Check out the new design

क़ुरआन के अर्थों का अनुवाद - मराठी अनुवाद - मुहम्मद शफ़ी अंसारी * - अनुवादों की सूची


अर्थों का अनुवाद सूरा: अल्-फ़ुर्क़ान   आयत:
اِذَا رَاَتْهُمْ مِّنْ مَّكَانٍ بَعِیْدٍ سَمِعُوْا لَهَا تَغَیُّظًا وَّزَفِیْرًا ۟
१२. जेव्हा ती यांना दुरून पाहील तेव्हा हे तिचे क्रोधाने बेकाबू होणे आणि भयंकर गर्जना ऐकतील.
अरबी तफ़सीरें:
وَاِذَاۤ اُلْقُوْا مِنْهَا مَكَانًا ضَیِّقًا مُّقَرَّنِیْنَ دَعَوْا هُنَالِكَ ثُبُوْرًا ۟ؕ
१३. आणि जेव्हा यांना जहन्नमच्या एखाद्या तंग (संकुचित) जागेत बांधून फेकून दिले जाईल तेव्हा तिथे आपल्यासाठी मरणाला पुकारतील.
अरबी तफ़सीरें:
لَا تَدْعُوا الْیَوْمَ ثُبُوْرًا وَّاحِدًا وَّادْعُوْا ثُبُوْرًا كَثِیْرًا ۟
१४. (त्यांना सांगितले जाईल) आज एकाच मरणाला पुकारू नका, किंबहुना अनेक मरणांना हाक मारा.
अरबी तफ़सीरें:
قُلْ اَذٰلِكَ خَیْرٌ اَمْ جَنَّةُ الْخُلْدِ الَّتِیْ وُعِدَ الْمُتَّقُوْنَ ؕ— كَانَتْ لَهُمْ جَزَآءً وَّمَصِیْرًا ۟
१५. तुम्ही सांगा, काय हे अधिक चांगले आहे१ की ती कायमस्वरूपी जन्नत, जिचा वायदा नेक- सदाचारी लोकांना दिला गेला आहे, जो त्यांचा मोबदला आहे आणि त्यांच्या परतीचे मूळ ठिकाण आहे.
(१) ‘‘हे....’’ संकेत आहे जहन्नमच्या शिक्षा- यातनेच्या वर्णनाकडे ज्यात जहन्नमी लोक जखडलेले असतील, तेव्हा इन्कार आणि मूर्तीपूजेचा हा मोबदला चांगला की ती सदैवकालीन जन्नत जिचा वायदा अल्लाहने, आपले भय राखणाऱ्यांना त्यांचे भय राखण्याबद्दल आणि अल्लाहचे आज्ञापालन केल्याबद्दल दिला आहे. अर्थात हा प्रश्न जहन्नममध्ये विचारला जाईल. परंतु इथे या हेतुने उल्लेखिला गेला की कदाचित जहन्नमी लोकांच्या या परिणामाने बोध प्राप्त करून अल्लाहचे भय आणि त्याच्या आदेशांचे पालन करण्याचा मार्ग अंगीकारतील आणि या दुष्परिणतीपासून आपला बचाव करतील जिचा उल्लेख या ठिकाणी केला गेला आहे.
अरबी तफ़सीरें:
لَهُمْ فِیْهَا مَا یَشَآءُوْنَ خٰلِدِیْنَ ؕ— كَانَ عَلٰی رَبِّكَ وَعْدًا مَّسْـُٔوْلًا ۟
१६. ते जे काही इच्छितील ते त्यांच्यासाठी तिथे हजर असेल, नेहमी राहणारे हा तर तुमच्या पालनकर्त्याचा वायदा आहे, ज्याची मागणी केली गेली पाहिजे.
अरबी तफ़सीरें:
وَیَوْمَ یَحْشُرُهُمْ وَمَا یَعْبُدُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ فَیَقُوْلُ ءَاَنْتُمْ اَضْلَلْتُمْ عِبَادِیْ هٰۤؤُلَآءِ اَمْ هُمْ ضَلُّوا السَّبِیْلَ ۟ؕ
१७. आणि ज्या दिवशी अल्लाह त्यांना आणि अल्लाहखेरीज ज्याची हे उपासना करीत राहिले त्या सर्वांना एकत्र करून विचारेल, काय माझ्‌या या दासांना तुम्ही मार्गभ्रष्ट केले की हे स्वतः मार्गापासून विचलित झाले?१
(१) या जगात अल्लाहखेरीज ज्यांची उपासना केली जात राहिली आणि पुढेही केली जात राहील त्यात निर्जीव पदार्थ (दगड, लाकूड आणि इतर धातूंच्या मूर्त्या) देखील आहेत. तसेच अल्लाहचे सदाचारी दासही आहेत जे सजीव आहेत. उदा. हजरत उजैर आणि हजरत मसीह (येशू) व इतर नेक लोक. त्याचप्रमाणे फरिश्त्यांचे व जिन्नांचेही पुजारी असतील. अल्लाह निर्जीव वस्तुंनाही अक्कल, सामंजस्य आणि वाचा प्रदान करील. मग त्या समस्त आराध्य दैवतांना विचारील की सांगा माझ्या या दासांना तुम्ही आपल्या उपासनेचा आदेश दिला होता की ते आपल्या मर्जीने तुमचे उपासक बनून पथभ्रष्ट झाले होते?
अरबी तफ़सीरें:
قَالُوْا سُبْحٰنَكَ مَا كَانَ یَنْۢبَغِیْ لَنَاۤ اَنْ نَّتَّخِذَ مِنْ دُوْنِكَ مِنْ اَوْلِیَآءَ وَلٰكِنْ مَّتَّعْتَهُمْ وَاٰبَآءَهُمْ حَتّٰی نَسُوا الذِّكْرَ ۚ— وَكَانُوْا قَوْمًا بُوْرًا ۟
१८. ते उत्तर देतील, पवित्र आहेस तू! स्वतः आमच्यासाठी हे योग्य नव्हते की तुझ्याखेरीज दुसऱ्यांना आपला मित्र- सहाय्यक बनविले असते. खरी गोष्ट अशी की तू यांना आणि यांच्या वाडवडिलांना सुख- संपन्नता प्रदान केली येथेपर्यंत की हे बोध- उपदेश विसरले. हे लोक विनाशास पात्रच होते.
अरबी तफ़सीरें:
فَقَدْ كَذَّبُوْكُمْ بِمَا تَقُوْلُوْنَ ۙ— فَمَا تَسْتَطِیْعُوْنَ صَرْفًا وَّلَا نَصْرًا ۚ— وَمَنْ یَّظْلِمْ مِّنْكُمْ نُذِقْهُ عَذَابًا كَبِیْرًا ۟
१९. तेव्हा त्यांनी तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टींमध्ये खोटे ठरविले. आता ना तर तुमच्यात आपली शिक्षा टाळण्याची ताकद आहे ना मदत करण्याची. तुमच्यापैकी ज्याने देखील अत्याचार केला, आम्ही त्याला सक्त शिक्षा- यातनेची गोडी चाखवू.
अरबी तफ़सीरें:
وَمَاۤ اَرْسَلْنَا قَبْلَكَ مِنَ الْمُرْسَلِیْنَ اِلَّاۤ اِنَّهُمْ لَیَاْكُلُوْنَ الطَّعَامَ وَیَمْشُوْنَ فِی الْاَسْوَاقِ ؕ— وَجَعَلْنَا بَعْضَكُمْ لِبَعْضٍ فِتْنَةً ؕ— اَتَصْبِرُوْنَ ۚ— وَكَانَ رَبُّكَ بَصِیْرًا ۟۠
२०. आणि आम्ही तुमच्यापूर्वी जेवढे देखील पैगंबर पाठविले ते सर्व भोजनही करीत असत आणि बाजारातही हिंडत फिरत असत, आणि आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला दुसऱ्याच्या कसोटीचे माध्यम बनविले. १ काय तुम्ही धीर- संयम राखाल? आणि तुमचा पालनकर्ता सर्व काही पाहणारा आहे.
(१) हे अल्लाहचे कथन आहे जे मूर्तीपूजकांना संबोधून अल्लाह फर्माविल की तुम्ही ज्यांना आपले आराध्य दैवत समजत होते त्यांनी तुमचे म्हणणे खोटे ठरविले आहे आणि तुम्ही पाहिले की त्यांनी तुमच्यापासून विभक्त होण्याचे ऐलानही केले आहे. अर्थात ज्यांना तुम्ही आपले समजत होते ते सहाय्यक ठरले नाहीत. तेव्हा आता काय तुम्ही हे सामर्थ्य राखता की माझी शिक्षा आपल्यावरून टाळू शकावे आणि आपली काही मदत करू शकावे?
अरबी तफ़सीरें:
 
अर्थों का अनुवाद सूरा: अल्-फ़ुर्क़ान
सूरों की सूची पृष्ठ संख्या
 
क़ुरआन के अर्थों का अनुवाद - मराठी अनुवाद - मुहम्मद शफ़ी अंसारी - अनुवादों की सूची

अनुवाद मुहम्मद शफ़ी अंसारी द्वारा किया गया।

बंद करें