《古兰经》译解 - 蒙达语翻译 - 穆罕默德·舍夫尔·安萨拉。

艾哈拉布

external-link copy
1 : 33

یٰۤاَیُّهَا النَّبِیُّ اتَّقِ اللّٰهَ وَلَا تُطِعِ الْكٰفِرِیْنَ وَالْمُنٰفِقِیْنَ ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ عَلِیْمًا حَكِیْمًا ۟ۙ

१. हे पैगंबर! अल्लाहचे भय बाळगून राहा आणि काफिर आणि मुनाफिक (दांभिक ईमानधारक) लोकांचे म्हणणे मानू नका. अल्लाह मोठा ज्ञान बाळगणारा, मोठा बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
2 : 33

وَّاتَّبِعْ مَا یُوْحٰۤی اِلَیْكَ مِنْ رَّبِّكَ ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ بِمَا تَعْمَلُوْنَ خَبِیْرًا ۟ۙ

२. आणि जे काही तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे वहयी (प्रकाशना) केली जाते, तिचे अनुसरण करा (विश्वास करा), कारण अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माशी परिचित आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 33

وَّتَوَكَّلْ عَلَی اللّٰهِ ؕ— وَكَفٰی بِاللّٰهِ وَكِیْلًا ۟

३. आणि तुम्ही अल्लाहवरच भरवसा राखा, अल्लाह काम बनविण्याकरिता पुरेसा आहे. info
التفاسير:

external-link copy
4 : 33

مَا جَعَلَ اللّٰهُ لِرَجُلٍ مِّنْ قَلْبَیْنِ فِیْ جَوْفِهٖ ۚ— وَمَا جَعَلَ اَزْوَاجَكُمُ الّٰٓـِٔیْ تُظٰهِرُوْنَ مِنْهُنَّ اُمَّهٰتِكُمْ ۚ— وَمَا جَعَلَ اَدْعِیَآءَكُمْ اَبْنَآءَكُمْ ؕ— ذٰلِكُمْ قَوْلُكُمْ بِاَفْوَاهِكُمْ ؕ— وَاللّٰهُ یَقُوْلُ الْحَقَّ وَهُوَ یَهْدِی السَّبِیْلَ ۟

४. कोणत्याही माणसाच्या छातीत अल्लाहने दोन हृदय ठेवली नाहीत. आणि आपल्या ज्या पत्न्यांना तुम्ही माता म्हणून संबोधून बसता, त्यांना अल्लाहने तुमच्या (खऱ्याखुऱ्या) माता बनविले नाही आणि ना तुमच्या दत्तक घेतलेल्या बालकांना (वस्तुतः) तुमचे पुत्र बनविले आहे. या तर तुमच्या तोंडच्या गोष्टी आहेत. अल्लाह सत्य गोष्टी सांगतो आणि तोच सरळ मार्ग दाखवितो. info
التفاسير:

external-link copy
5 : 33

اُدْعُوْهُمْ لِاٰبَآىِٕهِمْ هُوَ اَقْسَطُ عِنْدَ اللّٰهِ ۚ— فَاِنْ لَّمْ تَعْلَمُوْۤا اٰبَآءَهُمْ فَاِخْوَانُكُمْ فِی الدِّیْنِ وَمَوَالِیْكُمْ ؕ— وَلَیْسَ عَلَیْكُمْ جُنَاحٌ فِیْمَاۤ اَخْطَاْتُمْ بِهٖ وَلٰكِنْ مَّا تَعَمَّدَتْ قُلُوْبُكُمْ ؕ— وَكَانَ اللّٰهُ غَفُوْرًا رَّحِیْمًا ۟

५. दत्तक घेतलेल्या मुलांना त्यांच्या (खऱ्या) पित्यांच्या संबंधाने हाक मारा. अल्लाहजवळ पूर्ण न्याय हाच आहे. मग जर तुम्हाला त्यांचे (खरे) पिता माहीत नसतील तर ते तुमचे धर्म-बांधव आणि मित्र आहेत.१ तुमच्याकडून भूलचूक म्हणून काही घडल्यास त्याबाबत तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही, परंतु गुन्हा तो आहे, ज्याचा तुम्ही इरादा कराल आणि इरादा मनापासून कराल. अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे. info

(१) या आदेशान्वये ती प्रथा हराम (निषिद्ध) केली गेली जी अज्ञानकाळापासून चालत आली होती आणि इस्लामच्या आरंभकाळात प्रचलित होती की दत्तक घेतलेल्या मुलाला स्वतःचा पुत्र समजले जात नसे. पैगंबरांच्या निकटतम अनुयायीं (सहाबां) चे कथन आहे की आम्ही जैद बिन हारिसला, ज्यांना पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दास्यमुक्त करून पुत्र बनविले होते. जैद बिन मुहम्मद या नावाने हाक मारीत. येथपावेतो की कुरआनाची ही आयत अवतरली.

التفاسير:

external-link copy
6 : 33

اَلنَّبِیُّ اَوْلٰی بِالْمُؤْمِنِیْنَ مِنْ اَنْفُسِهِمْ وَاَزْوَاجُهٗۤ اُمَّهٰتُهُمْ ؕ— وَاُولُوا الْاَرْحَامِ بَعْضُهُمْ اَوْلٰی بِبَعْضٍ فِیْ كِتٰبِ اللّٰهِ مِنَ الْمُؤْمِنِیْنَ وَالْمُهٰجِرِیْنَ اِلَّاۤ اَنْ تَفْعَلُوْۤا اِلٰۤی اَوْلِیٰٓىِٕكُمْ مَّعْرُوْفًا ؕ— كَانَ ذٰلِكَ فِی الْكِتٰبِ مَسْطُوْرًا ۟

६. पैगंबर, ईमान राखणाऱ्यांवर स्वतः त्यांच्यापेक्षाही अधिक हक्क राखणारे आहेत आणि पैगंबराच्या पत्न्या ईमानधारकांच्या माता आहेत आणि नातेवाईक, अल्लाहच्या ग्रंथाच्या आधारावर इतर ईमानधारक आणि स्वदेशत्याग केलेल्यांच्या तुलनेत जास्त हक्कदार आहेत. (तथापि) तुम्हाला आपल्या मित्रांशी सद्‌व्यवहार करण्याची अनुमती आहे. हा आदेश ‘सुरिक्षत ग्रंथा’ (लौहे महफूज) मध्ये लिहिलेला आहे. info
التفاسير: