Check out the new design

クルアーンの対訳 - マラーティー語対訳 - Muhammad Shafi Ansari * - 対訳の目次


対訳 章: 衣を纏う章   節:

衣を纏う章

یٰۤاَیُّهَا الْمُزَّمِّلُ ۟ۙ
१. हे चादरीत लपेटून घेणाऱ्या,
アラビア語 クルアーン注釈:
قُمِ الَّیْلَ اِلَّا قَلِیْلًا ۟ۙ
२. रात्री (तहज्जुदच्या नमाजसाठी) उठून उभे राहा, परंतु थोडा वेळ.
アラビア語 クルアーン注釈:
نِّصْفَهٗۤ اَوِ انْقُصْ مِنْهُ قَلِیْلًا ۟ۙ
३. अर्धी रात्र किंवा त्यापेक्षाही काही कमी.
アラビア語 クルアーン注釈:
اَوْ زِدْ عَلَیْهِ وَرَتِّلِ الْقُرْاٰنَ تَرْتِیْلًا ۟ؕ
४. किंवा त्यावर वाढवून आणि कुरआनाचे थोडे थांबून थांबून (स्पष्टतः) पठण करा.
アラビア語 クルアーン注釈:
اِنَّا سَنُلْقِیْ عَلَیْكَ قَوْلًا ثَقِیْلًا ۟
५. निःसंशय, आम्ही तुमच्यावर एक भारदस्त गोष्ट लवकरच अवतरित करू.
アラビア語 クルアーン注釈:
اِنَّ نَاشِئَةَ الَّیْلِ هِیَ اَشَدُّ وَطْاً وَّاَقْوَمُ قِیْلًا ۟ؕ
६. निःसंशय, रात्रीचे उठणे मनाच्या एकाग्रतेकरिता फार योग्य आहे आणि कथनास मोठे दुरुस्त (उचित) करणारे आहे.
アラビア語 クルアーン注釈:
اِنَّ لَكَ فِی النَّهَارِ سَبْحًا طَوِیْلًا ۟ؕ
७. निश्चितच, दिवसा तुम्हाला अनेक कामे असतात.
アラビア語 クルアーン注釈:
وَاذْكُرِ اسْمَ رَبِّكَ وَتَبَتَّلْ اِلَیْهِ تَبْتِیْلًا ۟ؕ
८. आणि तुम्ही आपल्या पालनकर्त्याचे नामःस्मरण करीत जा आणि संपूर्ण सृष्टी (निर्मिती) पासून अलग होऊन त्याच्याकडे ध्यानमग्न व्हा.
アラビア語 クルアーン注釈:
رَبُّ الْمَشْرِقِ وَالْمَغْرِبِ لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ فَاتَّخِذْهُ وَكِیْلًا ۟
९. पूर्व आणि पश्चिमेचा स्वामी, ज्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही. तुम्ही त्यालाच आपला कार्यसाधक (व संरक्षक) बनवा.
アラビア語 クルアーン注釈:
وَاصْبِرْ عَلٰی مَا یَقُوْلُوْنَ وَاهْجُرْهُمْ هَجْرًا جَمِیْلًا ۟
१०. आणि जे काही ते सांगतात, तुम्ही ते सहन करीत राहा आणि त्यांना चांगल्या प्रकारे सोडून द्या.
アラビア語 クルアーン注釈:
وَذَرْنِیْ وَالْمُكَذِّبِیْنَ اُولِی النَّعْمَةِ وَمَهِّلْهُمْ قَلِیْلًا ۟
११. आणि मला व त्या खोटे ठरविणाऱ्या सुसंपन्न लोकांना सोडून द्या, आणि त्यांना थोडी सवड द्या.
アラビア語 クルアーン注釈:
اِنَّ لَدَیْنَاۤ اَنْكَالًا وَّجَحِیْمًا ۟ۙ
१२. निःसंशय, आमच्याजवळ कठोर बेड्या आहेत, आणि धगधग पेटत असलेली जहन्नम आहे.
アラビア語 クルアーン注釈:
وَّطَعَامًا ذَا غُصَّةٍ وَّعَذَابًا اَلِیْمًا ۟۫
१३. आणि गळ्यात अडकणारे जेवण आहे आणि दुःखदायक अज़ाब आहे.
アラビア語 クルアーン注釈:
یَوْمَ تَرْجُفُ الْاَرْضُ وَالْجِبَالُ وَكَانَتِ الْجِبَالُ كَثِیْبًا مَّهِیْلًا ۟
१४. ज्या दिवशी धरती आणि पर्वत कंपित होतील आणि पर्वत भुरभुरित वाळूच्या टेकड्यांसारखे होतील.
アラビア語 クルアーン注釈:
اِنَّاۤ اَرْسَلْنَاۤ اِلَیْكُمْ رَسُوْلًا ۙ۬— شَاهِدًا عَلَیْكُمْ كَمَاۤ اَرْسَلْنَاۤ اِلٰی فِرْعَوْنَ رَسُوْلًا ۟ؕ
१५. निःसंशय, आम्ही तुमच्याकडेही तुमच्यावर साक्ष देणारा पैगंबर पाठविला आहे, जसा आम्ही फिरऔनकडे रसूल (पैगंबर) पाठविला होता.
アラビア語 クルアーン注釈:
فَعَصٰی فِرْعَوْنُ الرَّسُوْلَ فَاَخَذْنٰهُ اَخْذًا وَّبِیْلًا ۟
१६. तेव्हा फिरऔनने त्या पैगंबराची अवज्ञा केली तर आम्ही त्याला घोर संकटात धरले.
アラビア語 クルアーン注釈:
فَكَیْفَ تَتَّقُوْنَ اِنْ كَفَرْتُمْ یَوْمًا یَّجْعَلُ الْوِلْدَانَ شِیْبَا ۟
१७. तुम्ही जर इन्कारी राहाल तर त्या दिवशी कसे सुरक्षित राहाल, जो दिवस लहान बालकांना वृद्ध करून टाकील.१
(१) कयामतच्या दिवसाची भयानकता एवढी जास्त असेल की खरोखर लहान बालके म्हातारी होतील. हे उदाहरणार्थ सांगितले गेले. हदीसमधील उल्लेखानुसार कयामतच्या दिवशी अल्लाह आदम (अलै.) यांना फर्माविल, आपल्या संततीमधून जहन्नमकरिता वेगळे काढून घ्या. हजरत आदम म्हणतील हे अल्लाह कशा प्रकारे? अल्लाह फर्माविल की प्रत्येक हजारातून ९९९. या वेळी गर्भवती स्त्रियांचा गर्भपात होईल आणि बारके वृद्ध होतील. (अल हदीस, अल बुखारी, तफसीर सूरतुल हज्ज)
アラビア語 クルアーン注釈:
١لسَّمَآءُ مُنْفَطِرٌ بِهٖ ؕ— كَانَ وَعْدُهٗ مَفْعُوْلًا ۟
१८. ज्या दिवशी आकाश विदीर्ण होईल, अल्लाहचा हा वायदा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.
アラビア語 クルアーン注釈:
اِنَّ هٰذِهٖ تَذْكِرَةٌ ۚ— فَمَنْ شَآءَ اتَّخَذَ اِلٰی رَبِّهٖ سَبِیْلًا ۟۠
१९. निःसंशय, हा बोध (उपदेश) आहे, तेव्हा जो इच्छिल त्याने आपल्या पालनकर्त्याकडे (जाण्या) चा मार्ग पत्करावा.
アラビア語 クルアーン注釈:
 
対訳 章: 衣を纏う章
章名の目次 ページ番号
 
クルアーンの対訳 - マラーティー語対訳 - Muhammad Shafi Ansari - 対訳の目次

ムハンマド・シャフィー・アンサリ訳。

閉じる