Ibisobanuro bya qoran ntagatifu - Ibisobanuro bya Qur'an Ntagatifu mu rurimi rw'ikimariti - Muhammad Shafii Answaari.

numero y'urupapuro:close

external-link copy
102 : 4

وَاِذَا كُنْتَ فِیْهِمْ فَاَقَمْتَ لَهُمُ الصَّلٰوةَ فَلْتَقُمْ طَآىِٕفَةٌ مِّنْهُمْ مَّعَكَ وَلْیَاْخُذُوْۤا اَسْلِحَتَهُمْ ۫— فَاِذَا سَجَدُوْا فَلْیَكُوْنُوْا مِنْ وَّرَآىِٕكُمْ ۪— وَلْتَاْتِ طَآىِٕفَةٌ اُخْرٰی لَمْ یُصَلُّوْا فَلْیُصَلُّوْا مَعَكَ وَلْیَاْخُذُوْا حِذْرَهُمْ وَاَسْلِحَتَهُمْ ۚ— وَدَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا لَوْ تَغْفُلُوْنَ عَنْ اَسْلِحَتِكُمْ وَاَمْتِعَتِكُمْ فَیَمِیْلُوْنَ عَلَیْكُمْ مَّیْلَةً وَّاحِدَةً ؕ— وَلَا جُنَاحَ عَلَیْكُمْ اِنْ كَانَ بِكُمْ اَذًی مِّنْ مَّطَرٍ اَوْ كُنْتُمْ مَّرْضٰۤی اَنْ تَضَعُوْۤا اَسْلِحَتَكُمْ ۚ— وَخُذُوْا حِذْرَكُمْ ؕ— اِنَّ اللّٰهَ اَعَدَّ لِلْكٰفِرِیْنَ عَذَابًا مُّهِیْنًا ۟

१०२. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या दरम्यान असाल आणि त्यांच्यासाठी नमाज कायम कराल, तेव्हा त्यांच्यातला एक गट तुमच्यासोबत शस्त्रानिशी सज्ज उभा राहिला पाहिजे, मग जेव्हा हे सजदा करून घेतील, तेव्हा यांनी तेथून हटावे, व तुमच्या पाठीमागे यावे आणि मग दुसरा गट, ज्याने अद्याप नमाज अदा केली नाही त्याने (पुढे) यावे आणि तुमच्यासोबत नमाज अदा करावी आणि आपला बचाव आणि आपली हत्यारे सोबत बाळगावित. काफिर तर इच्छितात की तुम्ही कसेही करून आपल्या हत्यारांपासून व आपल्या सामुग्रीपासून गाफील व्हावे तर मग त्यांनी अचाानक तुमच्यावर हल्ला करावा, मात्र जेव्हा तुम्हाला काही त्रास-यातना असेल किंवा जोरदार पाऊस अथवा आजारपणामुळे आपली हत्यारे उतरवून ठेवाल तर अशा वेळी तुमच्यावर काही गुन्हा नाही. आणि आपल्या बचावाची सामुग्री सोबत राखत जा. निःसंशय अल्लाहने इन्कार करणाऱ्यांसाठी अपमानदायक शिक्षा तयार करून ठेवली आहे. info
التفاسير:

external-link copy
103 : 4

فَاِذَا قَضَیْتُمُ الصَّلٰوةَ فَاذْكُرُوا اللّٰهَ قِیٰمًا وَّقُعُوْدًا وَّعَلٰی جُنُوْبِكُمْ ۚ— فَاِذَا اطْمَاْنَنْتُمْ فَاَقِیْمُوا الصَّلٰوةَ ۚ— اِنَّ الصَّلٰوةَ كَانَتْ عَلَی الْمُؤْمِنِیْنَ كِتٰبًا مَّوْقُوْتًا ۟

१०३. मग जेव्हा तुम्ही नमाज पढून घ्याल जेव्हा उठता बसता आणि पहुडलेल्या स्थितीत अल्लाहचे स्मरण करीत राहा आणि शांतीपूर्ण स्थिती असेल तर नमाज कायम करा. निःसंशय, नमाज ईमानधारकांवर निश्चित आणि निर्धारीत वेळेवर अदा करणे फर्ज (अनिवार्य) केले गेले आहे. info
التفاسير:

external-link copy
104 : 4

وَلَا تَهِنُوْا فِی ابْتِغَآءِ الْقَوْمِ ؕ— اِنْ تَكُوْنُوْا تَاْلَمُوْنَ فَاِنَّهُمْ یَاْلَمُوْنَ كَمَا تَاْلَمُوْنَ ۚ— وَتَرْجُوْنَ مِنَ اللّٰهِ مَا لَا یَرْجُوْنَ ؕ— وَكَانَ اللّٰهُ عَلِیْمًا حَكِیْمًا ۟۠

१०४. आणि त्या लोकांचा पाठलाग करण्यात आळस करू नका. जर तुम्हाला त्रास-यातना होत आहे तर त्यांनाही त्रास-यातना होते, जशी तुम्हाला होते, आणि तुम्ही अल्लाहकडून त्या आशा-अपेक्षा बाळगता, ज्या ते बाळगत नाहीत, आणि अल्लाह सर्व काही जाणणारा, हिकमतशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
105 : 4

اِنَّاۤ اَنْزَلْنَاۤ اِلَیْكَ الْكِتٰبَ بِالْحَقِّ لِتَحْكُمَ بَیْنَ النَّاسِ بِمَاۤ اَرٰىكَ اللّٰهُ ؕ— وَلَا تَكُنْ لِّلْخَآىِٕنِیْنَ خَصِیْمًا ۟ۙ

१०५. निःसंशय, आम्ही तुमच्याकडे सत्यासह ग्रंथ अवतरीत केला आहे, यासाठी की तुम्ही लोकांच्या दरम्यान त्याला अनुसरून न्याय-निवाडा करावा, ज्याबाबत अल्लाहने तुम्हाला अवगत केले आणि अपहार करणाऱ्यांचे समर्थक बनू नका. info
التفاسير: