แปล​ความหมาย​อัลกุรอาน​ - คำแปลภาษามราฐี - มุฮัมมัด ชะฟีอ์ อันศอรีย์

external-link copy
3 : 2

الَّذِیْنَ یُؤْمِنُوْنَ بِالْغَیْبِ وَیُقِیْمُوْنَ الصَّلٰوةَ وَمِمَّا رَزَقْنٰهُمْ یُنْفِقُوْنَ ۟ۙ

३. जे लोक न पाहिलेल्या (परलोका) वर ईमान राखतात १ आणि नमाजला कायम करतात आमि आम्ही प्रदान केलेल्या (धन संपत्ती) मधून खर्च करतात. info

(१) मूळ शब्द ‘ग़ैब’ याचा अर्थ अशा गोष्टी ज्यांचे समाधान बुद्धी आणि अकलेद्वारे नाही. उदा. अल्लाहचे अस्तित्व, वहीये इलाही (अवतरीत संदेश), जन्नत, जहन्नम, फरिश्ते, कबरीचा अज़ाब, हश्र (कर्मांचा हिशोब) होणे इत्यादी. तात्पर्य अल्लाह आणि पैगंबरानी सांगितलेल्या खबरींवर बुद्धी, कयास, आभासाविना अटळ विश्वास राखणे ईमानचा भाग आहे आणि यांचा इन्कार करणे कुप्र आणि गुमराही (नकार व मार्गभ्रष्टता) आहे.

التفاسير: