Check out the new design

ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី * - សន្ទស្សន៍នៃការបកប្រែ


ការបកប្រែអត្ថន័យ ជំពូក​: អាត់តាវហ្ពះ   អាយ៉ាត់:
یَحْلِفُوْنَ بِاللّٰهِ لَكُمْ لِیُرْضُوْكُمْ ۚ— وَاللّٰهُ وَرَسُوْلُهٗۤ اَحَقُّ اَنْ یُّرْضُوْهُ اِنْ كَانُوْا مُؤْمِنِیْنَ ۟
६२. ते केवळ तुम्हाला खूश करण्यासाठी तुमच्यासमोर अल्लाहची शपथ घेतात, वस्तुतः हे ईमान राखणारे असते तर अल्लाह आणि त्याचे रसूल (पैगंबर) खूश केले जाण्यास अधिक पात्र होते.
តាហ្វសៀរជាភាសា​អារ៉ាប់ជាច្រេីន:
اَلَمْ یَعْلَمُوْۤا اَنَّهٗ مَنْ یُّحَادِدِ اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ فَاَنَّ لَهٗ نَارَ جَهَنَّمَ خَالِدًا فِیْهَا ؕ— ذٰلِكَ الْخِزْیُ الْعَظِیْمُ ۟
६३. काय हे नाही जाणत की जो कोणी अल्लाहचा आणि त्याच्या पैगंबराचा विरोध करील, त्याच्यासाठी निश्चितच जहन्नमची आग आहे, जिच्यात ते नेहमी राहतील. हा फार मोठा अपमान आहे.
តាហ្វសៀរជាភាសា​អារ៉ាប់ជាច្រេីន:
یَحْذَرُ الْمُنٰفِقُوْنَ اَنْ تُنَزَّلَ عَلَیْهِمْ سُوْرَةٌ تُنَبِّئُهُمْ بِمَا فِیْ قُلُوْبِهِمْ ؕ— قُلِ اسْتَهْزِءُوْا ۚ— اِنَّ اللّٰهَ مُخْرِجٌ مَّا تَحْذَرُوْنَ ۟
६४. मुनाफिक लोकांना अर्थात ढोंगी मुसलमानांना (नेहमी) हे भय वाटत असते की कदाचित त्यांच्यावर (ईमानधारकांवर) एखादी आयत न अवतरित व्हावी, जी त्यांच्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगून टाकील. तुम्ही सांगा की तुम्ही थट्टा मस्करी करीत राहा. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह ते जाहीर करणारा आहे, ज्यापासून तुम्ही भयभीत आहात.
តាហ្វសៀរជាភាសា​អារ៉ាប់ជាច្រេីន:
وَلَىِٕنْ سَاَلْتَهُمْ لَیَقُوْلُنَّ اِنَّمَا كُنَّا نَخُوْضُ وَنَلْعَبُ ؕ— قُلْ اَبِاللّٰهِ وَاٰیٰتِهٖ وَرَسُوْلِهٖ كُنْتُمْ تَسْتَهْزِءُوْنَ ۟
६५. जर तुम्ही विचाराल तर साफ म्हणतील की आम्ही तर असेच आपसात थट्टा विनोद करीत होतो. त्यांना सांगा की काय अल्लाह त्याच्या आयती आणि त्याचा रसूल एवढेच तुमच्या थट्टा-मस्करीकरिता बाकी राहिलेत?
តាហ្វសៀរជាភាសា​អារ៉ាប់ជាច្រេីន:
لَا تَعْتَذِرُوْا قَدْ كَفَرْتُمْ بَعْدَ اِیْمَانِكُمْ ؕ— اِنْ نَّعْفُ عَنْ طَآىِٕفَةٍ مِّنْكُمْ نُعَذِّبْ طَآىِٕفَةًۢ بِاَنَّهُمْ كَانُوْا مُجْرِمِیْنَ ۟۠
६६. तुम्ही बहाणे बनवू नका. निःसंशय तुम्ही आपल्या ईमान राखल्यानंतर काफिर (इन्कारी) झाले. जर आम्ही तुमच्यापैकी काही लोकांना माफ जरी केले तरी काही लोकांना त्यांच्या अत्याचाराची सक्त सजा देणारच.
តាហ្វសៀរជាភាសា​អារ៉ាប់ជាច្រេីន:
اَلْمُنٰفِقُوْنَ وَالْمُنٰفِقٰتُ بَعْضُهُمْ مِّنْ بَعْضٍ ۘ— یَاْمُرُوْنَ بِالْمُنْكَرِ وَیَنْهَوْنَ عَنِ الْمَعْرُوْفِ وَیَقْبِضُوْنَ اَیْدِیَهُمْ ؕ— نَسُوا اللّٰهَ فَنَسِیَهُمْ ؕ— اِنَّ الْمُنٰفِقِیْنَ هُمُ الْفٰسِقُوْنَ ۟
६७. सर्वच मुनाफिक (दांभिक) पुरुष आणि स्त्रिया आपसात सारखेच आहेत. ते वाईट गोष्टींचा आदेश देतात आणि भल्या गोष्टींपासून रोखतात आणि आपली मूठ बंद ठेवतात, हे अल्लाहला विसरले, अल्लाहनेही त्यांचा विसर पाडला. निःसंशय मुनाफिक (दुतोंडी) लोकच दुराचारी आहेत.
តាហ្វសៀរជាភាសា​អារ៉ាប់ជាច្រេីន:
وَعَدَ اللّٰهُ الْمُنٰفِقِیْنَ وَالْمُنٰفِقٰتِ وَالْكُفَّارَ نَارَ جَهَنَّمَ خٰلِدِیْنَ فِیْهَا ؕ— هِیَ حَسْبُهُمْ ۚ— وَلَعَنَهُمُ اللّٰهُ ۚ— وَلَهُمْ عَذَابٌ مُّقِیْمٌ ۟ۙ
६८. सर्वश्रेष्ठ अल्लाहने या मुनाफिक पुरुष-स्त्रियांशी आणि काफिरांशी जहन्नमच्या आगीचा वायदा केलेला आहे, जिथे ते नेहमी राहतील तेच त्यांच्यासाठी पुरेसे आहे. त्यांचा अल्लाहतर्फे धिःक्कार आहे आणि त्यांच्यासाठी कायमस्वरूपी शिक्षा यातना आहे.
តាហ្វសៀរជាភាសា​អារ៉ាប់ជាច្រេីន:
 
ការបកប្រែអត្ថន័យ ជំពូក​: អាត់តាវហ្ពះ
សន្ទស្សន៍នៃជំពូក លេខ​ទំព័រ
 
ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី - សន្ទស្សន៍នៃការបកប្រែ

បានបកប្រែដោយ ម៉ូហាំម៉ាត់​ សាហ្វី អាន់សារី

បិទ