Check out the new design

કુરઆન મજીદના શબ્દોનું ભાષાંતર - મરાઠી ભાષામાં અનુવાદ - મુહમ્મદ શફીઅ અન્સારી * - ભાષાંતરોની અનુક્રમણિકા


શબ્દોનું ભાષાંતર સૂરહ: અર્ રહમાન   આયત:
مَرَجَ الْبَحْرَیْنِ یَلْتَقِیٰنِ ۟ۙ
१९. त्याने दोन समुद्र प्रवाहित केले जे एकमेकास मिळतात.
અરબી તફસીરો:
بَیْنَهُمَا بَرْزَخٌ لَّا یَبْغِیٰنِ ۟ۚ
२०. त्या दोघांच्या दरम्यान एक आड (पडदा) आहे की त्यापुढे जाऊ शकत नाहीत.
અરબી તફસીરો:
فَبِاَیِّ اٰلَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبٰنِ ۟
२१. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
અરબી તફસીરો:
یَخْرُجُ مِنْهُمَا اللُّؤْلُؤُ وَالْمَرْجَانُ ۟ۚ
२२. त्या दोघांमधून मोती आणि प्रवाळ निघतात.
અરબી તફસીરો:
فَبِاَیِّ اٰلَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبٰنِ ۟
२३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
અરબી તફસીરો:
وَلَهُ الْجَوَارِ الْمُنْشَاٰتُ فِی الْبَحْرِ كَالْاَعْلَامِ ۟ۚ
२४. आणि अल्लाहच्याच (अधिकारकक्षेत) आहेत ती जहाजे, जी समुद्रात पर्वतांसारखी उंच (उभी) चालत आहेत.
અરબી તફસીરો:
فَبِاَیِّ اٰلَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبٰنِ ۟۠
२५. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
અરબી તફસીરો:
كُلُّ مَنْ عَلَیْهَا فَانٍ ۟ۚۖ
२६. जमिनीवर जे काही आहे ते सर्व नाश पावणारे आहे.
અરબી તફસીરો:
وَّیَبْقٰی وَجْهُ رَبِّكَ ذُو الْجَلٰلِ وَالْاِكْرَامِ ۟ۚ
२७. केवळ तुमच्या पालनकर्त्याचे मुख (अस्तित्व), जो मोठा महान आणि प्रतिष्ठा बाळगणारा आहे, बाकी राहील.
અરબી તફસીરો:
فَبِاَیِّ اٰلَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبٰنِ ۟
२८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
અરબી તફસીરો:
یَسْـَٔلُهٗ مَنْ فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— كُلَّ یَوْمٍ هُوَ فِیْ شَاْنٍ ۟ۚ
२९. आकाशांमध्ये व जमिनीवर जे जे आहेत सर्व त्याच्याचकडे याचना करतात, प्रत्येक दिवस तो एका कार्यात आहे.१
(१) प्रत्येक दिवसाशी अभिप्रेत क्षण. मूळ शब्द ‘शान’ याचा अर्थ काम आणि विषय अर्थात प्रत्येक क्षणी तो काही ना काही करत असतो. कोणाला रोगी बनवितो तर कोणाला स्वस्थ, कोणाला श्रीमंत बनवितो तर कोणा श्रीमंताला गरीब, कोणाला रंक (भिकारी) चा राजा तर कोणा राजाला रंक, कोणाला उच्च पदावर बसवितो तर कोणाला खालच्या पदावर आणतो, कोणाला शून्यातून निर्माण करतो तरक कोणाला अस्तित्वहीन करतो वगैरे. थोडक्यात सांगायचे तर विश्वात नित्य घडून येणारे सर्व स्थित्यंतर आणि परिवर्तन त्याच्या मर्जीने व आदेशाने होत आहे आणि रात्र व दिवसाचा असा एकही क्षण नाही जो त्याच्या या शान (वैभवा) विरहित असावा.
અરબી તફસીરો:
فَبِاَیِّ اٰلَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبٰنِ ۟
३०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
અરબી તફસીરો:
سَنَفْرُغُ لَكُمْ اَیُّهَ الثَّقَلٰنِ ۟ۚ
३१. (हे जिन्न आणि मानवांच्या समूहांनो!) लवकरच आम्ही तुमच्याकडे पूर्णतः लक्ष केंद्रित करू.
અરબી તફસીરો:
فَبِاَیِّ اٰلَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبٰنِ ۟
३२. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
અરબી તફસીરો:
یٰمَعْشَرَ الْجِنِّ وَالْاِنْسِ اِنِ اسْتَطَعْتُمْ اَنْ تَنْفُذُوْا مِنْ اَقْطَارِ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ فَانْفُذُوْا ؕ— لَا تَنْفُذُوْنَ اِلَّا بِسُلْطٰنٍ ۟ۚ
३३. (हे जिन्न आणि मनावांच्या समूहांनो!) जर तुमच्यात आकाशांच्या आणि धरतीच्या किनाऱ्या (सीमा) बाहेर निघण्याचे सामर्थ्य आहे, तर निघून जा (तथापि) वर्चस्व आणि सामर्थ्याविना तुम्ही निघू शकत नाही.
અરબી તફસીરો:
فَبِاَیِّ اٰلَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبٰنِ ۟
३४. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
અરબી તફસીરો:
یُرْسَلُ عَلَیْكُمَا شُوَاظٌ مِّنْ نَّارٍ ۙ۬— وَّنُحَاسٌ فَلَا تَنْتَصِرٰنِ ۟ۚ
३५. तुमच्यावर आगीचे निखारे आणि धूर सोडला जाईल, मग तुम्ही सामना करू शकणार नाहीत.
અરબી તફસીરો:
فَبِاَیِّ اٰلَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبٰنِ ۟
३६. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
અરબી તફસીરો:
فَاِذَا انْشَقَّتِ السَّمَآءُ فَكَانَتْ وَرْدَةً كَالدِّهَانِ ۟ۚ
३७. मग जेव्हा आकाश विदीर्ण होऊन लाल होईल, जणू लाल चामडे असावे.
અરબી તફસીરો:
فَبِاَیِّ اٰلَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبٰنِ ۟
३८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
અરબી તફસીરો:
فَیَوْمَىِٕذٍ لَّا یُسْـَٔلُ عَنْ ذَنْۢبِهٖۤ اِنْسٌ وَّلَا جَآنٌّ ۟ۚ
३९. त्या दिवशी कोणत्याही मानवाला आणि कोणत्याही जिन्नाला त्याच्या अपराधांविषयी विचारणा केली जाणार नाही.
અરબી તફસીરો:
فَبِاَیِّ اٰلَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبٰنِ ۟
४०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
અરબી તફસીરો:
یُعْرَفُ الْمُجْرِمُوْنَ بِسِیْمٰهُمْ فَیُؤْخَذُ بِالنَّوَاصِیْ وَالْاَقْدَامِ ۟ۚ
४१. अपराधी लोक केवळ आपल्या चेहऱ्या-मोहऱ्यावरूनच ओळखले जातील आणि त्यांच्या कपाळाचे केस व पाय धरले जातील.
અરબી તફસીરો:
 
શબ્દોનું ભાષાંતર સૂરહ: અર્ રહમાન
સૂરહ માટે અનુક્રમણિકા પેજ નંબર
 
કુરઆન મજીદના શબ્દોનું ભાષાંતર - મરાઠી ભાષામાં અનુવાદ - મુહમ્મદ શફીઅ અન્સારી - ભાષાંતરોની અનુક્રમણિકા

તેનું અનુવાદ મુહમ્મદ શફીઅ અન્સારી દ્વારા કરવામાં આવ્યું.

બંધ કરો