د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
49 : 33

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اِذَا نَكَحْتُمُ الْمُؤْمِنٰتِ ثُمَّ طَلَّقْتُمُوْهُنَّ مِنْ قَبْلِ اَنْ تَمَسُّوْهُنَّ فَمَا لَكُمْ عَلَیْهِنَّ مِنْ عِدَّةٍ تَعْتَدُّوْنَهَا ۚ— فَمَتِّعُوْهُنَّ وَسَرِّحُوْهُنَّ سَرَاحًا جَمِیْلًا ۟

४९. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही ईमान राखणाऱ्या स्त्रियांशी विवाह कराल, मग त्यांना हात लावण्यापूर्वी तलाक (घटस्फोट) द्याल, तर त्यांच्यावर तुमचा कसलाही (अधिकार) इद्दत (तलाकनंतर निर्धारित वेळेपर्यंतची प्रतिबंधित मुदती) चा नाही, जिची तुम्ही गणना करावी.१ तेव्हा तुम्ही त्यांना काही न काही द्या आणि भल्या रितीने त्यांना निरोप द्या. info

(१) विवाहनंतर ज्या स्त्रियांशी सहवास (समागम) केला गेला असेल आणि त्या अजून तरुण असतील, अशा स्त्रियांना तलाक दिला गेल्यास त्यांची ‘इद्दत’ तीन मासिक पाळी होय. (अल बकरा-२२८) इथे त्या स्त्रियांचा नियम सांगितला जात आहे, ज्यांचा विवाह तर झाला परंतु पती-पत्नीच्या दरम्यान समागम झाला नाही, त्यांना तलाक मिळाल्यास कसलीही इद्दत नाही. अर्थात अशी समागम न झालेली तलाक दिली गेलेली स्त्री इद्दत अवधी पार न पाडता त्वरित कुठे विवाह करू इच्छिल तर करू शकते. परंतु समागमपूर्वच पती मरण पावल्यास तिला चार महिने दहा दिवसांचा इद्दत अवधी पार पाडावा लागेल.

التفاسير: