แปล​ความหมาย​อัลกุรอาน​ - คำแปลภาษามราฐี * - สารบัญ​คำแปล


แปลความหมาย​ อายะฮ์: (19) สูเราะฮ์: At-Tawbah
اَجَعَلْتُمْ سِقَایَةَ الْحَآجِّ وَعِمَارَةَ الْمَسْجِدِ الْحَرَامِ كَمَنْ اٰمَنَ بِاللّٰهِ وَالْیَوْمِ الْاٰخِرِ وَجٰهَدَ فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ ؕ— لَا یَسْتَوٗنَ عِنْدَ اللّٰهِ ؕ— وَاللّٰهُ لَا یَهْدِی الْقَوْمَ الظّٰلِمِیْنَ ۟ۘ
१९. काय तुम्ही हाजी लोकांना पाणी पाजणे आणि मस्जीदे हराम (काबागृह) ची सेवा करणे, त्याच्यासमान ठरविले आहे, जो अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखील आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद (संघर्ष) करील. हे अल्लाहजवळ समान नाही१ आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अत्याचारी लोकांना मार्ग दाखवित नाही.
(१) अनेकेश्वरवादी हजयात्रींना पाणी पाजण्याचे आणि आदरणीय मसजिद (काबागृह) च्या देखरेखीचे जे काम करीत, त्याबद्दल त्यांना मोठी घमेंड होती, आणि याच्या तुलनेत ते ईमान व जिहादला श्रेष्ठ जाणत नसत, ज्याची श्रेष्ठता ईमानधारकांमध्ये होती, यास्तव अल्लाहने फर्माविले, काय तुम्ही हजयात्रींना पाणी पाजणे व मसजिदे हरामची व्यवस्था राखणे ही गोष्ट अल्लाहवर ईमान राखणे आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद करण्यासमान समजता? लक्षात ठेवा, अल्लाहच्या ठिकाणी या दोन गोष्टी समान नाहीत, किंबहुना अनेक ईश्वरांची उपासना करणाऱ्यांचे कोणतेही कर्म स्विकार्य नाही, मग ते कर्म वरवर पाहता कितीही पुण्यकारक का असेना.
ตัฟสีรต่างๆ​ ภาษาอาหรับ:
 
แปลความหมาย​ อายะฮ์: (19) สูเราะฮ์: At-Tawbah
สารบัญสูเราะฮ์ หมายเลข​หน้า​
 
แปล​ความหมาย​อัลกุรอาน​ - คำแปลภาษามราฐี - สารบัญ​คำแปล

การแปลความหมายอัลกุรอานเป็นภาษามราฐี แปลโดย มุหัมหมัด ชะฟีอฺ อันศอรีย์ จัดพิมพ์โดยมูลนิธิอัลบิร - มุมไบ

ปิด