د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
62 : 19

لَا یَسْمَعُوْنَ فِیْهَا لَغْوًا اِلَّا سَلٰمًا ؕ— وَلَهُمْ رِزْقُهُمْ فِیْهَا بُكْرَةً وَّعَشِیًّا ۟

६२. त्यांना तिथे कोणतीही व्यर्थ गोष्ट ऐकायला मिळणार नाही, ते फक्त सलामच, सलाम ऐकतील त्यांच्यासाठी सकाळ-संध्याकाळ त्यांची रोजी (अन्न-सामुग्री) असेल.१ info

(१) इमाम अहमद यांनी यावर भाष्य करताना म्हटले आहे की जन्नतमध्ये रात्र आणि दिवस नसतील, केवळ प्रकाशच प्रकाश असेल. हदीसमधील उल्लेखानुसार जन्नतमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या गटाचे चेहरे पौर्णिमेच्या चंद्रासमान तेजस्वी असतील. त्यांना तिथे न थूंक येईल, ना नाक वाहेल आणि नाक मल मूत्र विसर्जनाची पाळी येईल. तिचे त्यांची भांडी आणि कंगवे सोन्याचे असतील. त्यांचे शरीर सुगंधित आणि घाम केशरासमान सुगंधित ्‌सतील. जन्नतमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाच्या दोन पत्न्या असतील. त्यांच्या पोटरींचा गाभा त्यांच्या मांसाच्या मागून दिसून येईल, त्याच्या अनुपम सौंदर्यामुळे त्यांच्यात आपसात द्वेष मत्सर भावना नसेल. सकाळ संध्याकाळ अल्लाहची प्रशंसा व त्याचे गुणगान करतील. (सहीह बुखारी, बदऊल खलक बाब माजाअ फी सिफातिल जन्नः व इन्नहा मखलूकतून आणि सहीह मुस्लिम किताबुल जन्नः बाब फी सिफातिल जन्नः व अहलेहा)

التفاسير: