Check out the new design

पवित्र कुरअानको अर्थको अनुवाद - मराठी अनुवाद : मुहम्मद शफी अनसारी । * - अनुवादहरूको सूची


अर्थको अनुवाद सूरः: मुहम्मद   श्लोक:
وَلَوْ نَشَآءُ لَاَرَیْنٰكَهُمْ فَلَعَرَفْتَهُمْ بِسِیْمٰهُمْ ؕ— وَلَتَعْرِفَنَّهُمْ فِیْ لَحْنِ الْقَوْلِ ؕ— وَاللّٰهُ یَعْلَمُ اَعْمَالَكُمْ ۟
३०. आणि जर आम्ही इच्छिले असते तर तुम्हाला, त्या सर्वांना दाखविले असते तेव्हा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यांवरूनच त्यांना ओळखले असते, आणि निःसंशय, तुम्ही त्यांना त्यांच्या संभाषण शैलीवरून ओळखाल, तुमची समस्त कर्मे अल्लाह जाणून आहे.
अरबी व्याख्याहरू:
وَلَنَبْلُوَنَّكُمْ حَتّٰی نَعْلَمَ الْمُجٰهِدِیْنَ مِنْكُمْ وَالصّٰبِرِیْنَ ۙ— وَنَبْلُوَاۡ اَخْبَارَكُمْ ۟
३१. आणि निःसंशय आम्ही तुमची कसोटी घेऊ यासाठी की तुमच्यापैकी जिहाद करणाऱ्यांना आणि धैर्य-संयम राखणाऱ्यांना पाहावे, आणि तुमच्या अवस्थांचीही जाच पडताळ करून घ्यावी.
अरबी व्याख्याहरू:
اِنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا وَصَدُّوْا عَنْ سَبِیْلِ اللّٰهِ وَشَآقُّوا الرَّسُوْلَ مِنْ بَعْدِ مَا تَبَیَّنَ لَهُمُ الْهُدٰی ۙ— لَنْ یَّضُرُّوا اللّٰهَ شَیْـًٔا ؕ— وَسَیُحْبِطُ اَعْمَالَهُمْ ۟
३२. निःसंशय, ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि अल्लाहच्या मार्गापासून लोकांना रोखले आणि पैगंबराचा विरोध केला यानंतर की त्यांच्यासाठी मार्गदर्शन स्पष्ट झाले, हे कधीही अल्लाहला कसलेही नुकसान पोहचविणार नाहीत. अल्लाह लवकरच त्यांच्या कर्मांना नष्ट करून टाकील.
अरबी व्याख्याहरू:
یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اَطِیْعُوا اللّٰهَ وَاَطِیْعُوا الرَّسُوْلَ وَلَا تُبْطِلُوْۤا اَعْمَالَكُمْ ۟
३३. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे आज्ञापालन करा आणि पैगंबरांचे आज्ञापालन करा आणि आपली कर्मे वाया घालवू नका.
अरबी व्याख्याहरू:
اِنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا وَصَدُّوْا عَنْ سَبِیْلِ اللّٰهِ ثُمَّ مَاتُوْا وَهُمْ كُفَّارٌ فَلَنْ یَّغْفِرَ اللّٰهُ لَهُمْ ۟
३४. निःसंशय, ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि अल्लाहच्या मार्गापासून (दुसऱ्यांना) रोखले, मग कुप्रच्या अवस्थेतच मरण पावले (विश्वास राखा की) अल्लाह त्या लोकांना कधीही माफ करणार नाही.
अरबी व्याख्याहरू:
فَلَا تَهِنُوْا وَتَدْعُوْۤا اِلَی السَّلْمِ ۖۗ— وَاَنْتُمُ الْاَعْلَوْنَ ۖۗ— وَاللّٰهُ مَعَكُمْ وَلَنْ یَّتِرَكُمْ اَعْمَالَكُمْ ۟
३५. तेव्हा तुम्ही कमजोर बनून तह (समजोता) ची विनंती करण्याच्या स्तरावर येऊ नका, जेव्हा की तुम्हीच (विजयी आणि) वर्चस्वशाली राहाल,१ आणि अल्लाह तुमच्या सोबतीला आहे (आपल्या ज्ञानाद्वारे) अशक्य आहे की तो तुमची कर्मे वाया घालविल.
अरबी व्याख्याहरू:
اِنَّمَا الْحَیٰوةُ الدُّنْیَا لَعِبٌ وَّلَهْوٌ ؕ— وَاِنْ تُؤْمِنُوْا وَتَتَّقُوْا یُؤْتِكُمْ اُجُوْرَكُمْ وَلَا یَسْـَٔلْكُمْ اَمْوَالَكُمْ ۟
३६. वस्तुतः या जगाचे जीवन तर खेळ तमाशा आहे आणि जर तुम्ही ईमान राखाल आणि अल्लाहचे भय (तकवा) अंगीकाराल, तर अल्लाह तुम्हाला तुमच्या कर्मांचा मोबदला प्रदान करील आणि तो तुमच्याकडून तुमची धन-दौलत मागत नाही.
अरबी व्याख्याहरू:
اِنْ یَّسْـَٔلْكُمُوْهَا فَیُحْفِكُمْ تَبْخَلُوْا وَیُخْرِجْ اَضْغَانَكُمْ ۟
३७. जर तो तुमच्याकडून तुमचे धन मागेल आणि बलपूर्वक मागेल तर तुम्ही त्याच्याशी कंजूसपणा करू लागाल आणि तो तुमचा व्यंग- दोष जाहीर करेल.
अरबी व्याख्याहरू:
هٰۤاَنْتُمْ هٰۤؤُلَآءِ تُدْعَوْنَ لِتُنْفِقُوْا فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ ۚ— فَمِنْكُمْ مَّنْ یَّبْخَلُ ۚ— وَمَنْ یَّبْخَلْ فَاِنَّمَا یَبْخَلُ عَنْ نَّفْسِهٖ ؕ— وَاللّٰهُ الْغَنِیُّ وَاَنْتُمُ الْفُقَرَآءُ ۚ— وَاِنْ تَتَوَلَّوْا یَسْتَبْدِلْ قَوْمًا غَیْرَكُمْ ۙ— ثُمَّ لَا یَكُوْنُوْۤا اَمْثَالَكُمْ ۟۠
३८. खबरदार! तुम्ही ते लोक आहात की अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यासाठी बोलविले जातात, तेव्हा तुमच्यापैकी काही जण कंजूसपणा करू लागतात आणि जो कंजूसपणा करतो, तो निःसंशय स्वतःशीच कंजूसपणा करतो. सर्वश्रेष्ठ अल्लाह निःस्पृह आहे आणि तुम्ही गरजवंत आहात, आणि जर तुम्ही तोंड फिरविणारे व्हाल तर तो तुमच्या जागी, तुमच्याखेरीज दुसऱ्या लोकांना आणिल जे मग तुमच्यासारखे नसतील.
अरबी व्याख्याहरू:
 
अर्थको अनुवाद सूरः: मुहम्मद
अध्यायहरूको (सूरःहरूको) सूची رقم الصفحة
 
पवित्र कुरअानको अर्थको अनुवाद - मराठी अनुवाद : मुहम्मद शफी अनसारी । - अनुवादहरूको सूची

यसको अनुवाद मुहम्मद शफी अन्सारीले गरेका छन् ।

बन्द गर्नुस्