Check out the new design

د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري * - د ژباړو فهرست (لړلیک)


د معناګانو ژباړه سورت: طلاق   آیت:
اَسْكِنُوْهُنَّ مِنْ حَیْثُ سَكَنْتُمْ مِّنْ وُّجْدِكُمْ وَلَا تُضَآرُّوْهُنَّ لِتُضَیِّقُوْا عَلَیْهِنَّ ؕ— وَاِنْ كُنَّ اُولَاتِ حَمْلٍ فَاَنْفِقُوْا عَلَیْهِنَّ حَتّٰی یَضَعْنَ حَمْلَهُنَّ ۚ— فَاِنْ اَرْضَعْنَ لَكُمْ فَاٰتُوْهُنَّ اُجُوْرَهُنَّ ۚ— وَاْتَمِرُوْا بَیْنَكُمْ بِمَعْرُوْفٍ ۚ— وَاِنْ تَعَاسَرْتُمْ فَسَتُرْضِعُ لَهٗۤ اُخْرٰی ۟ؕ
६. तुम्ही आपल्या सामर्थ्यानुसार जिथे राहात असाल तिथे त्या (घटस्फोटित) स्त्रियांना ठेवा, आणि त्यांना सतविण्याकरिता कष्ट यातना देऊ नका, आणि जर त्या गर्भवती असतील तर त्या प्रसूत होई पर्यंत त्यांना खर्च देत राहा, मग जर तुमच्या सांगण्यावरून त्याच दूध पाजतील तर तुम्ही त्यांना त्यांचे पारश्रमिक देऊन टाका, आणि आपसात चांगल्या प्रकारे सल्लामसलत करून घेत जा आणि जर तुम्ही आपसात तणाव राखाल तर त्याच्या (पित्याच्या) सांगण्यावरून दुसरी स्त्री दूध पाजेल.
عربي تفسیرونه:
لِیُنْفِقْ ذُوْ سَعَةٍ مِّنْ سَعَتِهٖ ؕ— وَمَنْ قُدِرَ عَلَیْهِ رِزْقُهٗ فَلْیُنْفِقْ مِمَّاۤ اٰتٰىهُ اللّٰهُ ؕ— لَا یُكَلِّفُ اللّٰهُ نَفْسًا اِلَّا مَاۤ اٰتٰىهَا ؕ— سَیَجْعَلُ اللّٰهُ بَعْدَ عُسْرٍ یُّسْرًا ۟۠
७. धनवानाने आपल्या धन (सामर्थ्या) नुसार खर्च केला पाहिजे, आणि ज्याची जीविका (रोजी) त्याच्यासाठी कमी केली गेली असेल तर अल्लाहने जे काही त्याला देऊन ठेवले आहे, त्यातून त्याने (आपल्या सामर्थ्यानुसार) द्यावे, कोणत्याही माणसावर अल्लाह ओझे ठेवत नाही, परंतु इतकेच जेवढे सामर्थ्य त्याला दिले गेले आहे. अल्लाह गरीबीनंतर धन देखील प्रदान करेल.
عربي تفسیرونه:
وَكَاَیِّنْ مِّنْ قَرْیَةٍ عَتَتْ عَنْ اَمْرِ رَبِّهَا وَرُسُلِهٖ فَحَاسَبْنٰهَا حِسَابًا شَدِیْدًا وَّعَذَّبْنٰهَا عَذَابًا نُّكْرًا ۟
८. आणि अनेक वस्ती (वाल्यां) नी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची आणि त्याच्या पैगंबराची अवज्ञा केली तेव्हा आम्ही देखील त्यांचा सक्त हिशोब घेतला आणि न पाहिलेला (कठोर) अज़ाब त्यांच्यावर टाकला.
عربي تفسیرونه:
فَذَاقَتْ وَبَالَ اَمْرِهَا وَكَانَ عَاقِبَةُ اَمْرِهَا خُسْرًا ۟
९. तेव्हा त्यांनी आपल्या कृत-कर्मांचा स्वाद चाखून घेतला आणि परिणामस्वरुपी त्यांचे नुकसान झाले.
عربي تفسیرونه:
اَعَدَّ اللّٰهُ لَهُمْ عَذَابًا شَدِیْدًا ۙ— فَاتَّقُوا اللّٰهَ یٰۤاُولِی الْاَلْبَابِ— الَّذِیْنَ اٰمَنُوْا ۛۚ— قَدْ اَنْزَلَ اللّٰهُ اِلَیْكُمْ ذِكْرًا ۟ۙ
१०. त्यांच्यासाठी अल्लाहने फार कठोर शिक्षा - यातना तयार करून ठेवली आहे, तेव्हा हे बुद्धिमान ईमानधारकांनो, अल्लाहचे भय राखा, निःसंशय, अल्लाहने तुमच्याकडे बोध - उपदेश पाठविला आहे.
عربي تفسیرونه:
رَّسُوْلًا یَّتْلُوْا عَلَیْكُمْ اٰیٰتِ اللّٰهِ مُبَیِّنٰتٍ لِّیُخْرِجَ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ مِنَ الظُّلُمٰتِ اِلَی النُّوْرِ ؕ— وَمَنْ یُّؤْمِنْ بِاللّٰهِ وَیَعْمَلْ صَالِحًا یُّدْخِلْهُ جَنّٰتٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ خٰلِدِیْنَ فِیْهَاۤ اَبَدًا ؕ— قَدْ اَحْسَنَ اللّٰهُ لَهٗ رِزْقًا ۟
११. (अर्थात) पैगंबर, जो तुम्हाला अल्लाहचे स्पष्ट आदेश वाचून ऐकवितो, यासाठी की त्या लोकांना, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म केले, त्यांना अंधाराकडून उजेडाकडे आणावे आणि जो मनुष्य अल्लाहवर ईमान राखेल आणि सत्कर्म करेल, अल्लाह त्याला अशा जन्नतमध्ये दाखल करेल, जिच्याखाली प्रवाह वाहत आहेत, ज्यात ते नेहमी नेहमी राहतील. निःसंशय, अल्लाहने त्याला सर्वांत उत्तम रोजी (जीविका) देऊन ठेवली आहे.
عربي تفسیرونه:
اَللّٰهُ الَّذِیْ خَلَقَ سَبْعَ سَمٰوٰتٍ وَّمِنَ الْاَرْضِ مِثْلَهُنَّ ؕ— یَتَنَزَّلُ الْاَمْرُ بَیْنَهُنَّ لِتَعْلَمُوْۤا اَنَّ اللّٰهَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۙ— وَّاَنَّ اللّٰهَ قَدْ اَحَاطَ بِكُلِّ شَیْءٍ عِلْمًا ۟۠
१२. अल्लाह तो आहे, ज्याने सात आकाश बनविले आणि त्याचप्रमाणे जमीन देखील.१ त्याचा आदेश त्यांच्या दरम्यान अवतरित होतो, यासाठी की तुम्ही जाणून घ्यावे की अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे, आणि अल्लाहने प्रत्येक गोष्टीला आपल्या ज्ञानकक्षेत घेरलेले आहे.
(१) ‘ख़लक़ मिनल्‌ अर्ज़ी मिस्‌लहुन्न’ अर्थात सात आकाशांप्रमाणे अल्लाहने सात जमिनीही निर्माण केल्या आहेत. काहींनी यास अभिप्रेत सात महाद्वीप घेतले आहे, परंतु हे उचित नाही. ज्याप्रमाणे एकावर एक सात आकाश आहेत, तद्‌वतच सात जमिनीही आहेत. ज्यांच्या दरम्यान फरक व अंतर आहे आणि प्रत्येक जमिनीवर अल्लाहची सृष्टीनिर्मिती आबाद आहे. (अल्‌ कुर्तबी)
عربي تفسیرونه:
 
د معناګانو ژباړه سورت: طلاق
د سورتونو فهرست (لړلیک) د مخ نمبر
 
د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري - د ژباړو فهرست (لړلیک)

محمد شفيع انصاري ژباړلې ده.

بندول