prev

فاطر

next

external-link copy
1 : 35

اَلْحَمْدُ لِلّٰهِ فَاطِرِ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ جَاعِلِ الْمَلٰٓىِٕكَةِ رُسُلًا اُولِیْۤ اَجْنِحَةٍ مَّثْنٰی وَثُلٰثَ وَرُبٰعَ ؕ— یَزِیْدُ فِی الْخَلْقِ مَا یَشَآءُ ؕ— اِنَّ اللّٰهَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟

१. त्या अल्लाकरिता समस्त स्तुती - प्रशंसा आहे, जो आकाशांना आणि धरतीला निर्माण करणारा आणि दोन दोन, तीन तीन आणि चार चार पंख बाळगणाऱ्या फरिश्त्यांना आपला संदेशवाहक बनविणारा आहे१ सृष्टीनिर्मितीत जे इच्छितो वाढवितो. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे. info

(१) अभिप्रेत जिब्रील, मीकाईल, इस्राफील आणि इज्राईल हे फरिश्ते होत, ज्यांना अल्लाह पैगंबरांकडे किंवा अनेक महत्त्वपूर्ण कार्यासाठी संदेशवाहक बनवून पाठवितो. यांच्यापैकी कोणाचे दोन, कोणाचे तीन तर कोणाचे चार पंख आहेत, ज्याद्वारे ते धरतीवर येतात आणि धरतीवरून आकाशाकडे जातात.

التفاسير: |
prev

فاطر

next