Salin ng mga Kahulugan ng Marangal na Qur'an - Salin sa Wikang Marathi ni Muhammad Shafi Ansari

Numero ng Pahina:close

external-link copy
12 : 4

وَلَكُمْ نِصْفُ مَا تَرَكَ اَزْوَاجُكُمْ اِنْ لَّمْ یَكُنْ لَّهُنَّ وَلَدٌ ۚ— فَاِنْ كَانَ لَهُنَّ وَلَدٌ فَلَكُمُ الرُّبُعُ مِمَّا تَرَكْنَ مِنْ بَعْدِ وَصِیَّةٍ یُّوْصِیْنَ بِهَاۤ اَوْ دَیْنٍ ؕ— وَلَهُنَّ الرُّبُعُ مِمَّا تَرَكْتُمْ اِنْ لَّمْ یَكُنْ لَّكُمْ وَلَدٌ ۚ— فَاِنْ كَانَ لَكُمْ وَلَدٌ فَلَهُنَّ الثُّمُنُ مِمَّا تَرَكْتُمْ مِّنْ بَعْدِ وَصِیَّةٍ تُوْصُوْنَ بِهَاۤ اَوْ دَیْنٍ ؕ— وَاِنْ كَانَ رَجُلٌ یُّوْرَثُ كَلٰلَةً اَوِ امْرَاَةٌ وَّلَهٗۤ اَخٌ اَوْ اُخْتٌ فَلِكُلِّ وَاحِدٍ مِّنْهُمَا السُّدُسُ ۚ— فَاِنْ كَانُوْۤا اَكْثَرَ مِنْ ذٰلِكَ فَهُمْ شُرَكَآءُ فِی الثُّلُثِ مِنْ بَعْدِ وَصِیَّةٍ یُّوْصٰی بِهَاۤ اَوْ دَیْنٍ ۙ— غَیْرَ مُضَآرٍّ ۚ— وَصِیَّةً مِّنَ اللّٰهِ ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌ حَلِیْمٌ ۟ؕ

१२. आणि तुमच्या पत्न्या, जी काही संपत्ती मागे सोडून जातील आणि त्यांना मुलेबाळे नसतील तर त्यात तुमचा अर्धा हिस्सा आहे आणि जर त्यांना मुलेबाळे असतील तर त्यांनी मागे सोडलेल्या संपत्तीत तुमचा चौथा हिस्सा आहे, मात्र त्यांनी केलेल्या मृत्युपत्राची पूर्तता झाल्यानंतर किंवा त्यांचे कर्ज फेडल्यानंतर आणि जी संपत्ती तुम्ही आपल्या मागे सोडून जाल, त्यात त्यांचा एक चतुर्थांश हिस्सा आहे जर तुम्हाला संतती नसेल, आणि जर तुम्हाला संतती असेल तर मग त्यांना तुम्ही मागे सोडलेल्या संपत्तीत आठवा हिस्सा मिळेल, मात्र तुम्ही केलेल्या मृत्युपत्राची पूर्तता झाल्यानंतर आणि तुमचे कर्ज फेडून झाल्यानंतर, आणि जर अशा पुरुष किंवा स्त्रीने मागे सोडलेल्या संपत्तीचा मामला आला, ज्याला आई-बाप किंवा मुलेबाळे नसतील, परंतु भाऊ-बहीण असतील तर त्यांच्यापैकी प्रत्येकाला सहावा हिस्सा मिळेल आणि जर याहून जास्त असतील तर एक तृतियांश संपत्तीत सर्वांचा हिस्सा राहील. मात्र त्याने केलेल्या मृत्युपत्राची पूर्तता झाल्यानंतर व कर्जाची अदायगी झाल्यानंतरच अशा प्रकारे की इतरांना नुकसान पोहचविले गेले नसावे. हे अल्लाहतर्फे निर्धारीत केलेले आहे आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट जाणणारा आणि धर्य राखणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
13 : 4

تِلْكَ حُدُوْدُ اللّٰهِ ؕ— وَمَنْ یُّطِعِ اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ یُدْخِلْهُ جَنّٰتٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ خٰلِدِیْنَ فِیْهَا ؕ— وَذٰلِكَ الْفَوْزُ الْعَظِیْمُ ۟

१३. या सर्वश्रेष्ठ अल्लाहने निर्धारीत केलेल्या सीमा आहेत आणि जो कोणी अल्लाह आणि त्याचे रसूल (पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या आदेशाचे पालन करील, त्याला अल्लाह जन्नतमध्ये दाखल करील, ज्यांच्या खाली नहरी (प्रवाह) वाहत असतील, ज्यात ते नेहमी नेहमी राहतील, आणि ही फार मोठी सफलता आहे. info
التفاسير:

external-link copy
14 : 4

وَمَنْ یَّعْصِ اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ وَیَتَعَدَّ حُدُوْدَهٗ یُدْخِلْهُ نَارًا خَالِدًا فِیْهَا ۪— وَلَهٗ عَذَابٌ مُّهِیْنٌ ۟۠

१४. आणि जो मनुष्य अल्लाहची आणि रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांची अवज्ञा करील आणि अल्लाहने निर्धारीत केलेल्या सीमांचे उल्लंघन करील त्याला तो जहन्नममध्ये टाकील, ज्यात तो नेहमी नेहमी राहील. अशा लोकांकरिता अपमानदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे. info
التفاسير: