د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

قلم

external-link copy
1 : 68

نٓ وَالْقَلَمِ وَمَا یَسْطُرُوْنَ ۟ۙ

१. नून. शपथ आहे कलम (लेखणी) ची,१ आणि त्या गोष्टीची, जी काही ते (फरिश्ते) लिहितात. info

(१) कलमची शपथ घेतली, जिचे एक महत्त्व यासाठी आहे की याद्वारे वर्णन आणि भाष्य केले जाते. काहींच्या मते यास अभिप्रेत तो खास कलम होय, ज्याला अल्लाहने सर्वांत प्रथम निर्माण केले आणि त्यास भाग्य लिहिण्याचा आदेश दिला. यास्तव त्याने शेवटपावेतो घडणाऱ्या सर्व गोष्टी लिहिल्या. (तिर्मिजी, तफसीर सूरह नून वल कलम आणि अलबानी यांनी यास उचित म्हटले आहे.)

التفاسير: