Check out the new design

Traduzione dei Significati del Sacro Corano - Traduzione marathi - Muhammad Shafi Ansari * - Indice Traduzioni


Traduzione dei significati Sura: An-Nûr   Versetto:
رِجَالٌ ۙ— لَّا تُلْهِیْهِمْ تِجَارَةٌ وَّلَا بَیْعٌ عَنْ ذِكْرِ اللّٰهِ وَاِقَامِ الصَّلٰوةِ وَاِیْتَآءِ الزَّكٰوةِ— یَخَافُوْنَ یَوْمًا تَتَقَلَّبُ فِیْهِ الْقُلُوْبُ وَالْاَبْصَارُ ۟ۙ
३७. असे लोक ज्यांना त्यांचा व्यापार आणि खरेदी-विक्री अल्लाहच्या स्मरणापासून आणि नमाज कायम करण्यापासून व जकात अदा करण्यापासून गाफील करीत नाही, त्या दिवसाचे भय बाळगतात, ज्या दिवशी अनेक हृदये आणि अनेक डोळे उलथे-पालथे होतील.
Esegesi in lingua araba:
لِیَجْزِیَهُمُ اللّٰهُ اَحْسَنَ مَا عَمِلُوْا وَیَزِیْدَهُمْ مِّنْ فَضْلِهٖ ؕ— وَاللّٰهُ یَرْزُقُ مَنْ یَّشَآءُ بِغَیْرِ حِسَابٍ ۟
३८. या हेतुने की अल्लाहने त्यांना त्यांच्या कर्माचा चांगला मोबदला द्यावा आणि आपल्या कृपेने काही जास्तच प्रदान करावे आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह ज्याला इच्छितो अगणित रोजी (आजिविका) प्रदान करतो.
Esegesi in lingua araba:
وَالَّذِیْنَ كَفَرُوْۤا اَعْمَالُهُمْ كَسَرَابٍۭ بِقِیْعَةٍ یَّحْسَبُهُ الظَّمْاٰنُ مَآءً ؕ— حَتّٰۤی اِذَا جَآءَهٗ لَمْ یَجِدْهُ شَیْـًٔا وَّوَجَدَ اللّٰهَ عِنْدَهٗ فَوَفّٰىهُ حِسَابَهٗ ؕ— وَاللّٰهُ سَرِیْعُ الْحِسَابِ ۟ۙ
३९. आणि काफिर (इन्कारी) लोकांचे कर्म त्या चकाकणाऱ्या वाळूसारखे आहे जी खुल्या मैदानात असावी. जिला तहानलेला मनुष्य दुरून पाणी समजतो, परंतु जेव्हा तो त्याजवळ पोहचतो, तेव्हा त्याला काहीच आढळत नाही, तथापि अल्लाह आपल्या निकट असल्याचे आढळते, जो त्याचा हिशोब पुरेपूर चुकता करतो. आणि अल्लाह लवकरच हिशोब चुकता करणारा आहे.
Esegesi in lingua araba:
اَوْ كَظُلُمٰتٍ فِیْ بَحْرٍ لُّجِّیٍّ یَّغْشٰىهُ مَوْجٌ مِّنْ فَوْقِهٖ مَوْجٌ مِّنْ فَوْقِهٖ سَحَابٌ ؕ— ظُلُمٰتٌ بَعْضُهَا فَوْقَ بَعْضٍ ؕ— اِذَاۤ اَخْرَجَ یَدَهٗ لَمْ یَكَدْ یَرٰىهَا ؕ— وَمَنْ لَّمْ یَجْعَلِ اللّٰهُ لَهٗ نُوْرًا فَمَا لَهٗ مِنْ نُّوْرٍ ۟۠
४०. किंवा त्या अंधारांसारखे आहे जे खूप खोल समुद्रात असावेत, ज्याला लाटेवर लाट झाकत असावी, मग त्यावर ढग पसरले असावेत. अर्थात अंधारावर अंधार असावा. जर आपला हात बाहेर काढील तर तोही पाहणे त्याला शक्य नसावे, आणि (वस्तुतः) ज्याला अल्लाहनेच नूर न द्यावा त्याच्याजवळ कोणताही नूर (प्रकाश) नसतो.
Esegesi in lingua araba:
اَلَمْ تَرَ اَنَّ اللّٰهَ یُسَبِّحُ لَهٗ مَنْ فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ وَالطَّیْرُ صٰٓفّٰتٍ ؕ— كُلٌّ قَدْ عَلِمَ صَلَاتَهٗ وَتَسْبِیْحَهٗ ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌۢ بِمَا یَفْعَلُوْنَ ۟
४१. काय तुम्ही नाही पाहिले की आकाश आणि धरतीची समस्त ईशनिर्मिती आणि पंख पसरून उडणारे सर्व पक्षी अल्लाहीच तस्बीह (नामस्मरण )(गुणगान) करण्यात मग्न आहेत. प्रत्येकाची नमाज आणि तस्बीह (नामस्मरण) त्याला माहीत आहे आणि लोक जे काही करतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.१
(१) अर्थात आकाश व जमिनीवर निवास करणारे, ज्या प्रकारे अल्लाहचे आज्ञापालन आणि प्रशंसा करतात, ते सर्व तो जाणतो. ही समस्त मानव आणि जिन्नांना चेतावणी आहे की अल्लाहने तुम्हाला बुद्धी आणि विवेकाचे स्वातंत्र्य दिले आहे, तेव्हा तुम्ही इतर निर्मितीच्या तुलनेत अधिक ईश-स्तुती व महिमागान केले पाहिजे. परंतु वस्तुस्थिती याच्या उलट आहे. अल्लाहची इतर निर्मिती तर अल्लाहचे गुणगान करण्यात मग्न आहे परंतु बुद्धी आणि प्रज्ञेने सुशोभित असलेली ही ईशनिर्मिती याबाबत सुस्त आहे ज्याबद्दल खात्रीने अल्लाहच्या पकडीस पात्र ठरतील.
Esegesi in lingua araba:
وَلِلّٰهِ مُلْكُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ۚ— وَاِلَی اللّٰهِ الْمَصِیْرُ ۟
४२. आकाशांची आणि धरतीची राज्यसत्ता अल्लाहचीच आहे आणि अल्लाहच्याचकडे परतून जायचे आहे.
Esegesi in lingua araba:
اَلَمْ تَرَ اَنَّ اللّٰهَ یُزْجِیْ سَحَابًا ثُمَّ یُؤَلِّفُ بَیْنَهٗ ثُمَّ یَجْعَلُهٗ رُكَامًا فَتَرَی الْوَدْقَ یَخْرُجُ مِنْ خِلٰلِهٖ ۚ— وَیُنَزِّلُ مِنَ السَّمَآءِ مِنْ جِبَالٍ فِیْهَا مِنْ بَرَدٍ فَیُصِیْبُ بِهٖ مَنْ یَّشَآءُ وَیَصْرِفُهٗ عَنْ مَّنْ یَّشَآءُ ؕ— یَكَادُ سَنَا بَرْقِهٖ یَذْهَبُ بِالْاَبْصَارِ ۟ؕ
४३. काय तुम्ही नाही पाहिले की अल्लाह ढगांना चालवितो, मग त्यांना आपसात मिळवतो, मग त्यांना थरावर थर करतो. मग तुम्ही पाहता की त्यांच्यामधून पाऊस पडतो. तोच आकाशाकडून गारांच्या पर्वतातून गारा वर्षवितो. मग ज्यांना इच्छितो त्यांना त्यांच्याजवळ वर्षवितो आणि ज्यांच्यापासून इच्छितो त्यांच्यापासून त्यांना हटवितो. ढगांमधूनच निघणाऱ्या विजेची चमक अशी असते की जणू आता डोळ्यांची नजर हिरावून घेईल.
Esegesi in lingua araba:
 
Traduzione dei significati Sura: An-Nûr
Indice delle Sure Numero di pagina
 
Traduzione dei Significati del Sacro Corano - Traduzione marathi - Muhammad Shafi Ansari - Indice Traduzioni

La sua traduzione di Mohammad Shafi Ansari.

Chiudi