ترجمهٔ معانی قرآن کریم - ترجمه ى مراتى * - لیست ترجمه ها


ترجمهٔ معانی آیه: (17) سوره: سوره قمر
وَلَقَدْ یَسَّرْنَا الْقُرْاٰنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِنْ مُّدَّكِرٍ ۟
१७. आणि निःसंशय, आम्ही कुरआनाला समजण्याकरिता सोपे केले आहे१ तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?
(१) अर्थात त्याचा अर्थ व आशय समजणे त्यापासून बोध प्राप्त करणे आणि त्यास मुखोद्‌गत (तोंडी पाठ) करणे आम्ही सहज सुलभ केले आहे. वस्तुस्थिती अशी की पवित्र कुरआन आपल्या चमत्कार (मोजिजे) प्रभाव आणि भाषाशैलीच्या आधारे सर्वांत उच्चप्रतीचा ग्रंथ असतानाही एखादा मनुष्य थोडेसेही लक्ष देईल तर अरबी व्याकरण आणि भाषाशैलीच्या ग्रंथआंचे अध्ययन केल्याविनाही त्यास सहजपणे समजून घेईल. तद्‌वतच जगातील हा एकमेव असा ग्रंथ आहे, ज्याचा एकेक शब्द तोंडी पाठ केला जातो अन्यथा लहानसहान पुस्तकही अशा प्रकारे कंठस्थ करणे व ते स्मरणात राखणे मोठे कठीण आहे. जर मनुष्य आपल्या मन-मस्तष्काचे दरवाजे उघडून, त्याचे बोधप्राप्तीच्या नेत्रांनी पठण करील, बोधप्राप्तीसाठी ऐकेल आणि समजून घेणाऱ्या हृदयाने त्यावर विचार चिंतन करील तर लोक परलोक (हे जग आणि आखिरत) च्या सद्‌भाग्याचे दरवाजे त्याच्यावर उघडतील आणि हा ग्रंथ त्याच्या मनात खूप खोलवर जाऊन कुप्र आणि दुष्कर्मांची सर्व घाण दूर करतो.
تفسیرهای عربی:
 
ترجمهٔ معانی آیه: (17) سوره: سوره قمر
فهرست سوره ها شماره صفحه
 
ترجمهٔ معانی قرآن کریم - ترجمه ى مراتى - لیست ترجمه ها

ترجمه ى معانى قرآن كريم به زبان مراتى. مترجم: محمد شفيع انصارى. ناشر: مؤسسه ى البر - بمبئی.

بستن