prev

莫拿非古乃

next

external-link copy
1 : 63

اِذَا جَآءَكَ الْمُنٰفِقُوْنَ قَالُوْا نَشْهَدُ اِنَّكَ لَرَسُوْلُ اللّٰهِ ۘ— وَاللّٰهُ یَعْلَمُ اِنَّكَ لَرَسُوْلُهٗ ؕ— وَاللّٰهُ یَشْهَدُ اِنَّ الْمُنٰفِقِیْنَ لَكٰذِبُوْنَ ۟ۚ

१. दांभिक (मुनाफिक) जेव्हा तुमच्याजवळ येतात, तेव्हा म्हणतात की आम्ही या गोष्टीस साक्ष आहोत की निःसंशय, तुम्ही अल्लाहचे रसूल (पैगंबर) आहात आणि अल्लाह जाणतो की तुम्ही निःसंशय त्याचे रसूल आहात. आणि अल्लाह साक्ष देतो की हे मुनाफिक (दांभिक) निश्चितपणे खोटारडे आहेत. info
التفاسير: |

external-link copy
2 : 63

اِتَّخَذُوْۤا اَیْمَانَهُمْ جُنَّةً فَصَدُّوْا عَنْ سَبِیْلِ اللّٰهِ ؕ— اِنَّهُمْ سَآءَ مَا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

२. त्यांनी आपल्या शपथांना ढाल बनवून ठेवले आहे, तर अल्लाहच्या मार्गापासून थांबले, निःसंशय फार वाईट आहे ता काम जे हे करीत आहेत. info
التفاسير: |

external-link copy
3 : 63

ذٰلِكَ بِاَنَّهُمْ اٰمَنُوْا ثُمَّ كَفَرُوْا فَطُبِعَ عَلٰی قُلُوْبِهِمْ فَهُمْ لَا یَفْقَهُوْنَ ۟

३. हे या कारणास्तव की हे ईमान राखून पुन्हा काफिर झाले, तेव्हा त्यांच्या हृदयांवर मोहर लावली गेली आता त्यांना काहीही समजत नाही. info
التفاسير: |

external-link copy
4 : 63

وَاِذَا رَاَیْتَهُمْ تُعْجِبُكَ اَجْسَامُهُمْ ؕ— وَاِنْ یَّقُوْلُوْا تَسْمَعْ لِقَوْلِهِمْ ؕ— كَاَنَّهُمْ خُشُبٌ مُّسَنَّدَةٌ ؕ— یَحْسَبُوْنَ كُلَّ صَیْحَةٍ عَلَیْهِمْ ؕ— هُمُ الْعَدُوُّ فَاحْذَرْهُمْ ؕ— قَاتَلَهُمُ اللّٰهُ ؗ— اَنّٰی یُؤْفَكُوْنَ ۟

४. आणि जेव्हा तुम्ही त्यांना पाहाल तेव्हा त्यांची शरीरे तुम्हाला मनमोहक वाटतील आणि जेव्हा हे बोलू लागतील तेव्हा त्यांच्या गोष्टी (ऐकण्या) साठी कान लावाल, ज्याप्रमाणे ही लाकडे आहेत भिंतीच्या आधारे लावलेली (ते) प्रत्येक (उंच) आवाजाला आपल्याविरूद्ध समजतात. तेच वास्तविक शत्रू आहेत, त्यांच्यापासून सावध राहा, अल्लाह त्यांचा सर्वनाश करो. कोठे भरकटत जात आहेत? info
التفاسير: |
prev

莫拿非古乃

next