Check out the new design

《古兰经》译解 - 蒙达语翻译 - 穆罕默德·舍夫尔·安萨拉。 * - 译解目录


含义的翻译 章: 讨拜   段:
وَالَّذِیْنَ اتَّخَذُوْا مَسْجِدًا ضِرَارًا وَّكُفْرًا وَّتَفْرِیْقًا بَیْنَ الْمُؤْمِنِیْنَ وَاِرْصَادًا لِّمَنْ حَارَبَ اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ مِنْ قَبْلُ ؕ— وَلَیَحْلِفُنَّ اِنْ اَرَدْنَاۤ اِلَّا الْحُسْنٰی ؕ— وَاللّٰهُ یَشْهَدُ اِنَّهُمْ لَكٰذِبُوْنَ ۟
१०७. आणि काही असे आहेत, ज्यांनी या हेतूने मस्जिद बनविली की नुकसान पोहचवावे आणि इन्कारपूर्ण गोष्टी कराव्यात आणि ईमानधारकांमध्ये फूट पाडावी, आणि अशा माणसाच्या राहण्याची व्यवस्था करावी, जो याच्या पूर्वीपासून अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोधक आहे, आणि शपथ घेतील की भलाईखेरीज आमचा कोणताही हेतु नाही आणि अल्लाह साक्षी आहे की ते पूर्णतः खोटे आहेत.
阿拉伯语经注:
لَا تَقُمْ فِیْهِ اَبَدًا ؕ— لَمَسْجِدٌ اُسِّسَ عَلَی التَّقْوٰی مِنْ اَوَّلِ یَوْمٍ اَحَقُّ اَنْ تَقُوْمَ فِیْهِ ؕ— فِیْهِ رِجَالٌ یُّحِبُّوْنَ اَنْ یَّتَطَهَّرُوْا ؕ— وَاللّٰهُ یُحِبُّ الْمُطَّهِّرِیْنَ ۟
१०८. आपण त्या मस्जिद कधीही उभे न राहावे, परंतु ज्या मस्जिदीचा पाया पहिल्या दिवसापासूनच तकवा (अल्लाहचे भय राखण्या) वर ठेवला गेला असेल, तर ती यायोग्य आहे की तुम्ही तिच्यात उभे राहावे. यात असे लोक आहेत की ते अधिक स्वच्छ-शुद्ध (पाक) होणे चांगले समजतात, आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अधिक पाक राहणाऱ्यांना प्रिय राखतो.
阿拉伯语经注:
اَفَمَنْ اَسَّسَ بُنْیَانَهٗ عَلٰی تَقْوٰی مِنَ اللّٰهِ وَرِضْوَانٍ خَیْرٌ اَمْ مَّنْ اَسَّسَ بُنْیَانَهٗ عَلٰی شَفَا جُرُفٍ هَارٍ فَانْهَارَ بِهٖ فِیْ نَارِ جَهَنَّمَ ؕ— وَاللّٰهُ لَا یَهْدِی الْقَوْمَ الظّٰلِمِیْنَ ۟
१०९. मग काय असा मनुष्य अधिक चांगला आहे, ज्याने आपल्या इमारतीचा पाया अल्लाहचे भय राखण्यावर आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यावर ठेवला असेल किंवा तो मनुष्य, ज्याने आपल्या घराचा पाया एखाद्या उतार असलेल्या दरीच्या (घाटाच्या) किनाऱ्यावर, जी कोसळण्याच्या बेतात असावी, त्यावर रचला असेल; मग तो त्यासह जहन्नमच्या आगीत जाऊन पडावा आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अशा अत्याचारींना मार्ग दाखवित नाही.
阿拉伯语经注:
لَا یَزَالُ بُنْیَانُهُمُ الَّذِیْ بَنَوْا رِیْبَةً فِیْ قُلُوْبِهِمْ اِلَّاۤ اَنْ تَقَطَّعَ قُلُوْبُهُمْ ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌ حَكِیْمٌ ۟۠
११०. त्यांचे हे घर, जे त्यांनी बनविले आहे, नेहमी त्यांच्या मनाला संशयामुळे (काट्यासरखे) बोचत राहील. परंतु हे की त्यांची हृदयेच क्षत-विक्षत व्हावीत, आणि अल्लाह ज्ञान बाळगणारा आणि हिकमतशाली आहे.
阿拉伯语经注:
اِنَّ اللّٰهَ اشْتَرٰی مِنَ الْمُؤْمِنِیْنَ اَنْفُسَهُمْ وَاَمْوَالَهُمْ بِاَنَّ لَهُمُ الْجَنَّةَ ؕ— یُقَاتِلُوْنَ فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ فَیَقْتُلُوْنَ وَیُقْتَلُوْنَ ۫— وَعْدًا عَلَیْهِ حَقًّا فِی التَّوْرٰىةِ وَالْاِنْجِیْلِ وَالْقُرْاٰنِ ؕ— وَمَنْ اَوْفٰی بِعَهْدِهٖ مِنَ اللّٰهِ فَاسْتَبْشِرُوْا بِبَیْعِكُمُ الَّذِیْ بَایَعْتُمْ بِهٖ ؕ— وَذٰلِكَ هُوَ الْفَوْزُ الْعَظِیْمُ ۟
१११. निःसंशय, अल्लाहने ईमानधारकांकडून त्यांच्या प्राणांना व धनांना जन्नतच्या मोबदल्यात खरेदी केले आहे. ते अल्लाहच्या मार्गात लढतात ज्यात ते ठार करतात आणि ठार केले जातात, याबाबत सच्चा वायदा आहे तौरात, इंजील आणि कुरआनामध्ये आणि अल्लाहपेक्षा जास्त आपल्या वायद्याचे पालन कोण करू शकतो? यास्तव तुम्ही आपल्या या विकण्यावर, जो (सौदा) तुम्ही करून घेतलात, आनंदित व्हा आणि ही फार मोठी सफलता आहे.
阿拉伯语经注:
 
含义的翻译 章: 讨拜
章节目录 页码
 
《古兰经》译解 - 蒙达语翻译 - 穆罕默德·舍夫尔·安萨拉。 - 译解目录

由穆罕默德·谢菲尔·安萨尔翻译。

关闭