१. पवित्र आहे तो (अल्लाह), जो आपल्या दासाला एका रात्रीतून आदरणीय मस्जिदीपासून, अक्सा मस्जिदपर्यंत घेऊन गेला, जिच्या भोवती आम्ही बरकती प्रदान करून ठेवल्या आहेत. यासाठी की आम्ही त्याला आपल्या सामर्थ्याच्या काही मोठ्या निशाण्या दाखवून द्याव्यात. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाहच चांगल्या प्रकारे ऐकणारा, पाहणारा आहे.
२. आणि आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला आणि त्याला इस्राईलच्या संततीकरिता मार्गदर्शक बनविले की तुम्ही माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही काम बनविणारा बनवू नका.
४. आणि आम्ही इस्राईलच्या संततीकरिता त्यांच्या ग्रंथात स्पष्टतः निर्णय दिला होता की तुम्ही धरतीवर दोन वेळा उपद्रव निर्माण कराल, आणि तुम्ही फार जास्त अत्याचार कराल.
५. या दोन्ही वायद्यांपैकी पहिल्या वायद्याची वेळ येताच आम्ही तुमच्यासमोर आपल्या त्या दासांना उठवून उभे केले जे मोठे लढवय्ये होते, मग ते तुमच्या घरांमध्ये अगदी आतापर्यंत पसरले आणि अल्लाहचा वायदा पूर्ण होणारच होता.
७. जर तुम्ही सत्कर्म कराल तर स्वतः आपल्या फायद्याकरिता कराल आणि जर तुम्ही वाईट कर्मे कराल तर ते देखील स्वतःसाठीच. मग जेव्हा दुसऱ्या वायद्याची वेळ आली, तेव्हा (आम्ही दुसऱ्या दासांना पाठविले) यासाठी की त्यांनी तुमचा चेहरा बिघडवून टाकावा आणि पहिल्या खेपेप्रमाणे पुन्हा त्याच मस्जिदीत घुसावे आणि जी काही वस्तू ताब्यात येईल, तोडफोड करून मुळासकट उपटून टाकावी.
८. आशा आहे की तुमचा पालनकर्ता तुमच्यावर दया करील. परंतु जर तुम्ही पुन्हा तेच करू लागाल तर आम्ही देखील पुन्हा तसेच करू, आणि आम्ही इन्कार करणाऱ्यांसाठी जहन्नमला कैदखाना बनवून ठेवले आहे.
९. निःसंशय, हा कुरआन तो मार्ग दाखवितो, जो सर्वांत सरळ आहे, आणि सत्कर्म करणाऱ्या ईमानधारकांना ही खूशखबर देतो की त्यांच्यासाठी अतिशय चांगला मोबदला (प्रतिफळ) आहे.
१२. आणि आम्ही रात्र आणि दिवसाला (आपल्या सामर्थ्याची) निशाणी बनविले आहे. रात्रीच्या निशाणीला आम्ही प्रकाशहीन (निस्तेज) केले आणि दिवसाच्या निशाणीला प्रकाशमान दाखविणारी बनविले आहे. यासाठी की तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेचा शोध घेऊ शकावे. आणि यासाठीही की वर्षाची गणना आणि हिशोब जाणू शकावे. आणि प्रत्येक विषयाचे आम्ही सविस्तर निवेदन केले आहे.
१३. आणि आम्ही माणसाचे चांगले-वाईट त्याच्या गळ्यात टाकले आहे, आणि कयामतच्या दिवशी आम्ही त्याचा कर्म-लेख बाहेर काढू, जो त्याला आपल्यावर खुला असलेला आढळेल.
१५. जो मनुष्य मार्गदर्शन प्राप्त करतो, तो स्वतः आपल्या भल्यासाठी मार्गदर्शन प्राप्त करतो आणि जो मार्गभ्रष्ट होईल तर त्याचे ओझे त्याच्यावरच आहे. कोणीही ओझे बाळगणारा दुसऱ्या कुणाचे ओझे आपल्यावर लादून घेणार नाही आणि आमचा हा नियम नाही की पैगंबर पाठविण्यापूर्वीच अज़ाब (शिक्षा-यातना) पाठवावा.
१६. आणि जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीचा सर्वनाश करण्याचा इरादा करून घेतो तेव्हा तिथल्या सुखवस्तू (सुसंपन्न) लोकांना काही आदेश देतो आणि ते त्या वस्तीत उघडपणे अवज्ञा करू लागतात, तेव्हा त्यांच्यावर (शिक्षा-यातनेचा) फैसला लागू होतो आणि मग आम्ही त्या वस्तीची उलथापालथ करून टाकतो.
१७. आणि आम्ही नूहनंतरही अनेक समुदाय नष्ट करून टाकले आणि तुमचा पालनकर्ता आपल्या दासांच्या अपराधांना चांगल्या प्रकारे जाणून आहे आणि चांगल्या प्रकारे पाहणारा आहे.
१८. ज्याची इच्छा फक्त या शीघ्रतापूर्ण जगापुरतीच असेल तर त्याला आम्ही इथे, जेवढे देऊ इच्छितो लवकर प्रदान करतो. शेवटी मात्र त्याच्यासाठी आम्ही जहन्नम निश्चित करतो, जिथे तो मोठ्या वाईट अवस्थेत, धिःक्कारला गेलेला दाखल होईल.
१९. आणि जो आखिरतची इच्छा बाळगेल, आणि त्यासाठी जसा प्रयत्न करायला हवा, तसा तो करतही असेल आणि तो ईमान राखणाराही असेल तर मग हेच ते लोक होत, ज्याच्या प्रयत्नाला अल्लाहच्या ठायी पुरेपूर सन्मान दिला जाईल.
२१. पाहा, त्यांच्यात एकाला एकावर कशा प्रकारे श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) तर दर्जाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे आणि श्रेष्ठतेच्या दृष्टीनेही फारच उत्तम आहे.
२३. आणि तुमच्या पालनकर्त्याने उघड आदेश दिलेला आहे की तुम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचीही उपासना करू नका आणि माता-पित्याशी सद्व्यवहार करा, जर तुमच्या उपस्थितीत (हयातीत) यांच्यापैकी एक किंवा हे दोघे वृद्धावस्थेस पोहोचतील तर त्यांना ‘अरे’ सुद्धा बोलू नका, त्यांना दाटवू नका, उलट त्यांच्याशी आदर-सन्मानाने बोलत जा.
२४. आणि नरमी व प्रेमासह त्यांच्यासमोर विनम्रतापूर्वक हात पसरवून ठेवा१ आणि दुआ-प्रार्थना करीत राहा, हे माझ्या पालनकर्त्या! यांच्यावर अशीच दया कर जशी यांनी माझ्या बालपणात माझे पालनपोषण करण्यात केली आहे.
(१) पक्षिणी जेव्हा आपल्या पिलांना आपल्या प्रेम-छत्रात घेते, तेव्हा त्यांच्यासाठी आपले पंख खाली सोडते, तद्वतच तू देखील आपल्या माता-पित्याशी अशाच प्रकारे चांगला व प्रेमपूर्ण व्यवहार कर आणि त्यांचा अशा प्रकारे सांभाळ कर, ज्या प्रकारे त्यांनी बालपणी तुझा सांभाळ केला.
२८. आणि आपल्या पालनकर्त्याच्या त्या दया-कृपेचा शोध घेण्यात, जिची तू आशा बाळगतो, जर तुला त्यांच्यापासून तोंड फिरवावे लागेल तर अशाही स्थितीत तू त्यांना चांगल्या प्रकारे आणि नरमीने समजाविले पाहिजे.
३०. निःसंशय, तुमचा पालनकर्ता, ज्याला इच्छितो रोजी (आजिविका) विस्तृत करतो आणि ज्याच्यासाठी इच्छितो संकुचित (तंग) करतो. निःसंशय, तो आपल्या दासांची पुरेपूर खबर राखतो आणि खूप चांगल्या प्रकारे पाहणारा आहे.
३१. आणि दारिद्य्राच्या भयाने आपल्या संततीला मारून टाकू नका. त्यांना आणि तुम्हाला आम्हीच रोजी (आजिविका) प्रदान करतो. निःसंशय, त्यांची हत्या करणे फार मोठा अपराध आहे.
३३. आणि एखाद्या जीवाला, ज्याला मारणे अल्लाहने हराम केले आहे, कधीही अवैधरित्या मारू नका (त्याची हत्या करू नका) आणि जो मनुष्य निरपराध अवस्थेत ठार मारला जाईल तर आम्ही त्याच्या वारसाला हक्क देऊन ठेवला आहे. परंतु त्याने (प्रतिशोध म्हणून) ठार मारण्यात घाई करू नये. निःसंशय त्याची मदत केली गेली आहे.
३४. आणि अनाथाच्या धन-संपत्तीच्या जवळही जाऊ नका, त्या पद्धतीशिवाय, जी अधिक चांगली असे, येथपर्यंत की ते आपल्या सज्ञान होण्याच्या वयास पोहचावेत आणि वायदा पूर्ण करीत जा कारण की वायद्याविषयी विचारणा होईल.
३९. हे देखील त्या वहयी (प्रकाशना) पैकी आहे, जिला तुमच्या पालनकर्त्याने तुमच्याकडे हिकमतीने उतरविले आहे, यास्तव अल्लाहसोबत दुसऱ्या कोणत्याही उपास्य बनवू नका अन्यथा धिःक्कार करून आणि अपमानित करून जहन्नममध्ये टाकले जाल.
४४. सप्त आकाश आणि धरती, आणि जे काही त्यांच्यात आहे, सर्व त्याचेच स्तुति-गान करतात. अशी एकही वस्तू नाही, जी पवित्रता आणि महानतेसह त्याचे स्मरण करीत नसेल. मात्र हे खरे आहे की तुम्ही तिचे महिमागान समजू शकत नाही. निःसंशय अल्लाह मोठा सहनशील आणि माफ करणारा आहे.
४६. आणि त्यांच्या हृदयांवर पडदे टाकले आहेत की त्यांनी त्याला समजावे आणि त्यांच्या कानात बधीरता आणि जेव्हा तुम्ही केवळ अल्लाहचेच वर्णन त्याच्या एकमेवतेसह या कुरआनात करता तेव्हा ते तोंड फिरवून पळ काढतात.
४७. ज्या हेतुने ते कुरआन ऐकतात, त्यांचे इरादे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. जेव्हा हे तुमच्याकडे कान लावून असतात. तेव्हा देखील, आणि जेव्हा हे सल्लामसलत करतात तेव्हाही वास्तविक हे अत्याचारी लोक म्हणतात की तुम्ही अशा व्यक्तीचे अनुसरण करण्यात मग्न आहात, ज्याच्यावर जादूटोणा केला गेला आहे.
५१. किंवा एखादी अशी वस्तू, जी तुमच्या मनात अतिशय महान वाटत असेल. मग त्यांनी विचारावे की असा कोण आहे, जो दुसऱ्यांदा आमचे जीवन परत करेल? तुम्ही उत्तर द्या की तोच (अल्लाह) ज्याने तुम्हाला पहिल्या खेपेस निर्माण केले. यावर ते आपले डोके हलवून तुम्हाला विचारतील की, बरे हे केव्हा घडून येईल? तर तुम्ही उत्तर द्या की नवल नव्हे की ते लवकरच घडून येईल.
५४. तुमचा पालनकर्ता तुमची अवस्था तुमच्यापेक्षा अधिक जाणणारा आहे. तो जर इच्छिल तर तुमच्यावर दया करेल, इच्छिल तर तुम्हाला शिक्षा देईल. आम्ही तुम्हाला त्यांच्यावर देखरेख ठेवणारा बनवून पाठविले नाही.
५५. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे, ते सर्व तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो, आम्ही काही पैगंबरांना काहींवर श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि दाऊदला जबूर आम्हीच प्रदान केले.
५६. तुम्ही सांगा, (अल्लाह) शिवाय ज्यांना तुम्ही (उपास्य) समजत आहात, त्यांना दुआ-प्रार्थना करा, परंतु ते ना तुमचे एखादे दुःख दूर करू शकतात आणि ना बदलू शकतात.१
(१) या आयतीत ‘मिन्दूनीही’शी अभिप्रेत फरिश्ते आणि बुजूर्गांची चित्रे आणि मूर्त्या होत ज्यांची ते पूजा करीत असत किंवा हजरत उजैर आणि ईसा मसिह होत, ज्यांना यहूदी आणि ख्रिश्चन अल्लाहचा पुत्र म्हणत, त्यांना ईशगुणसंपन्न मानत अथवा ते जिन्न होत, ज्यांनी ईमान राखले होते आणि मूर्तिपूजक त्यांची पूजा करीत. अतः या आयतीत सांगितले जात आहे की ते स्वतःही अल्लाहचे सामिप्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत व त्याच्या दया-कृपेची आस बाळगत व त्याच्या शिक्षेचे भय राखत अर्थात हा गुणधर्म निर्जीव (पाषाणां) मध्ये असू शकत नाही. तेव्हा हे स्पष्ट होते की, ‘अल्लाहशिवाय ज्यांची उपासना केली जात राहिली’ त्या केवळ पाषाणाच्या मूर्त्याच नव्हत्या, तर अल्लाहचे दासही होते, ज्यात काही फरिश्ते, काही औलिया, काही पैगंबर व काही जिन्न होते. अल्लाहने या सर्वांविषयी फर्माविले की ते काहीच करू शकत नाहीत. ते ना एखाद्याचे दुःख दूर करू शकतात, ना कोणाच्या अवस्थेत बदल घडवू शकतात.
५७. ज्यांना हे लोक दुआ प्रार्थना करतात, ते स्वतः आपल्या पालनकर्त्याची निकटता शोधत असतात की त्यांच्यापैकी कोण अधिक निकट होईल, ते तर स्वतः त्याच्या दया-कृपेची आशा बाळगतात आणि त्याच्या शिक्षा-यातनेपासून भयभीत राहतात. निःसंशय तुमच्या पालनकर्त्याचा अज़ाब (शिक्षा-यातना) भय राखण्याची गोष्ट आहे.
५८. आणि जेवढ्या देखील वस्त्या आहेत, आम्ही त्यांना कयामतचा दिवस येण्यापूर्वी एकतर उद्ध्वस्त करून टाकू किंवा अतिशय सक्त शिक्षा देऊ. हे तर ग्रंथात लिहिले गेले आहे.
५९. आणि आम्हाला निशाण्या (चमत्कार) उतरविण्यापासून अडसर केवळ याच गोष्टीचा आहे की पूर्वीच्या लोकांनी या निशाण्यांना खोटे ठरविले आहे. आम्ही समूदला चमत्काराच्या स्वरूपात सांडणी दिली परंतु त्यांनी तिच्यावर अत्याचार केला आम्ही तर लोकांना केवळ धाक दाखविण्याकरिता निशाण्या पाठवितो.
६०. आणि स्मरण करा, जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितले की तुमच्या पालनकर्त्याने लोकांना घेरले आहे. आम्ही जे तुम्हाला दाखविले होते, ती लोकांकरिता स्पष्ट परीक्षाच होती आणि त्याचप्रमाणे ते झाड देखील ज्याविषयी कुरआनात तिरस्कार व्यक्त केला गेला आहे. आम्ही त्यांना सचेत करीत आहोत, परंतु अशाने त्यांचे वैर आणखी जास्त वाढत जात आहे.
६१. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला. तो म्हणाला, काय मी त्याला सजदा करू, ज्याला तू मातीपासून बनविले आहे.
६२. ठीक आहे, पण पाहा तू त्याला माझ्यावर श्रेष्ठता तर प्रदान केली आहे, परंतु जर तू मला कयामतपर्यंत संधी देशील तर मी याच्या संततीला, फार कमी लोकांशिवाय आपल्या काबूत करेन.
६४. त्यांच्यापैकी तू ज्याला देखील आपल्या बोलण्याने बहकवू शकशील बहकव आणि त्यांच्यावर आपले स्वार आणि प्यादे चढवून आण, आणि त्यांच्या धन आणि संततीमधून आपलाही हिस्सा लाव, आणि त्यांना (खोटे) वचन दे. त्यांच्याशी जेवढी देखील वचने (वायदे) सैतानाचे असतात, सर्वच्या सर्व पूर्ण दगाबाजी आहे.
६७. आणि समुद्रात संकट कोसळताच, ज्यांना तुम्ही दुआ-प्रार्थना करीत होते, ते सर्व विसरतात, केवळ तोच (अल्लाह) बाकी राहतो, मग जेव्हा तो तुम्हाला खुश्कीकडे सुरक्षित घेऊन येतो, तेव्हा तुम्ही तोंड फिरवून घेता. मनुष्य मोठा कृतघ्न आहे.
६८. तर काय तुम्ही या गोष्टीपासून निर्धास्त झालात की तुम्हाला खुश्कीच्या एखाद्या भूभागात (नेऊन जमिनीत) धसवून टाकावे किंवा तुमच्यावर दगडांचा वर्षाव करणारे भयंकर वादळ पाठवावे, मग स्वतःसाठी तुम्हाला कोणी मित्र व सहाय्यकर्ता आढळणार नाही.
६९. काय तुम्ही या गोष्टीपासून निर्भय झाला आहात की (अल्लाहने) दुसऱ्यांदा तुम्हाला नदीच्या प्रवासात आणावे आणि तुमच्यावर वेगवान वादळवारे पाठवावेत आणि तुमच्या इन्कारापायी तुम्हाला बुडवावे, मग तुम्हाला स्वतःकरिता, आमच्यावर त्याचा दावा (पाठलाग) करणारा कोणीही आढळणार नाही.
७०. आणि निःसंशय, आम्ही आदमच्या संततीला मोठी प्रतिष्ठा दिली आणि त्यांना खुश्की आणि पाण्यावर चालणारी वाहने दिली आणि त्यांना पाक साफ वस्तूंपासून आजिविका (अन्न-सामुग्री) प्रदान केली आणि आपल्या बहुतेक निर्मितीवर त्यांना श्रेष्ठता प्रदान केली.
७१. ज्या दिवशी आम्ही प्रत्येक उम्मत (समुदाया) ला त्याच्या पेशव्यांसह बोलावू, मग ज्यांना त्यांचा कर्मलेख उजव्या हातात दिला जाईल ते मोठ्या आनंदाने आपला कर्मलेख वाचू लागतील आणि धाग्याइतका (तीळमात्र) ही अत्याचार त्यांच्यावर केला जाणार नाही.
७३. आणि हे लोक तुम्हाला त्या वहयी (प्रकाशना) पासून, जी आम्ही तुमच्यावर अवतरित केली आहे, हटवू इच्छित होते की तुम्ही तिच्याखेरीज काही इतर गोष्टी आमच्या नावाने रचून घ्याव्यात, मग तर यांनी तुम्हाला आपला दोस्त बनविले असते.
७५. मग तर आम्हीही तुम्हाला या जगात दुहेरी सजा दिली असती. आणि दुहेरी मृत्युचीही, या स्थितीत तुम्हाला स्वतःसाठी आमच्या विरोधात कोणताही मदत करणारा आढळला नसता.
७६. आणि हे तर तुमचे पाय या भूमीतून डगमगविण्याच्या तयारीला लागलेच होते की तुम्हाला देशाबाहेर घालवावे, मग हे सुद्धा तुमच्यानंतर फार कमी काळ राहू शकले असते.
७८. सूर्यास्तापासून रात्रीचा अंधार होईपर्यंत नमाज कायम राखा आणि प्रातःकाळी (फज्रच्या वेळी) कुरआनचे पठणही, निःसंशय प्रातःकाळी कुरआन पठण करणे हजर केले गेले आहे.
७९. आणि रात्रीच्या काही भागात तहज्जूद (च्या नमाजमध्ये कुरआन) पढत जात. ही अधिकता तुमच्यासाठी आहे. लवकरच तुमचा पालनकर्ता तुम्हाला महमूद नावाच्या (प्रशंसापूर्ण) स्थानावर उभा करेल.
८०. आणि दुआ-प्रार्थना करीत राहा की हे माझ्या पालनकर्त्या! मला जिथेही न्यायचे असेल, चांगल्या प्रकारे ने आणि जिथूनही बाहेर काढायचे असेल चांगल्या प्रकारे काढआणि माझ्यासाठी आपल्या जवळून वर्चस्व आणि मदत निश्चित कर.
८२. आणि हा कुरआन जो आम्ही अवतरित करीत आहोत, ईमान राखणाऱ्यांसाठी रोगमुक्ती, स्वास्थ्य आणि दया-कृपा आहे, परंतु अत्याचारींसाठी नुकसानाशिवाय कसलीही वाढ होत नाही.
८३. आणि जेव्हा देखील माणसाला आम्ही आपली कृपा-देणगी प्रदान करतो, तेव्हा तो तोंड फिरवितो आणि कुशी बदलतो आणि जेव्हा देखील त्याला दुःख पोहोचते तेव्हा तो निराश होतो.
८५. आणि हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात. (तुम्ही त्यांना) उत्तर द्या की आत्मा माझ्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या हुकूमाने आहे. आणि तुम्हाला जे ज्ञान दिले गेले आहे ते फारच कमी आहे.१
(१) मूळ शब्द ‘रुह’ अर्थात आत्मा एक सूक्ष्म वस्तू आहे, जी कोणालाही दिसत नाही, तथापि प्रत्येक सजीवाचे शक्तीसामर्थ्य त्या आत्म्यातच सुप्त आहे याची हकीगत आणि वास्तविकता काय आहे? हे कोणीही जाणत नाही. यहूदी (ज्यू) लोकांनी एकदा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना याबाबत विचारले, तेव्हा ही आयत अवतरली. (सहीह बुखारी) आयतीचा अर्थ हाच की तुमचे ज्ञान, अल्लाहच्या ज्ञानापुढे काहीच नाही आणि ज्या आत्म्याविषयी तुम्ही विचारत आहात, त्याचे ज्ञान तर अल्लाहच्या पैगंबरांनाही दिले गेले नाही, फक्त एवढेच समजा की हा माझ्या पालनकर्त्याचा आदेश आहे, आणि माझ्या पालनकर्त्याच्या महानतेपैकी आहे, ज्याची खरी हकीगत, वस्तुस्थिती केवळ अल्लाहच जाणतो.
८६. आणि जर आम्ही इच्छिले तर जी वहयी (प्रकाशना) तुमच्याकडे आम्ही अवतरित केली आहे, सर्व परत घेऊ, मग तुम्हाला त्याच्यासाठी आमच्यासमोर कोणीही हिमायत करणारा लाभू शकणार नाही.
८८. सांगा की जर समस्त मानव आणि जिन्न मिळून या कुरआनासारखा (ग्रंथ) आणू इच्छितील तर त्या सर्वांच्याकडून याचे उदाहरण आणणे अशक्य आहे, मग ते आपसात एकमेकांचे सहाय्यक बनले तरीही.
९३. अथवा स्वतः तुमच्यासाठी एखादे सोन्याचे घर असावे किंवा तुम्ही आकाशात चढून जावे आणि आम्ही तर तुमच्या चढून जाण्याचाही तोपर्यंत विश्वास करणार नाही, जोपर्यंत तुम्ही आमच्यावर एखादा ग्रंथ अवतरित करत नाही, जो आम्ही स्वतः वाचून घ्यावा. तुम्ही उत्तर द्या की माझा पालनकर्ता मोठा पवित्र आहे. मी तर एक मानव आहे, जो रसूल (पैगंबर) बनवून पाठविला गेलो आहे.
९४. आणि लोकांजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचल्यानंतर ईमान राखण्यापासून रोखणारी केवळ हीच गोष्ट राहिली की ते म्हणाले, काय अल्लाहने एका माणसालाच रसूल (पैगंबर) बनवून पाठविले?
९५. (तुम्ही) सांगा, जर धरतीवर फरिश्ते चालत फिरत असते आणि इथे वास्तव्य करणारे राहिले असते तर मग आम्हीही त्यांच्याजवळ एखाद्या आस्मानी फरिश्त्यालाच रसूल बनवून पाठविले असते.
९७. आणि अल्लाह ज्याला मार्ग दाखविल, तो मार्गदर्शन लाभलेला आहे आणि ज्याला तो पथभ्रष्ट करील तर असंभव आहे की तुम्हाला त्याचा मित्र, त्याच्याखेरीज दुसरा कोणी आढळेल, अशा लोकांना आम्ही कयामतच्या दिवशी तोंडघशी पाडून अशा अवस्थेत जमा करू की ते आंधळे, मुके आणि बहिरे असतील. त्यांचे ठिकाण जहन्नम असेल, जेव्हा ती (आग) थोडी सुद्धा मंद पडू लागेल तर तिला आम्ही त्यांच्यासाठी आणखी भडकावून देऊ.
९८. हा सर्व आमच्या निशाण्यांचा इन्कार करण्याचा आणि हे सांगण्याचा परिणाम आहे की काय जेव्हा आम्ही राख आणि कण कण होऊन जाऊ, मग आम्हाला नव्याने निर्माण करून उठवून उभे केले जाईल?
९९. काय त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही की ज्या अल्लाहने आकाश आणि धरतीला निर्माण केले, तो त्यांच्यासारख्यांना निर्माण करण्याचे पूर्ण सामर्थ्य बाळगतो, त्यानेच त्यांच्यासाठी एक अशी वेळ निश्चित केली आहे, जिच्याबाबत काही शंका नाही, परंतु अत्याचारी लोक कृतघ्न बनल्याविना राहत नाही.
१००. त्यांना सांगा की (जर समजा) जर तुम्ही माझ्या पालनकर्त्याच्या दया कृपेच्या खजिन्याचे मालक बनले असते तर तुम्ही त्या वेळीही तो खर्च होईल या भीतीने त्यात कंजूसपणा केला असता आणि मनुष्य आहेच मोठा कोत्या मनाचा!
१०१. आणि आम्ही मूसाला नऊ मोजिजे (अल्लाहप्रदत्त चमत्कार) अगदी साफ साफ प्रदान केले, तू स्वतः इस्राईलच्या संततीला विचार, जेव्हा ते त्यांच्याजवळ तेव्हा पोहोचले फिरऔन म्हणाला, हे मूसा! माझ्या मते तुझ्यावर जादूटोणा केला गेला आहे.
१०२. (मूसाने) उत्तर दिले, हे मला माहीत झाले आहे की आकाशांच्या आणि धरतीच्या पालनकर्त्यानेच हे चमत्कार दाखविण्यासाठी व समजाविण्यासाठी अवतरित केले आहेत, हे फिरऔन! मला तर वाटते की तू नक्कीच नष्ट केला गेला आहे.
१०४. आणि त्यानंतर आम्ही इस्राईलच्या पुत्रांना फर्माविले की त्या भूमीवर वास्तव्य करा, मात्र जेव्हा आखिरतचा वायदा येईल तेव्हा आम्ही तुम्हा सर्वांना एकत्रित करून नेऊ.
१०५. आणि आम्ही या (कुरआना) ला सत्यासह अवतरित केले आणि हा देखील सत्यासह अवतरित झाला आणि आम्ही तुम्हाला केवळ खूशखबर देणारा आणि सचेत करणारा बनवून पाठविले आहे.
१०६. आणि कुरआनाला आम्ही थोडे थोडे करून अशासाठी उतरविले आहे की तुम्ही वेळ मिळेल त्यानुसार लोकांना ऐकवावे आणि आम्ही स्वतःदेखील याला थोडे थोडे करून उतरविले.
१०७. तुम्ही सांगा, तुम्ही यावर ईमान राखा किंवा न राखा, ज्यांना याच्यापूर्वी ज्ञान दिले गेले आहे, त्यांच्याजवळ जेव्हा देखील याचे पठण केले जाते, तेव्हा ते माथा टेकून सजदा करू लागतात.
११०. तुम्ही सांगा की अल्लाहला अल्लाह म्हणून पुकारा आणि रहमान म्हणून, ज्या नावाने देखील पुकारा सर्व शुभ नामे त्याचीच आहेत. ना तुम्ही आपली नमाज फार उंच स्वरात पढत जा आणि ना अगदी हळू स्वरात किंबहुना यांच्या मधला मार्ग शोधा.
१११. आणि सांगा, समस्त स्तुती- प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, जो ना संतती बाळगतो आणि ना आपल्या राज्यसत्तेत दुसऱ्या कोणाला भागीदार ठेवतो, ना तो असा कमजोर आहे की त्याचा कोणी सहाय्यक असावा आणि तुम्ही त्याची परिपूर्ण महिमा वर्णन करण्यात मग्न राहा.
Contents of the translations can be downloaded and re-published, with the following terms and conditions:
1. No modification, addition, or deletion of the content.
2. Clearly referring to the publisher and the source (QuranEnc.com).
3. Mentioning the version number when re-publishing the translation.
4. Keeping the transcript information inside the document.
5. Notifying the source (QuranEnc.com) of any note on the translation.
6. Updating the translation according to the latest version issued from the source (QuranEnc.com).
7. Inappropriate advertisements must not be included when displaying translations of the meanings of the Noble Quran.
Hasil pencarian:
API specs
Endpoints:
Sura translation
GET / https://quranenc.com/api/v1/translation/sura/{translation_key}/{sura_number} description: get the specified translation (by its translation_key) for the speicified sura (by its number)
Parameters: translation_key: (the key of the currently selected translation) sura_number: [1-114] (Sura number in the mosshaf which should be between 1 and 114)
Returns:
json object containing array of objects, each object contains the "sura", "aya", "translation" and "footnotes".
GET / https://quranenc.com/api/v1/translation/aya/{translation_key}/{sura_number}/{aya_number} description: get the specified translation (by its translation_key) for the speicified aya (by its number sura_number and aya_number)
Parameters: translation_key: (the key of the currently selected translation) sura_number: [1-114] (Sura number in the mosshaf which should be between 1 and 114) aya_number: [1-...] (Aya number in the sura)
Returns:
json object containing the "sura", "aya", "translation" and "footnotes".