કુરઆન મજીદના શબ્દોનું ભાષાંતર - મરાઠી ભાષાતર * - ભાષાંતરોની અનુક્રમણિકા


શબ્દોનું ભાષાંતર આયત: (18) સૂરહ: અલ્ હશ્ર
یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوا اتَّقُوا اللّٰهَ وَلْتَنْظُرْ نَفْسٌ مَّا قَدَّمَتْ لِغَدٍ ۚ— وَاتَّقُوا اللّٰهَ ؕ— اِنَّ اللّٰهَ خَبِیْرٌ بِمَا تَعْمَلُوْنَ ۟
१८. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे भय बाळगत राहा१ आणि प्रत्येक माणसाने हे बघावे की उद्या (कयामतकरिता) त्याने कर्मांचे कोणते (भांडार) पाठविले आहे,२ आणि (प्रत्येक क्षणी) अल्लाहचे भय राखा, अल्लाह तुमच्या समस्त कर्मांशी परिचित आहे.
(१) ईमान राखणाऱ्यांना संबोधित करून त्यांना उपदेश केला जात आहे. अल्लाहशी भय राखण्याचा अर्थ, त्याने ज्या ज्या गोष्टींचा आदेश दिला आहे त्या अमलात आणाव्या आणि ज्या गोष्टींची मनाई केली आहे, त्यापासून अलिप्त राहावे. या आयतीत ही गोष्ट जोर देण्यासाठी दोन वेळा फर्माविली गेली आहे. कारण हा तकवा (अल्लाहचे भय) च माणसाला सत्कर्म करण्यास व दुष्कर्माचा अव्हेर करण्यास प्रवृत्त करतो. (२) ‘उद्या’शी अभिप्रेत कयामत आहे. अर्थात विश्वाचा अंत. त्याला उद्या या अर्थाने सांगून या गोष्टीकडेही इशारा केला आहे की कयामतचे घडून येणे खूप लांब नाही, किंबहुना निकटचे आहे.
અરબી તફસીરો:
 
શબ્દોનું ભાષાંતર આયત: (18) સૂરહ: અલ્ હશ્ર
સૂરહ માટે અનુક્રમણિકા પેજ નંબર
 
કુરઆન મજીદના શબ્દોનું ભાષાંતર - મરાઠી ભાષાતર - ભાષાંતરોની અનુક્રમણિકા

મરાઠી ભાષામાં કુરઆન મજીદનું ભાષાતર, તેનું ભાષાતર કરનાર મુહમ્મદ શફીઅ અન્સારીએ કર્યું, અલ્ બિર ઇન્સ્ટિટયૂટ મુંબઈ દ્વારા પ્રકાશિત કરવામાં આવ્યું.

બંધ કરો