external-link copy
34 : 21

وَمَا جَعَلْنَا لِبَشَرٍ مِّنْ قَبْلِكَ الْخُلْدَ ؕ— اَفَاۡىِٕنْ مِّتَّ فَهُمُ الْخٰلِدُوْنَ ۟

३४. आणि तुमच्यापूर्वी आम्ही कोणत्याही माणसाला चिरसजीवता दिली नाही, मग काय, जर तुम्ही मरण पावला तर हे सदैव काळ इथे राहतील? १ info

(१) हे अविश्वासी लोकांच्या उत्तरादाखल आहे जे पैगंबर (स.) विषयी म्हणत की एक दिवस तुम्ही मरणारच आहात. त्यावर अल्लाहने फर्माविले की मृत्यु प्रत्येकाला येणार आहे. तेव्हा या नियमाला पैगंबर देखील अपवाद नाहीत, कारण तेही एक मानव आहेत आणि आम्ही कोणालाही सदैव काळ जिवंत राहण्यासाठी सोडले नाही, तेव्हा बोलणारेही नेहमीसाठी इथे राहणार नाहीत. याद्वारे मूर्तीपूजक आणि कबरींची पूजा करणाऱ्यांचेही खंडन झाले, जे देवता, पैगंबर आणि थोर बुजूर्गांच्या सदैव जिवंत असण्याचा भ्रम राखतात आणि या श्रद्धेच्या आधारावर त्यांना आपला दुःखनिवारक, संकटविमोचक, मुश्किलकुशा वगैरे समजतात. या चुकीच्या धारणेपासून सर्वश्रेष्ठ अल्लाह आमचे रक्षण करो.

التفاسير: |
prev

Al-Anbija

next