१. मोठा बरकतशाली (समृद्धशाली) आहे तो अल्लाह ज्याने आपल्या दासावर फुरक़ान१ अवतिरत केले. यासाठी की तो समस्त लोकांकरिता खबरदार करणारा ठरावा.
(१) ‘फुरक़ान’चा अर्थ आहे, सत्य आणि असत्य, एकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवाद, आणि न्याय-अन्याय यांच्या दरम्यान फरक करणारा. या कुरआनने अगदी उघडपणे या गोष्टींना स्पष्ट केले आहे. यास्तव याला ‘फुरक़ान’ म्हटले आहे.
२. त्याच अल्लाहचे अधिराज्य आहे आकाशांवर आणि धरतीवर आणि तो कोणतीही संतती बाळगत नाही, ना त्याच्या राज्यसत्तेत त्याचा कोणी भागीदार आहे, आणि प्रत्येक वस्तूला निर्माण करून त्याने एक निर्धारित स्वरूप दिले आहे.
३. आणि त्या लोकांनी अल्लाहखेरीज ज्यांना आपले आराध्य दैवत बनवून ठेवले आहे, ते कोणतीही वस्तू निर्माण करू शकत नाही, किंबहुना ते स्वतः(एखाद्याकडून) निर्माण केले जातात ते स्वतः आपल्या लाभ-हानिचा अधिकार बाळगत नाहीत आणि ना जीवन-मृत्युचा आणि ना दुसऱ्यांदा जिवंत होऊन उठण्याचे ते मालक आहेत.
४. आणि काफिर (इन्कारी) लोक म्हणाले, हे तर केवळ त्याने स्वतः रचलेले असत्य आहे ज्या कामात दुसऱ्या लोकांनीही त्याला मदत केली आहे. वस्तुतः हे काफिर मोठे अत्याचारी आणि निव्वळ असत्य आणणारे बनलेत.
५. आणि ते असेही म्हणाले की या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा-कहाण्या आहेत, ज्या त्याने लिहून ठेवल्या आहेत, आणि त्याच सकाळ-संध्याकाळ त्याच्यासमोर वाचल्या जातात.
७. आणि ते म्हणाले की हा कसा पैगंबर आहे की भोजन करतो आणि बाजारात चालतो फिरतो, त्याच्याजवळ एखादा फरिश्ता का नाही पाठविला जात की तो देखील त्याच्या सोबतीला राहून खबरदार करणारा बनला असता.
८. किंवा त्याच्याजवळ एखादा खजिनाच टाकला गेला असता किंवा त्याची एखादी बाग तरी असती, ज्यातून तो खात राहिला असता. आणि त्या अत्याचारी लोकांनी म्हटले की तुम्ही तर अशा माणसाच्या मागे चालू लागलात, ज्याच्यावर जादू-टोणा केला गेला आहे.
१०. अल्लाह तर असा समृद्धशाली आहे की त्याने इच्छिल्यास तुम्हाला अशा अनेक बागा प्रदान करील, ज्या त्यांनी सांगितलेल्या बागांपेक्षा खूप चांगल्या असतील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत असावेत आणि तुम्हाला अनेक पक्के महाल देखील प्रदान करील.
१५. तुम्ही सांगा, काय हे अधिक चांगले आहे१ की ती कायमस्वरूपी जन्नत, जिचा वायदा नेक- सदाचारी लोकांना दिला गेला आहे, जो त्यांचा मोबदला आहे आणि त्यांच्या परतीचे मूळ ठिकाण आहे.
(१) ‘‘हे....’’ संकेत आहे जहन्नमच्या शिक्षा- यातनेच्या वर्णनाकडे ज्यात जहन्नमी लोक जखडलेले असतील, तेव्हा इन्कार आणि मूर्तीपूजेचा हा मोबदला चांगला की ती सदैवकालीन जन्नत जिचा वायदा अल्लाहने, आपले भय राखणाऱ्यांना त्यांचे भय राखण्याबद्दल आणि अल्लाहचे आज्ञापालन केल्याबद्दल दिला आहे. अर्थात हा प्रश्न जहन्नममध्ये विचारला जाईल. परंतु इथे या हेतुने उल्लेखिला गेला की कदाचित जहन्नमी लोकांच्या या परिणामाने बोध प्राप्त करून अल्लाहचे भय आणि त्याच्या आदेशांचे पालन करण्याचा मार्ग अंगीकारतील आणि या दुष्परिणतीपासून आपला बचाव करतील जिचा उल्लेख या ठिकाणी केला गेला आहे.
१७. आणि ज्या दिवशी अल्लाह त्यांना आणि अल्लाहखेरीज ज्याची हे उपासना करीत राहिले त्या सर्वांना एकत्र करून विचारेल, काय माझ्या या दासांना तुम्ही मार्गभ्रष्ट केले की हे स्वतः मार्गापासून विचलित झाले?१
(१) या जगात अल्लाहखेरीज ज्यांची उपासना केली जात राहिली आणि पुढेही केली जात राहील त्यात निर्जीव पदार्थ (दगड, लाकूड आणि इतर धातूंच्या मूर्त्या) देखील आहेत. तसेच अल्लाहचे सदाचारी दासही आहेत जे सजीव आहेत. उदा. हजरत उजैर आणि हजरत मसीह (येशू) व इतर नेक लोक. त्याचप्रमाणे फरिश्त्यांचे व जिन्नांचेही पुजारी असतील. अल्लाह निर्जीव वस्तुंनाही अक्कल, सामंजस्य आणि वाचा प्रदान करील. मग त्या समस्त आराध्य दैवतांना विचारील की सांगा माझ्या या दासांना तुम्ही आपल्या उपासनेचा आदेश दिला होता की ते आपल्या मर्जीने तुमचे उपासक बनून पथभ्रष्ट झाले होते?
१८. ते उत्तर देतील, पवित्र आहेस तू! स्वतः आमच्यासाठी हे योग्य नव्हते की तुझ्याखेरीज दुसऱ्यांना आपला मित्र- सहाय्यक बनविले असते. खरी गोष्ट अशी की तू यांना आणि यांच्या वाडवडिलांना सुख- संपन्नता प्रदान केली येथेपर्यंत की हे बोध- उपदेश विसरले. हे लोक विनाशास पात्रच होते.
१९. तेव्हा त्यांनी तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टींमध्ये खोटे ठरविले. आता ना तर तुमच्यात आपली शिक्षा टाळण्याची ताकद आहे ना मदत करण्याची. तुमच्यापैकी ज्याने देखील अत्याचार केला, आम्ही त्याला सक्त शिक्षा- यातनेची गोडी चाखवू.
२०. आणि आम्ही तुमच्यापूर्वी जेवढे देखील पैगंबर पाठविले ते सर्व भोजनही करीत असत आणि बाजारातही हिंडत फिरत असत, आणि आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला दुसऱ्याच्या कसोटीचे माध्यम बनविले. १ काय तुम्ही धीर- संयम राखाल? आणि तुमचा पालनकर्ता सर्व काही पाहणारा आहे.
(१) हे अल्लाहचे कथन आहे जे मूर्तीपूजकांना संबोधून अल्लाह फर्माविल की तुम्ही ज्यांना आपले आराध्य दैवत समजत होते त्यांनी तुमचे म्हणणे खोटे ठरविले आहे आणि तुम्ही पाहिले की त्यांनी तुमच्यापासून विभक्त होण्याचे ऐलानही केले आहे. अर्थात ज्यांना तुम्ही आपले समजत होते ते सहाय्यक ठरले नाहीत. तेव्हा आता काय तुम्ही हे सामर्थ्य राखता की माझी शिक्षा आपल्यावरून टाळू शकावे आणि आपली काही मदत करू शकावे?
२१. आणि ज्यांना आमच्या भेटीची आशा नाही, ते म्हणाले की आमच्यावर फरिश्ते का नाही अवतरित केले जात? किंवा आम्ही (आपल्या डोळ्यांनी) आपल्या पालनकर्त्यास पाहिले असते? त्या लोकांनी स्वतः आपल्यालाच खूप मोठे समजून घेतले आहे आणि फार अवज्ञा केली आहे.
३२. आणि काफिर म्हणाले की त्याच्यावर संपूर्ण कुरआन एकाच वेळी का नाही अवतरित केले गेले? अशा प्रकारे (आम्ही थोडे थोडे करून अवतरित केले) यासाठी की याद्वआरे आम्ही तुमच्या हृदयास मजबूती प्रदान करावी. आणि आम्ही त्यास थांबून थांबूनच वाचून ऐकविले आहे.
३७. आणि नूहच्या जनसमूहानेही जेव्हा पैगंबरांना खोटे ठरविले, तेव्हा आम्ही त्यांना बुडवून टाकले आणि लोकांकरिता त्यांना बोधप्राप्तीचे चिन्ह बनविले आणि आम्ही अत्याचारींकरिता मोठी कठोर शिक्षा तयार करून ठेवली आहे.
४०. आणि हे लोक त्या वस्तीजवळूनही ये-जा करतात, जिच्यावर मोठा वाईट प्रकारचा पाऊस पाडला गेला.१ काय हे तरीही ते पाहत नाहीत? खरी गोष्ट अशी की त्यांना मेल्यानंतर दुसऱ्यांदा जिवंत होऊन उभे राहण्यावर विश्वासच नाही.
(१) वस्तीशी अभिप्रेत लूत जनसमूहाच्या वस्त्या सदूम आणि अमूरा वगैरे अभिप्रेत आहेत आणि वाईट पावसाशी अभिप्रेत दगड धोंड्यांचा पाऊस होय. या वस्त्या पालथ्या पाडल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर दगडांचा पाऊस पाडला गेला. जसे सूरह हूद-८२ मध्ये सांगितले गेले आहे. या वस्त्या सीरिया आणि पॅलेस्टीनच्या मार्गात पडतात, ज्यांच्यावरून मक्कानिवासी ये-जा करीत असत.
४२. (एवढे बरे) की आम्ही अटळ राहिलो, अन्यथा याने तर आम्हाला आमच्या आराध्य दैवतांपासून विचलित करण्यात काहीच कसर सोडली नव्हती. आणि जेव्हा हे (अल्लाहच्या) शिक्षा- यातनांना पाहतील तेव्हा त्यांना स्पष्टतः कळून येईल की पूर्णपणे मार्गापासून भटकलेला कोण होता?
४४. काय तुम्ही याच विचारात आहात की त्यांच्यापैकी बहुतेक जण ऐकतात किंवा समजतात. ते तर अगदी जनावरांसारखे आहेत, किंबहुना त्यांच्यापेक्षाही अधिक वाट चुकलेले.
४५. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने सावलीला कशा प्रकारे विस्तृत केले आहे. त्याने इच्छिले असते तर तिला स्थिर केले असते, मग सूर्याला आम्ही त्यावर प्रमाण ठरविले.
५०. आणि निःसंशय, आम्ही यास त्यांच्या दरम्यान अनेक प्रकारे वर्णन केले यासाठी की त्यांनी बोध प्राप्त करावा, परंतु तरीही अधिकांश लोकांनी कृतघ्नतेखेरीज (आणखी काही) मानले नाही.
५३. आणि तोच आहे ज्याने दोन समुद्रांना आपसात मिळवून ठेवले आहे. एक आहे गोड चवदार आणि दुसरा खारा कडू आणि आणि या दोघांच्या दरम्यान एक आड पडदा आणि भक्कम आड उभा केला.
५४. आणि तोच आहे ज्याने पाण्यापासून मानवाला निर्माण केले, मग त्याला वंश बाळगणारा आणि सासरवाडीचे नातेसंबंध राखणारा बनविले. निःसंशय, तुमचा पालनकर्ता प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे.
५५. आणि हे अल्लाहऐवजी अशांची उपासना करतात जे ना त्यांना काही लाभ पोहचवू शकतात आणि ना काही हानि पोहचवू शकतात. काफिर तर आहेच आपल्या पालनकर्त्याविरूद्ध (सैताना) चा सहाय्यक.
५८. आणि त्या चिरकाल राहणाऱ्या अल्लाहवर पूर्ण विश्वास राखावा, ज्याला कधीही मृत्यु नाही त्याच्या प्रशंसेसह त्याची पवित्रता (तस्बीह) वर्णन करीत राहावे. तो आपल्या दासांचे अपराध चांगल्या प्रकारे जाणतो.
५९. तोच आहे ज्याने आकाशांना आणि जमिनीला आणि त्यांच्या दरम्यान असलेल्या समस्त वस्तूंना सहा दिवसांत निर्माण केले, मग तो अर्श (ईश-सिंहासना) वर बुलंद झाला. तो रहमान आहे, तुम्ही त्याच्याविषयी एखाद्या जाणकाराला विचारा.
६०. आणि त्यांना जेव्हा देखील सांगितले जाते की रहमान (दयावान अल्लाह) ला सजदा करा (त्याच्यापुढे माथा टेका) तेव्हा ते म्हणतात की रहमान काय आहे? काय आम्ही त्याला सजदा करावा, ज्याचा आदेश तुम्ही आम्हाला देत आहात आणि (या आवाहनाने) त्यांच्या तिरस्कारात वाढच होते.
६२. आणि त्यानेच रात्र आणि दिवसाला एका पाठोपाठ ये-जा करणारा बनविले त्या माणसाच्या बोध- उपदेशाकरिता, जो बोध प्राप्त करण्याचा किंवा कृतज्ञशील होण्याचा इरादा राखत असेल.
६३. आणि रहमान (दयावान अल्लाह) चे सच्चे दास ते आहेत, जे जमिनीवर नरमीने चालतात आणि जेव्हा अज्ञानी लोक त्यांच्याशी बोलू लागतात, तेव्हा ते म्हणतात सलाम आहे.१
(१) ‘सलाम’शी अभिप्रेत इथे तोंड फिरवणे व वाद टाळणे होय. अर्थात ईमानधारक अज्ञानी लोकांशी व हुज्जत करणाऱ्यांशी वाद घालत नाही, किंबहुना अशा प्रसंगी टाळतात आणि अशा लोकांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात आणि निरर्थक वादविवाद करीत नाही.
६५. आणि जे दुआ (प्रार्थना) करतात की हे आमच्या पालनकर्त्या! जहन्नमच्या शिक्षा- यातनेला आमच्यापासून दूरच ठेव, कारण तिची शिक्षा अगदी चिकटून राहणारी आहे. १
(१) यावरून हे कळाले की दयावान अल्लाह (रहमान) चे दास खऱ्या अर्थाने ते आहेत, जे एकीकडे रात्री जागून अल्लाहची उपासना करतात आणि दुसरीकडे हे भयही बाळगतात की कदाचित एखादी चुकी किंवा सुस्तीमुळे अल्लाहच्या पकडीत न यावे. यास्तव ते जहन्नमच्या शिक्षा- यातनेपासून सुटका मागतात. अर्थात अल्लाहची उपासना आणि आज्ञापालनावर कशाही प्रकारचा गर्व आणि घमेंड केली जाऊ नये.
६८. आणि जे अल्लाहसोबत दुसऱ्या एखाद्या उपास्याला पुकारत नाही, आणि एखाद्या अशा माणसाला, ज्याची हत्या करणे अल्लाहने हराम (अवैध) केले असावे, त्याची नाहक हत्या करीत नाही, ना ते व्यभिचार करतात१ आणि जो कोणी हे कर्म करील तर तो स्वतःवर कठोर शिक्षा ओढवून घेईल.
(२) हदीसमध्ये पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना विचारले गेले, कोणता अपराध सर्वांत मोठा आहे. पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी फर्माविले, हे की तू अल्लाहसोबत दुसऱ्याला सहभागी करावे, वास्तविक त्यानेच तुला निर्माण केले. त्याने विचारले, त्यानंतर कोणता गुन्हा सर्वांत मोठा आहे? फर्माविले, आपल्या संततीची या भयाने हत्या करणे की ती तुझ्यासोबत खाईल. त्याने विचारले त्यानंतर कोणता? पैगंबरांनी फर्माविले, हे की तू आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करावा. मग पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी फर्माविले की या गोष्टींची पुष्टी या आयतीद्वारे होते. नंतर पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी याच आयतीचे पठण केले. (अलबुखारी, तफसीर सूरह अल बकरा, मुस्लिम किताबुल ईमान बाबु कौनिश-शिर्के अकबहुज जुनूब)
७०. त्या लोकांखेरीज, जे माफी मागतील आणि ईमान राखतील आणि नेकीचे कर्म करतील तर अशा लोकांचे अपराध, अल्लाह सत्कमर्मात बदलतो. अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे.
७४. आणि अशी दुआ (प्रार्थना) करतात की हे आमच्या पालनकर्त्या! तू आम्हाला आमच्या पत्न्या आणि संततीद्वारे नेत्रांना शितलता प्रदान कर आणि आम्हाला नेक- सदाचारी लोकांचा नेता बनव.
७७. सांगा, जर तुमची मृदु- कोमल दुआ (प्रार्थना) नसती, तर माझ्या पालनकर्त्याने तुमची कदापि पर्वा केली नसती. तुम्ही तर खोटे ठरविले आहे. आता लवकरच त्याची शिक्षा तुम्हाला येऊन धरेल.
Contents of the translations can be downloaded and re-published, with the following terms and conditions:
1. No modification, addition, or deletion of the content.
2. Clearly referring to the publisher and the source (QuranEnc.com).
3. Mentioning the version number when re-publishing the translation.
4. Keeping the transcript information inside the document.
5. Notifying the source (QuranEnc.com) of any note on the translation.
6. Updating the translation according to the latest version issued from the source (QuranEnc.com).
7. Inappropriate advertisements must not be included when displaying translations of the meanings of the Noble Quran.
Njeñtudi wiɗto ngoo:
API specs
Endpoints:
Sura translation
GET / https://quranenc.com/api/v1/translation/sura/{translation_key}/{sura_number} description: get the specified translation (by its translation_key) for the speicified sura (by its number)
Parameters: translation_key: (the key of the currently selected translation) sura_number: [1-114] (Sura number in the mosshaf which should be between 1 and 114)
Returns:
json object containing array of objects, each object contains the "sura", "aya", "translation" and "footnotes".
GET / https://quranenc.com/api/v1/translation/aya/{translation_key}/{sura_number}/{aya_number} description: get the specified translation (by its translation_key) for the speicified aya (by its number sura_number and aya_number)
Parameters: translation_key: (the key of the currently selected translation) sura_number: [1-114] (Sura number in the mosshaf which should be between 1 and 114) aya_number: [1-...] (Aya number in the sura)
Returns:
json object containing the "sura", "aya", "translation" and "footnotes".