د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
9 : 63

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَا تُلْهِكُمْ اَمْوَالُكُمْ وَلَاۤ اَوْلَادُكُمْ عَنْ ذِكْرِ اللّٰهِ ۚ— وَمَنْ یَّفْعَلْ ذٰلِكَ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْخٰسِرُوْنَ ۟

९. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्या धनसंपत्ती व संततीने तुम्हाला अल्लाहच्या स्मरणापासून गाफील न करावे१ आणि जे असे करतील, तेच लोक नुकसान उचलणारे (तोट्यात राहणारे) आहेत. info

(१) अर्थात धन-संपत्ती आणि संततीचे प्रेम तुमच्यावर इतके प्रभावी न व्हावे की तुम्ही अल्लाहने फर्माविलेल्या आदेशांपासून व कर्तव्यांपासून निर्धास्त व्हावे आणि अल्लाहने निर्धारित केलेल्या हलाल (वैध) आणि हराम (अवैध) च्या मर्यादांची काळजी न घ्यावी. मुनाफिक लोकांचा उल्लेख केल्यानंतर त्वरित ही ताकिद करण्याचा हेतू हा आहे की ही मुनाफिक लोकांची पद्धती आहे, जी माणसाला हानिग्रस्त करणारी आहे. ईमान राखणाऱ्यांचे वर्तन याच्या अगदी उलट असते आणि ते असे की ते प्रत्येक क्षणी अल्लाहचे स्मरण राखतात, अर्थात त्याच्या आदेशांचे अनिवार्य केलेल्या गोष्टींचे पालन करतात आणि हलाल व हराममध्ये फरक राखतात.

التفاسير: