Përkthimi i kuptimeve të Kuranit Fisnik - Përkthimi maratisht - Muhammed Shafi Ansari

external-link copy
84 : 21

فَاسْتَجَبْنَا لَهٗ فَكَشَفْنَا مَا بِهٖ مِنْ ضُرٍّ وَّاٰتَیْنٰهُ اَهْلَهٗ وَمِثْلَهُمْ مَّعَهُمْ رَحْمَةً مِّنْ عِنْدِنَا وَذِكْرٰی لِلْعٰبِدِیْنَ ۟

८४. तेव्हा आम्ही त्यांची (प्रार्थना) ऐकली आणि जे दुःख त्यांना होते ते दूर केले आणि त्यांना त्यांचे कुटुंब प्रदान केले, किंबहुना, त्यांना आपल्या खास दया कृपेने१ त्यासोबत तसेच आणखीही दिले, यासाठी की उपासना करणाऱ्यांकरिता उपदेशकारक ठरावे. info

(१) ज्याप्रमाणे आज देखील अज्ञान आणि अंधश्रद्धेत अडकलेल्या मुसलमानांना बिदअत (इस्लाम धर्मात नव्या गोष्टी निर्माण करणे, ज्यांचा इस्लाम धर्माच्या तत्त्वाशी, नियमांशी काहीच संबंध किंवा पुरावा उपलब्ध नसावा) आणि चुकीच्या प्रथांना रोखले जाते, तेव्हा म्हणतात, आम्ही हे रीतीरिवाज कसे बरे सोडावेत, वास्तविक आम्ही आपल्या पूर्वजांना असेच करताना पाहिले आहे, आणि हेच उत्तर ते लोक देखील देतात जे कुरआन आणि पैगंबर (रस.) यांच्या आचरणशैलीच्या आदेशांना सोडून धर्मज्ञानी (आलिम) आणि धर्मशास्त्राचे ज्ञानी (फिकह) यांच्याशी संबंधित राहणेच आवश्यक समजतात.

التفاسير: