قرآن کریم کے معانی کا ترجمہ - مراٹھی ترجمہ * - ترجمے کی لسٹ


معانی کا ترجمہ آیت: (92) سورت: سورۂ توبہ
وَّلَا عَلَی الَّذِیْنَ اِذَا مَاۤ اَتَوْكَ لِتَحْمِلَهُمْ قُلْتَ لَاۤ اَجِدُ مَاۤ اَحْمِلُكُمْ عَلَیْهِ ۪— تَوَلَّوْا وَّاَعْیُنُهُمْ تَفِیْضُ مِنَ الدَّمْعِ حَزَنًا اَلَّا یَجِدُوْا مَا یُنْفِقُوْنَ ۟ؕ
९२. आणि ना त्या लोकांवर जे तुमच्याजवळ येतात की तुम्ही त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था करून द्यावी, तेव्हा तुम्ही त्यांना उत्तर देता की मला तुमच्या वाहनासाठी काहीच आढळत नाही, तेव्हा ते दुःखाने रडत, अश्रू ढाळीत परत जातात की त्यांना खर्च करण्यासाठी काहीही प्राप्त नाही.१
(१) हे मुसलमानांच्या एका समूहाचे वर्णन आहे, अर्थात त्या लोकांचे ज्यांच्याजवळ स्वतःचे वाहन नव्हते आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनीही वाहन उपलब्ध करून देण्याबाबत आपली विवशता जाहीर केली. यावर त्यांना एवढे दुःख झाले की दुःखातिरेकाने त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सर्वश्रेष्ठ अल्लाह प्रत्येक उघड आणि लपलेल्या गोष्टीला जाणणारा आहे, त्यांना जिहादमध्ये भाग घेण्यापासून वेगळे केले. किंबहुना हदीसमध्ये उल्लेखित आहे की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्या अगतिक लोकांविषयी, युद्धात सहभागी होणाऱ्या लोकांना फर्माविले, ‘‘.....तुमच्या मागे मदीनेत काही लोक असेही आहेत की तुम्ही ज्या घाटीला पार करता, आणि ज्या मार्गावर चालता, तुमच्यासह ते मोबदला प्राप्त करण्यात समानरित्या सहभागी आहेत. निकटच्या अनुयायींनी विचारले, हे कसे असू शकते, वास्तविक ते मदीनेत बसले आहेत. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, ‘‘सबबीने त्यांना तिथे रोखून ठेवले आहे.’’ (सहीह बुखारी, किताबुल जिहाद आणि सहीह मुस्लिम नं. १५१८)
عربی تفاسیر:
 
معانی کا ترجمہ آیت: (92) سورت: سورۂ توبہ
سورتوں کی لسٹ صفحہ نمبر
 
قرآن کریم کے معانی کا ترجمہ - مراٹھی ترجمہ - ترجمے کی لسٹ

قرآن کریم کے معانی کا مراٹھی ترجمہ۔ ترجمہ محمد شفیع انصاری نے اور شائع البر فاؤنڈیشن ممبئی کیا ہے۔

بند کریں