٰبِدِیْنَ ۟
८१. (तुम्ही) सांगा की, जर समजा रहमान (दयावान अल्लाह) ची एखादी संतती असती तर मी सर्वांत प्रथम उपासना करणारा राहिले असतो.
আৰবী তাফছীৰসমূহ:
سُبْحٰنَ رَبِّ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ رَبِّ الْعَرْشِ عَمَّا یَصِفُوْنَ ۟
८२. आकाशांचा आणि धरती व अर्श (ईश-सिंहासना) चा स्वामी, त्या गोष्टींपासून पवित्र (व्यंग-दोष विरहित) आहे. ज्या (हे) सांगतात.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَذَرْهُمْ یَخُوْضُوْا وَیَلْعَبُوْا حَتّٰی یُلٰقُوْا یَوْمَهُمُ الَّذِیْ یُوْعَدُوْنَ ۟
८३. आता तुम्ही त्यांना याच वाद-विवादात आणि खेळण्या-बागडण्यात सोडून द्या. येथेपर्यंत की त्यांची त्या दिवसाशी गाठ पडावी, ज्याचा यांना वायदा दिला जात आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَهُوَ الَّذِیْ فِی السَّمَآءِ اِلٰهٌ وَّفِی الْاَرْضِ اِلٰهٌ ؕ— وَهُوَ الْحَكِیْمُ الْعَلِیْمُ ۟
८४. आणि तोच आकाशांमध्येही पूज्य (उपासनीय) आहे आणि धरतीवरही तोच उपासना करण्यायोग्य आहे आणि तो मोठा बुद्धिकौशल्य बाळगणारा आणि संपूर्ण ज्ञान राखणारा आहे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَتَبٰرَكَ الَّذِیْ لَهٗ مُلْكُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ وَمَا بَیْنَهُمَا ۚ— وَعِنْدَهٗ عِلْمُ السَّاعَةِ ۚ— وَاِلَیْهِ تُرْجَعُوْنَ ۟
८५. आणि तो मोठा शुभ-कल्याणकारी आहे, ज्याच्या हाती आकाशांचे आणि धरतीचे आणि या दोघांच्या दरम्यानचे राज्य आहे आणि कयामतचे ज्ञान देखील त्याच्याचजवळ आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही सर्व परतविले जाल.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَلَا یَمْلِكُ الَّذِیْنَ یَدْعُوْنَ مِنْ دُوْنِهِ الشَّفَاعَةَ اِلَّا مَنْ شَهِدَ بِالْحَقِّ وَهُمْ یَعْلَمُوْنَ ۟
८६. आणि ज्यांना हे लोक अल्लाहखेरीज पुकारतात, ते शिफारस करण्याचा अधिकार बाळगत नाही, तथापि (शिफारसीचा हक्क ते बाळगतात) जे सत्य गोष्टींचा स्वीकार करतील आणि त्यांना ज्ञानही असावे.
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَلَىِٕنْ سَاَلْتَهُمْ مَّنْ خَلَقَهُمْ لَیَقُوْلُنَّ اللّٰهُ فَاَنّٰی یُؤْفَكُوْنَ ۟ۙ
८७. जर तुम्ही त्यांना विचाराल की त्यांना कोणी निर्माण केले तर हे अवश्य उत्तर देतील की अल्लाहने, मग हे कोठे उलट जात आहेत?
আৰবী তাফছীৰসমূহ:
وَقِیْلِهٖ یٰرَبِّ اِنَّ هٰۤؤُلَآءِ قَوْمٌ لَّا یُؤْمِنُوْنَ ۟ۘ
८८. आणि त्यांचे (पैगंबरांचे अधिकांश) हे म्हणणे की हे माझ्या पालनकर्त्या! निःसंशय, हे असे लोक आहेत, जे ईमान राखत नाहीत.
আৰবী তাফছীৰসমূহ:
فَاصْفَحْ عَنْهُمْ وَقُلْ سَلٰمٌ ؕ— فَسَوْفَ یَعْلَمُوْنَ ۟۠
८९. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवून घ्या आणि (निरोपाचा) सलाम सांगा. त्यांना (स्वतःलाच) माहीत पडेल.
আৰবী তাফছীৰসমূহ:
 
অৰ্থানুবাদ ছুৰা: ছুৰা আঝ-ঝুখৰূফ
ছুৰাৰ তালিকা পৃষ্ঠা নং
 
আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ - অনুবাদসমূহৰ সূচীপত্ৰ

মাৰাঠী ভাষাত আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ। অনুবাদ কৰিছে মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী চাহাবে। প্ৰকাশ কৰিছে আল-বিৰ ফাউণ্ডেচন মুম্বাই।

বন্ধ