२. निःसंशय, आम्ही हा ग्रंथ सत्यासह तुमच्याकडे अवतरित केला आहे, तेव्हा तुम्ही केवळ अल्लाहचीच भक्ती - उपासना करा, त्याच्याचकरिता दीन (धर्मा) ला विशुद्ध करीत.
३. ऐका! अल्लाहच्याचकरिता विशुद्ध (निर्भेळ) उपासना करणे आहे,१ आणि ज्या लोकांनी त्याच्याखेरीज अवलिया बनवून ठेवले आहेत (आणि असे म्हणतात) की आम्ही यांची उपासना केवळ एवढ्यासाठी करतो की हे (बुजुर्ग, थोर) आम्हाला अल्लाहच्या निकट करतील, हे लोक ज्या गोष्टीबाबत मतभेद करीत आहेत, तिचा (न्यायसंगत) फैसला अल्लाह स्वतः करील, खोट्या आणि कृतघ्न लोकांना अल्लाह मार्ग दाखवित नाही.
(१) इथे त्याचीच उपासना निखालसपणे करण्यावर जोर दिला गेला आहे, ज्याचा आदेश या आधीच्या आयतीत आहे की उपासना व आज्ञापालन केवळ एक अल्लाहचाच अधिकार आहे. ना त्याच्या उपासनेत दुसऱ्या कोणाला भागीदार बनविणे वैध आहे, ना आज्ञा पालनाचाही त्याच्याखेरीज दुसरा कोणी हक्कदार आहे. परंतु पैगंबर सल्लल्लाहु अलेहि वसल्लम यांच्या आज्ञा पालनास स्वतः अल्लाहनेच आपले आज्ञापालन म्हटले आहे, तेव्हा पैगंबर (स.) सल्लल्लाहु अलेहि वसल्लम यांचा आज्ञाधारक अल्लाहचाच आज्ञाधारक आहे, दुसऱ्या कोणाचा नाही. तसेच उपासनेत ही गोष्ट नाही. यासाठी की उपासना अल्लाहखेरीज एखाद्या मोठ्यात मोठ्या पैगंबराचीही वैध नाही, तर सर्वसामान्य माणसाची कोठून? ज्यांना लोकांनी मनमानी करून अल्लाहच्या हक्क व अधिकारांचा मालक बनवून ठेवले आहे. ‘माअन्जुलल्लाहु बिहा मिन सुलतान.’ ‘‘अल्लाहतर्फे या संदर्भात कोणतेही प्रमाण नाही.’’
४. जर अल्लाहने संततीच इच्छिली असती, तर आपल्या निर्मितीमधून ज्याला इच्छिले असते त्याची निवड केली असती (परंतु) तो तर पवित्र (व्यंग-दोषविरहित) आहे. तोच अल्लाह आहे एक आणि शक्ती - सामर्थ्य राखणारा.
५. खूप चांगल्या पद्धतीने त्याने आकाशांची आणि धरतीची निर्मिती केली. तो रात्रीला दिवसावर आणि दिवसाला रात्रीवर गुंडाळतो आणि त्याने सूर्य व चंद्राला कार्यरत केले आहे. प्रत्येक निर्धारित अवधीपर्यंत चालत आहे. विश्वास करा की तोच वर्चस्वशाली आणि अपराधांना माफ करणारा आहे.
६. त्याने तुम्हा सर्वांना एकाच जिवापासून निर्माण केले, मग त्यापासून त्याची जोडी निर्माण केली आणि तुमच्याकरिता जनावरांपैकी आठ जोडे (नर-मादा) अवतरित केले. तो तुम्हाला तुमच्या मातांच्या गर्भामध्ये एका स्वरूपानंतर दुसऱ्या स्वरुपात घडवितो, तीन तीन अंधारामध्ये हाच अल्लाह तुमचा रब (स्वामी व पालनकर्ता) आहे त्याच्याचकरिता राज्यसत्ता आहे, त्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही. मग तुम्ही कोठे भटकत जात आहात?
७. जर तुम्ही कृतघ्नता कराल तर (लक्षात ठेवा की) अल्लाह तुम्हा सर्वांपासून निःस्पृह आहे आणि तो आपल्या दासांच्या कृतघ्नतेने खूश नाही आणि जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल तर तो त्यास तुमच्यासाठी पसंत करील आणि कोणीही कोणाचे ओझे उचलणार नाही, मग तुम्हा सर्वांचे परतणे तुमच्या पालनकर्त्याकडेच आहे, तो तुम्हाला दाखवून देईल, जे काही तुम्ही करत होते. निःसंशय, तो मनातल्या गोष्टी देखील जाणतो.
८. आणि माणसाला जेव्हा एखादे दुःख पोहोचते, तेव्हा तो खूप ध्यान एकवटून आपल्या पालनकर्त्यास पुकारतो. मग जेव्हा अल्लहा आपल्याकडुन त्याला सुख प्रदान करतो तो याच्यापूर्वी जी दुआ - प्रार्थना करीत होता, तिला पूर्णपणे विसरतो, आणि अल्लाहचे भागीदार ठरवू लागतो. ज्याद्वारे (इतरांनाही) त्याच्या मार्गापासून विचलित करावे. (तुम्ही) सांगा की आपल्या कुप्र (सत्य-विरोधा) चा फायदा आणखी काही दिवस उचलून घ्या, (शेवटी) तू जहन्नमवासींपैकी होणार आहेस.
९. काय तो मनुष्य, जो रात्रीच्या वेळी सजदा आणि उभे राहण्याच्या अवस्थेत उपासना करण्यात घालवित असेल, आखिरतचे भय बाळगत असेल आणि आपल्या पालनकर्त्याच्या दया - कृपेची आस बाळगत असेल, आणि तो, जो याच्या उलट असेल, समान असू शकतात, बरे हे सांगा की विद्वान आणि अज्ञानी दोघे समान आहेत? निःसंशय, बोध तर तेच प्राप्त करतात, जे बुद्धिमान असतील.
१०. सांगा, (अल्लाह फर्मावितो) की हे माझ्या ईमान राखणाऱ्या दासांनो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगत राहा. जे या जगात सत्कर्म करीत राहतात त्याच्यासाठी उत्तम मोबदला आहे आणि अल्लाहची धरती मोठी विशाल (विस्तृत) आहे. धीर संयम राखणाऱ्यांनाच त्यांचा पुरेपूर अगणित मोबदला दिला जातो.
१५. तुम्ही त्याच्याखेरीज वाटेल त्याची भक्ती - उपासना करीत राहा, सांगा की वस्तुतः तोट्यात तेच आहेत, जे स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना कयामतच्या दिवशी हानीग्रस्त करतील. लक्षात ठेवा, उघड स्वरूपाचा तोटा हाच आहे.
१६. त्यांना वरून-खालून आगीच्या ज्वाला छतासारख्या झाकत असतील. हाच अज़ाब होय, ज्यापासून अल्लाह आपल्या दासांना भय दाखवित आहे. हे माझ्या दासांनो! माझे भय बाळगत राहा.
१७. आणि जे लोक अल्लाहखेरीज तागूत (इतरां) ची उपासना करण्यापासून अलिप्त राहिले आणि तन-मनपूर्वक अल्लाहकडे आकर्षित राहिले, ते शुभ-समाचाराचे हक्कदार आहेत. तेव्हा माझ्या दासांना खूशखबर ऐकवा.
१८. जे लोक कथनास कान लावून (लक्ष्यपूर्वक) ऐकतात, मग जी मोठी चांगली गोष्ट असेल, तिच्यानुसार आचरण करतात, हेच ते लोक होत, ज्यांना अल्लाहने मार्गदर्शन केले आहे आणि हेच लोक बुद्धिमानही आहेत.
२०. मात्र ते लोक, जे आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगत राहिले, त्यांच्यासाठी उच्च घरे आहेत. ज्यांच्यावर देखील मजले बनले आहेत आणि त्यांच्या खाली जलप्रवाह (झरे) वाहत आहेत. हा अल्लाहचा वायदा आहे आणि तो वचन भंग करीत नाही.
२१. काय तुम्ही नाही पाहिले की अल्लाह आकाशातून पाणी अवतरित करतो आणि त्यास जमिनीच्या झऱ्यांमध्ये पोहचवितो, मग त्याच्याचद्वारे अनेक प्रकारची शेती उगवितो, मग ती (शेते) सुकतात आणि तुम्ही त्यांना पिवळ्या रंगात पाहतात, मग त्यांचा अगदी चुराडा करून टाकतो. यात बुद्धिमानांकरिता मोठा बोध आहे.
२२. काय तो मनुष्य ज्याची छाती (हृदय) अल्लाहने इस्लामकरिता खुली केलीी आहे, तर तो आपल्या पालनकर्त्यातर्फे एका नूर (प्रकाशा) वर आहे, आणि सर्वनाश आहे त्या लोकांकरिता, ज्यांची हृदये अल्लाहच्या स्मरणाने (प्रभावित होत नाही, किंबहुना) कठोर झाली आहेत. हे लोक पूर्णतः मार्गभ्रष्टतेत पडले आहेत.
२३. अल्लाहने सर्वांत उत्तम वाणी अवतरित केली आहे, जो असा ग्रंथ आहे की आपसात मिळताजुळता आणि वारंवार पुनरावृत्ती केलेल्या आयतींचा आहे, ज्याद्वारे त्या लोकांच्या शरीरांचा थरकाप होतो, जे आपल्या पालनकर्त्याचे भय राखतात. शेवटी त्यांची शरीरे आणि हृदये अल्लाहच्या नामःस्मरणाकडे (कोमल होऊन) झुकतात. हे आहे अल्लाहचे मार्गदर्शन. ज्याच्याद्वारे तो ज्याला इच्छितो सत्य-मार्गाला लावतो, आणि ज्याला अल्लाहच मार्गाचा विसर पाडील तर त्याला मार्ग दाखविणारा कोणी नाही.
२४. बरे, जो मनुष्य कयामतच्या दिवसाच्या फार अधिक वाईट शिक्षा-यातनांची ढाल आपल्या चेहऱ्याला बनविल (तर अशा) अत्याचारी लोकांना सांगितले जाईल की आपल्या कृत कर्मांची गोडी चाखा.
२९. अल्लाह एक उदाहरण निवेदन करीत आहे की एक असा मनुष्य, ज्यात अनेक आपसात भिन्नता राखणारे भागीदार आहेत आणि दुसरा तो मनुष्य, जो फक्त एकाचाच दास आहे. काय हे दोघे गुणवैशिष्ट्यात एकसमान आहेत?१ सर्व प्रशंसा अल्लाहकरिता आहे. वास्तविक, त्यांच्यापैकी अधिकांश लोक जाणत नाहीत.
(१) यात अनेकेश्वरवादी आणि एकेश्वरवादीचे उदाहरण दिले गेले आहे. अर्थात असा एक गुलाम, जो अनेक मालकांचा दास आहे, जे आपसात भांडत असतात आणि एक दुसरा गुलाम, ज्याचा केवळ एकच मालक आहे. त्याच्या मिळकतीत त्याचा कोणीही भागीदार नाही, तर काय हे दोन्ही गुलाम समान ठरू शकतात? नाही, कदापि नाही. त्याचप्रमाणे तो अनेकेश्वरवादी जो अल्लाहसोबत इतर उपास्यांचीही उपासना करतो आणि दुसरा निखालस ईमान राखणारा जो फक्त अल्लाहची उपासना करतो व त्याच्यासोबत कोणालाही सहभागी बनवित नाही, दोघे समान ठरू शकत नाही.
३०. निःसंशय, स्वतः तुम्हालाही मृत्यु येईल आणि हे सर्व देखील मरण पावणार आहेत.१
(१) अर्थात हे पैगंबर! तुम्ही स्वतःही आणि तुमचे विरोधकही मेल्यानंतर या जगातून आमच्याजवळ आखिरत (परलोका) मध्ये येतील नश्वर जदात तर एकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवादचा फैसला तुमच्या दरम्यान होऊ शकला नाही आणि तुम्ही याविषयी आपसात भांडत राहिले, परंतु या ठिकाणी मी याचा फैसला करीन आणि विशुद्ध एकेश्वरवाद बाळगणाऱ्यांना जन्नतमध्ये आणि इन्कार करणाऱ्या खोट्या अनेकेश्वरवाद्यांना जहन्नमध्ये टाकीन. या आयतीद्वारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या मृत्युचा पुरावा मिळतो. जसा सूरह आले इम्रानच्या आयत क्र. १४४ द्वारेही मिळतो आणि याच आयतीपासून अर्थ काढून हजरत अबु बक्र सिद्दीक यांनी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा मृत्यु सिद्ध केला. यास्तव नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याच्याविषयीही श्रद्धा राखणे की त्यांना बरजख (मृत्युनंतर कयामतपावेतोच्या दरम्यानचा अवधी) मध्ये तसेच जीवन लाभले आहे जसे जिवंत पाणी जगात लाभले होते, पवित्र कुरआनच्या विपरित आहे. त्यांचाही अन्य माणसांसारखा मृत्यु झाला. त्यांनाही गाडले गेले. कबरीत त्यांना बरजख (दरम्यान) चे जीवन अवश्य लाभले आहे ज्याच्या अवस्थेचे ज्ञान आम्हाला नाही, परंतु कबरीत त्यांना दुसऱ्यांदा या जगाचे जीवन दिले गेले नाही.
३२. त्याहून जास्त अत्याचारी कोण आहे, जो अल्लाहच्या संबंधाने खोटे बोलेल आणि सत्य (धर्म) त्याच्याजवळ आला असता, तो त्यास खोटे असल्याचे सांगेल? काय अशा काफिरांचे ठिकाण जहन्नम नव्हे?
३६. काय अल्लाह आपल्या दासांकरिता पर्याप्त नाही? हे लोक तुम्हाला अल्लाहखेरीज इतरांचे भय दाखवित आहेत, आणि ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करील, त्याला मार्ग दाखविणारा कोणीही नाही.
३८. जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाशांना व धरतीला कोणी निर्माण केले आहे, तर ते निश्चित हेच उत्तर देतील की अल्लाहने! तुम्ही त्यांना सांगा की, बरे हे तर सांगा की ज्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारता, जर अल्लाह मला नुकसान पोहोचवू इच्छिल, तर काय हे त्याच्या नुकसानाला हटवू शकतात किंवा जर अल्लाह माझ्यावर कृपा करू इच्छित असेल तर काय हे त्याच्या कृपेला अडवू शकतात? (तुम्ही) सांगा की अल्लाह (महान) मला पुरेसा आहे. भरवसा राखणारे त्याच्यावरच भरवसा राखतात.
३९. सांगा की, हे माझ्या जनसमुदाया (उम्मत) च्या लोकांनो! तुम्ही आपल्या जागी कर्म करीत राहा, मी आपल्या जागी कर्म करीत आहे.१ लवकरच तुम्ही (परिणाम) जाणून घ्याल.
(१) अर्थात जर तुम्ही माझे एकेश्वरवादाचे आवाहन मान्य करीत नाही, ज्यासह अल्लाहने मला पाठविले आहे तर ठीक आहे, तुमची मर्जी तुम्ही आपल्या अवस्थेत राहा, जिच्यात तुम्ही आहात, मी त्या अवस्थेत राहतो, जिच्यात अल्लाहने मला ठेवले आहे.
४१. निःसंशय, आम्ही तुमच्यावर सत्यासह हा ग्रंथ लोकांसाठी अवतरित केला आहे, तेव्हा जो मनुष्य सरळ मार्गावर येईल तर ते त्याच्या स्वतःच्या (फायद्या) करिता आहे आणि जो मार्गभ्रष्ट होईल तर त्याच्या मार्गभ्रष्टतेचे ओझे त्याच्याच (शिरा) वर आहे. तुम्ही त्यांच्याबाबत जबाबदार नाही.
४२. अल्लाहच जीवांना (आत्म्यांना) त्यांच्या मृत्युसमयी आणि ज्यांचा मृत्यु आला नाही त्यांना त्यांच्या निद्रावस्थेत काबीज करून घेतो, मग ज्यांच्या मृत्युचा आदेश दिला गेला आहे, त्यांना तो रोखून घेतो आणि इतर (आत्म्यांना) एका निर्धारित वेळेपर्यर्ंत सोडून देतो. विचार चिंतन करणाऱ्यांसाठी यात निश्चितपणे अनेक निशाण्या आहेत.
४३. काय त्या लोकांनी अल्लाहखेरीज (दुसऱ्यांना) शिफारस करणारे निर्धारित करून ठेवले आहेत? (तुम्ही) सांगा की मग ते काहीच हक्क राखत नसले तरी आणि काही अक्कल राखत नसले तरीही?
४५. आणि जेव्हा एकमेव अल्लाहचे वर्णन केले जाते तेव्हा त्या लोकांची हृदये तिरस्कार करू लागतात, जे आखिरतवर ईमान राखत नाहीत, आणि जेव्हा त्याच्याखेरीज (इतरां) चे वर्णन केले जाते, तेव्हा त्यांची हृदये स्पष्टतः आनंदित होतात.१
(१) होय. जेव्हा असे म्हटले जाते की अमुक अमुक देखील उपास्य आहे, किंवा ते देखील अल्लाहचे नेक सदाचारी दास आहेत. ते सुद्धा काही हक्क राखतात, तेही संकट दूर करणारे आहेत, गरजपूर्ती करणारे आहेत, तेव्हा हे अनेकेश्वरवादी खूश होतात. मार्गभ्रष्ट लोकांची आज हीच अवस्था आहे, जेव्हा त्यांना सांगितले जाते की, केवळ ‘हे अल्लाह, मदद’ असे म्हणा, कारण अल्लाहखेरीज दुसरा कोणी मदत करणारा नाही. तेव्हा क्रोधित होतात. हे बोलणे त्यांना मोठे वाईट वाटते, परंतु जेव्हा ‘या अली मदद’, ‘या रसूल मदद’ म्हटले जाते, त्याचप्रमाणे इतर मरण पावलेल्यांकडून मदत मागितली जाते, त्यांच्या नावाने आर्जव केले जाते, उदा. ‘या शेख अब्दुल कादिर शेअन लिल्लाह’ वगैरे तर मग त्यांची मने आनंदविभोर होतात.
४६. (तुम्ही) सांगा की हे अल्लाह! आकाशांना आणि धरतीला निर्माण करणाऱ्या, लपलेल्या व उघड गोष्टी जाणणाऱ्या! तूच आपल्या दासांच्या दरम्यान त्या गोष्टींचा फैसला करशील, ज्या गोष्टींमध्ये ते मतभेद करीत होते.
४७. आणि अत्याचारी लोकांजवळ जर ते सर्व काही असावे जे धरतीवर आहे, आणि त्यासोबत आणखी तेवढेच असावे तरी देखील कठोर शिक्षा यातनेच्या मोबदल्यात कयामतच्या दिवशी हे सर्व काही देऊन टाकतील, आणि त्यांच्यासमोर अल्लाहतर्फे असे जाहीर होईल ज्याचे त्यांनी अनुमानही केले नव्हते.
४९. माणसाला जेव्हा एखादे दुःख यातना पोहोचते तेव्हा तो आम्हाला पुकारतो, मग जेव्हा आम्ही त्याला आपल्यातर्फे एखादे सुखप्रदान करतो, तेव्हा म्हणू लागतो की हे तर मला केवळ आपल्या अक्कल हुशारीमुळे प्रदान केले गेले आहे, किंबहुना ही कसोटी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक हे जाणत नाहीत.
५१. मग त्यांच्या (कर्मांची) समस्त दुष्परिणती त्यांच्यावर येऊन कोसळली आणि यांच्यापैकी जे दुराचारी आहेत, त्यांच्या कृत-कर्मांची दुष्परिणतीही आता त्यांच्यावर येऊन कोसळेल. हे (आम्हाला) परास्त करणारे नाहीत.
५२. काय त्यांना हे नाही माहीत की अल्लाह ज्याच्यासाठी इच्छितो आजिविका वाढवितो आणि ज्याच्यासाठी इच्छितो मोजून मापून देतो, ईमान राखणाऱ्यांकरिता यात मोठमोठ्या निशाण्या आहेत.
५३. (माझ्यातर्फे) सांगा की, हे माझ्या दासांनो! ज्यांनी आपल्या प्राणांवर अत्याचार केला आहे, तुम्ही अल्लाहच्या कृपेपासून निराश होऊ नका. निःसंशय, अल्लाह समस्त अपराधांना माफ करतो. वस्तुतः तो मोठा माफ करणारा, मोठा दया करणारा आहे.
५५. आणि अनुसरण करा त्या सर्वांत उत्तम गोष्टीचे, जी तुमच्याकडे तुमच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित केली गेली आहे, यापूर्वी की तुमच्यावर अचानक अल्लाहची शिक्षा यातना यावी आणि तुम्हाला खबरही न व्हावी.
५६. (असे न व्हावे की) एखाद्या माणसाने म्हणावे की, अरेरे! खेद आहे या गोष्टीवर की मी अल्लाहच्या बाबतीत सुस्ती केली, किंबहुना मी थट्टा उडविणाऱ्यांमध्येच राहिलो.
५९. का नाही? निश्चितच तुमच्याजवळ माझ्या आयती पोहचल्या होत्या ज्यांना तू खोटे ठरविले आणि घमेंड (व गर्व) केला आणि तू काफिर (सत्यविरोधक) लोकांपैकीच होतास.
६०. आणि ज्या लोकांनी अल्लाहविषयी असत्य रचले आहे, तर तुम्ही पाहाल की कयामतच्या दिवशी त्यांचे चेहरे काळे झाले असतील. काय घमेंड करणाऱ्यांचे ठिकाण जहन्नममध्ये नाही?
६१. आणि ज्या लोकांनी अल्लाहचे भय (तकवा) बाळगले, त्यांना अल्लाह त्यांच्या सफलतेसह वाचविल, त्यांना एखादे दुःख स्पर्शही करू शकणार नाही आणि ना ते कशाही प्रकारे दुःखी होतील.
६५. आणि निःसंशय, तुमच्याकडेही आणि तुमच्यापूर्वीच्या (सर्व पैगंबरां) कडेही वहयी केली गेली आहे की जर तुम्ही शिर्क (अल्लाहखेरीज दुसऱ्यांची भक्ती उपासना) केल्यास, निश्चितच तुमचे सर्व कर्म वाया जाईल आणि खात्रीने तुम्ही नुकसान उचलणाऱ्यांपैकी व्हाल.
६७. आणि त्या लोकांनी, अल्लाहचा जसा सन्मान करायला पाहिजे होता तसा केला नाही. समस्त धरती, कयामतच्या दिवशी त्याच्या मुठीत असेल आणि संपूर्ण आकाश त्याच्या उजव्या हातात गुंडाळलेले असेल तो मोठा पवित्र आणि अति उच्च आहे, त्या प्रत्येक वस्तू (व गोष्टी) पासून जिला लोक त्याचा सहभागी ठरवितात.
६८. आणि सूर (कयामतचा आरंभ दर्शविणारा शंख) फुंकला जाईल, तेव्हा आकाशांमध्ये आणि धरतीत अस्तित्वात असणारे सर्व बेशुद्ध होऊन कोसळतील तथापि ज्याला अल्लाह इच्छिल (तो सलामत राहील), मग दुसऱ्यांदा सूर फुंकला जाईल तेव्हा ते अचानक उभे राहून पाहू लागतील.
६९. आणि धरती आपल्या पालनकर्त्याच्या दिव्य तेजाने लख्ख चकाकेल. कर्म-लेख सादर केले जातील. पैगंबरांना आणि साक्षींना आणले जाईल आणि लोकांच्या दरम्यान न्यायपूर्वक फैसले केले जातील आणि त्यांच्यावर अत्याचार केला जाणार नाही.
७१. आणि काफिरांचे झुंडच्या झुंड जहन्नमकडे हाकत नेले जातील जेव्हा ते तिच्याजवळ पोहचतील, तिचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले जातील आणि तिथले रक्षक त्यांना विचारतील की काय तुमच्या जवळ तुमच्याचमधून रसूल (संदेशवाहक) आले नव्हते? जे तुम्हाला तुमच्या पालनकर्त्यांच्या आयती वाचून ऐकवित होते आणि तुम्हाला या दिवसाच्या भेटीबाबत सावध करीत होते. हे उत्तर देतील की होय! का नाही? परंतु अज़ाब (शिक्षा यातने) चे फर्मान काफिरांना (शेवटी) लागू झाले.
७३. आणि जे लोक आपल्या पालनकर्त्याचे भय राखत होते, त्यांचे समूहच्या समूह जन्नतकडे पाठविले जातील, येथेपर्यर्ंत की जेव्हा ते जन्नतजवळ पोहोचतील आणि दरवाजे उघडले जातील,१ आणि तिथले रक्षक त्यांना म्हणतील की तुमच्यावर सलाम असो, तुम्ही खूश राहा. तर तुम्ही यांच्यात सदैवकाळाकरिता या.
(१) हदीस वचनातील उल्लेखानुसार जन्नतचे आठ दरवाजे आहेत. त्यापैकी एकाचे नाव ‘रय्यान’ आहे, ज्यातून केवळ रोजा (व्रत) राखणारेच दाखल होतील. (सहीह बुखारी नं. २२५७, मुस्लिम नं. ८०८) त्याच प्रकारे इतर दरवाज्यांचीही नावे असतील. उदा. नमाजचा दरवाजा, जकातचा दरवाजा, जिहाद (धर्मयुद्धा) चा दरवाजा वगैरे. (सहीह बुखारी किताबुस सेयाम, मुस्लिम-किताबुज जकात) प्रत्येक दरवाज्याची रुंदी चाळीस वर्षांच्या अंतराएवढी असेल, तरीही ते भरगच्च असतील. (सहीह मुस्लिम किताबुज जोहद) सर्वांत प्रथम जन्नतचा दरवाजा ठोठावणारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असतील. (मुस्लिम किताबुल ईमान)
७४. आणि हे म्हणतील की, आभारी आहोत अल्लाहचे, ज्याने आपला वायदा पूर्ण केला, आणि आम्हाला या धरतीचा वारस बनविले की जन्नतमध्ये वाटेल तिथे राहावे. तेव्हा सत्कर्म करणाऱ्यांचा किती चांगला मोबदला आहे!
७५. आणि तुम्ही फरिश्त्यांना अल्लाहच्या अर्श (सिंहासना) भोवती घेरा बनवित, आपल्या पालनकर्त्याची प्रशंसा आणि पावित्र्याचे गुणगान करताना पाहाल, १ आणि त्यांच्या दरम्यान न्यायपूर्ण फैसला केला जाईल, आणि सांगितले जाईल की समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, जो समस्त विश्वाचा स्वामी व पालनकर्ता आहे.
(१) अल्लाहच्या फैसल्यानंतर जेव्हा ईमान राखणारे जन्नतमध्ये आणि काफिर (इन्कारी) व अनेक ईश्वरांची पूजा करणारे जहन्नममध्ये दाखल होतील. आयतीत त्यानंतरची गोष्ट सांगितली गेली आहे की फरिश्ते अल्लाहच्या अर्श (सिंहासना) भोवती घेरा करून अल्लाहची स्तुती - प्रशंसा व त्याच्या पवित्रतेचे गुणगान करण्यात मग्न असतील.
Contents of the translations can be downloaded and re-published, with the following terms and conditions:
1. No modification, addition, or deletion of the content.
2. Clearly referring to the publisher and the source (QuranEnc.com).
3. Mentioning the version number when re-publishing the translation.
4. Keeping the transcript information inside the document.
5. Notifying the source (QuranEnc.com) of any note on the translation.
6. Updating the translation according to the latest version issued from the source (QuranEnc.com).
7. Inappropriate advertisements must not be included when displaying translations of the meanings of the Noble Quran.
Search results:
API specs
Endpoints:
Sura translation
GET / https://quranenc.com/api/v1/translation/sura/{translation_key}/{sura_number} description: get the specified translation (by its translation_key) for the speicified sura (by its number)
Parameters: translation_key: (the key of the currently selected translation) sura_number: [1-114] (Sura number in the mosshaf which should be between 1 and 114)
Returns:
json object containing array of objects, each object contains the "sura", "aya", "translation" and "footnotes".
GET / https://quranenc.com/api/v1/translation/aya/{translation_key}/{sura_number}/{aya_number} description: get the specified translation (by its translation_key) for the speicified aya (by its number sura_number and aya_number)
Parameters: translation_key: (the key of the currently selected translation) sura_number: [1-114] (Sura number in the mosshaf which should be between 1 and 114) aya_number: [1-...] (Aya number in the sura)
Returns:
json object containing the "sura", "aya", "translation" and "footnotes".