Check out the new design

ترجمهٔ معانی قرآن کریم - ترجمه‌ى مراتى - محمد شفيع انصارى * - لیست ترجمه ها


ترجمهٔ معانی سوره: حشر   آیه:
ذٰلِكَ بِاَنَّهُمْ شَآقُّوا اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ ۚ— وَمَنْ یُّشَآقِّ اللّٰهَ فَاِنَّ اللّٰهَ شَدِیْدُ الْعِقَابِ ۟
४. हे अशासाठी की त्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोध केला, आणि जो देखील अल्लाहचा विरोध करील तर अल्लाह देखील मोठी कठोर शिक्षा यातना देणारा आहे.
تفسیرهای عربی:
مَا قَطَعْتُمْ مِّنْ لِّیْنَةٍ اَوْ تَرَكْتُمُوْهَا قَآىِٕمَةً عَلٰۤی اُصُوْلِهَا فَبِاِذْنِ اللّٰهِ وَلِیُخْزِیَ الْفٰسِقِیْنَ ۟
५. खजुरींची जी झाडे तुम्ही कापून टाकलीत आणि ज्यांना तुम्ही त्यांच्या मुळासकट बाकी राहू दिले तर हे सर्व अल्लाहच्या आदेशाने झाले, आणि यासाठीही की दुराचारी लोकांना अल्लाहने अपमानित करावे.
تفسیرهای عربی:
وَمَاۤ اَفَآءَ اللّٰهُ عَلٰی رَسُوْلِهٖ مِنْهُمْ فَمَاۤ اَوْجَفْتُمْ عَلَیْهِ مِنْ خَیْلٍ وَّلَا رِكَابٍ وَّلٰكِنَّ اللّٰهَ یُسَلِّطُ رُسُلَهٗ عَلٰی مَنْ یَّشَآءُ ؕ— وَاللّٰهُ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟
६. आणि त्यांची जी संपत्ती अल्लाहने आपल्या पैगंबराच्या हाती दिली ज्यासाठी तुम्ही ना घोडे दौडविले आहेत ना ऊंट, किंबहुना अल्लाह आपल्या पैगंबराला, ज्याच्यावर इच्छितो वर्चस्वशाली करतो आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे.
تفسیرهای عربی:
مَاۤ اَفَآءَ اللّٰهُ عَلٰی رَسُوْلِهٖ مِنْ اَهْلِ الْقُرٰی فَلِلّٰهِ وَلِلرَّسُوْلِ وَلِذِی الْقُرْبٰی وَالْیَتٰمٰی وَالْمَسٰكِیْنِ وَابْنِ السَّبِیْلِ ۙ— كَیْ لَا یَكُوْنَ دُوْلَةً بَیْنَ الْاَغْنِیَآءِ مِنْكُمْ ؕ— وَمَاۤ اٰتٰىكُمُ الرَّسُوْلُ فَخُذُوْهُ ۚ— وَمَا نَهٰىكُمْ عَنْهُ فَانْتَهُوْا ۚ— وَاتَّقُوا اللّٰهَ ؕ— اِنَّ اللّٰهَ شَدِیْدُ الْعِقَابِ ۟ۘ
७. वस्त्यावाल्यांचे जे धन अल्लाहने तुमच्या लढण्याविनाच आपल्या पैगंबराच्या हाती दिले, ते अल्लाहचे आहे आणि पैगंबराचे आहे, जवळच्या नातेवाईकांचे, अनाथांचे, गोरगरीबांचे व प्रवाशांचे आहे यासाठी की तुमच्यातल्या धनवानांच्याच हातात हे धन फिरत राहू नये आणि तुम्हाला पैगंबर जे काही देईल ते घ्या आणि ज्यापासून रोखेल त्यापासून अलिप्त राहा आणि अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय, अल्लाह मोठी सक्त शिक्षा यातना देणारा आहे.
تفسیرهای عربی:
لِلْفُقَرَآءِ الْمُهٰجِرِیْنَ الَّذِیْنَ اُخْرِجُوْا مِنْ دِیَارِهِمْ وَاَمْوَالِهِمْ یَبْتَغُوْنَ فَضْلًا مِّنَ اللّٰهِ وَرِضْوَانًا وَّیَنْصُرُوْنَ اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ ؕ— اُولٰٓىِٕكَ هُمُ الصّٰدِقُوْنَ ۟ۚ
८. हे धन त्या गरीब मुहाजिर लोकां (देशत्याग केलेल्या ईमानधारकां) करिता आहे, ज्यांना आपल्या घरातून आणि आपल्या संपत्तीतून बाहेर काढले गेले आहे. ते अल्लाहची दया कृपा व प्रसन्नता इच्छितात आणि अल्लाहची आणि त्याच्या पैगंबराची मदत करतात. हेच लोक सच्चे आहेत.
تفسیرهای عربی:
وَالَّذِیْنَ تَبَوَّءُو الدَّارَ وَالْاِیْمَانَ مِنْ قَبْلِهِمْ یُحِبُّوْنَ مَنْ هَاجَرَ اِلَیْهِمْ وَلَا یَجِدُوْنَ فِیْ صُدُوْرِهِمْ حَاجَةً مِّمَّاۤ اُوْتُوْا وَیُؤْثِرُوْنَ عَلٰۤی اَنْفُسِهِمْ وَلَوْ كَانَ بِهِمْ خَصَاصَةٌ ۫ؕ— وَمَنْ یُّوْقَ شُحَّ نَفْسِهٖ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْمُفْلِحُوْنَ ۟ۚ
९. आणि (त्यांच्याकरिता) ज्यांनी या घरात (अर्थात मदीनेत) आणि ईमान राखण्यात त्यांच्यापूर्वी स्थान बनवून घेतले आणि आपल्याकडे हिजरत (देशत्याग) करून येणाऱ्यांशी प्रेम राखतात आणि देशत्याग केलेल्यां (मुहाजिर लोकां) ना जे काही दिले जाते, त्याबद्दल ते आपल्या छातीत (मनात) कसलाही संकोच करीत नाहीत, उलट स्वतः आपल्यावर त्यांना प्राधान्य देतात, मग ते स्वतः कितीही गरजवंत असोत (खरी गोष्ट अशी की) जो कोणी आपल्या मनाच्या इच्छा अभिलाषांपासून वाचविला गेला, तोच सफलता प्राप्त करणारा आहे.१
تفسیرهای عربی:
 
ترجمهٔ معانی سوره: حشر
فهرست سوره ها شماره صفحه
 
ترجمهٔ معانی قرآن کریم - ترجمه‌ى مراتى - محمد شفيع انصارى - لیست ترجمه ها

مترجم: محمد شفیع انصاری.

بستن