Përkthimi i kuptimeve të Kuranit Fisnik - Përkthimi maratisht - Muhammed Shafi Ansari

external-link copy
8 : 30

اَوَلَمْ یَتَفَكَّرُوْا فِیْۤ اَنْفُسِهِمْ ۫— مَا خَلَقَ اللّٰهُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ وَمَا بَیْنَهُمَاۤ اِلَّا بِالْحَقِّ وَاَجَلٍ مُّسَمًّی ؕ— وَاِنَّ كَثِیْرًا مِّنَ النَّاسِ بِلِقَآئِ رَبِّهِمْ لَكٰفِرُوْنَ ۟

८. काय त्या लोकांनी आपल्या मनात यावर विचार नाही केला की अल्लाह ने आकाशांना व जमिनीला आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे त्या सर्वांना उत्तम अनुमानाने,१ निर्धारित वेळेपर्यंत (च) निर्माण केले आहे, तथापि अधिकांश लोक आपल्या पालनकर्त्याच्या भेटीचा इन्कार करतात. info

(१) किंवा एक उद्देश आणि सत्यासह निर्माण केले आहे, व्यर्थ नाही आणि तो उद्देश हा की नेक सदाचारी लोकांना सत्कर्मांचा मोबदला आणि दुराचारी लोकांना त्यांच्या दुष्कर्मांची शिक्षा दिली जावी, म्हणजे, काय ते आपल्या अस्तित्वावर विचार चिंतन करीत नाही की कशा प्रकारे त्याला तुच्छतेपासून उच्चता प्रदान केली आणि पाण्याच्या एका तुच्छ थेंबापासून त्याची रचना केली, मग आकाश व जमिनीला एका खास हेतुसाठी लांब रुंद केले. याखेरीज त्या सर्वांसाठी एक निर्धारित वेळ ठरवली, अर्थात कयामतचा दिवस, ज्या दिवशी हे सर्व काही समाप्त होईल. याचा अर्थ असा की जर यांनी या सर्व गोष्टींवर विचार केला असता तर निश्चितपणे अल्लाहचे अस्तित्व, तो रब (स्वामी व पालनकर्ता) असण्याची आणि उपासनायोग्य असण्याची आणि त्याच्या असीम सामर्थ्याची त्यांना जाणीव झाली असती, त्यांना तसे ज्ञान लाभले असते आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी ईमान राखले असते.

التفاسير: